सिनेमा रिव्यू- Kuttrame Thandanai -एक संथ सस्पेन्स तामिळ सिनेमा. (प्रतिसादात स्पाॅयलर अॅलर्ट)

Submitted by अजय चव्हाण on 29 April, 2020 - 22:07

माणसाचं आयुष्य हे नेहमीच ज्याच्या त्याच्या कर्माने घडतं असतं. कळत नकळत आपण जे कर्म करतो त्यांची फळे आपल्याला कुठे ना कुठे नक्कीच कधी स्पष्ट रूपात तर कधी अप्रत्यक्षरित्या आपल्याला भोगावी लागतात. ह्याच संकल्पनेवर आधारित ह्या सिनेमाचं शिर्षक निवडलं असावं असं माझं स्पष्ट मत आहे.

Kuttrame Thandanai चा अर्थ इंग्रजीत सांगायचा झाल्यास "Crime itslef is a punsihment" असा होतो. एव्हाना अर्थाने तुम्हाला कळलं असेलचं की, हा सिनेमा Crime based सिनेमा आहे ते. पण hold on हा सिनेमाची कथा थोडी वेगळी आहे आणि म्हणूनच हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात सहज घर करून जातो.

सिनेमा सुरू होतो आणि तिसर्या सिनमध्येच हा सिनेमा थोडा वेगळा आहे हे कळतं. कथेचा नायक रवीचंद्रनला ऊर्फ रवीला
टनल विझनचा प्रोब्लेम आहे. ह्या प्रोब्लेममुळे नायकाला फक्त समोरचं गोलाकार दिसतं आजूबाजूला फक्त अंधार. कळायला सोपं जावं म्हणून चित्रपटातलाच एक फोटो देत आहे -

images.jpeg

अशा या नायकाला बघून आपल्याला त्याच्याबद्दल नकळतपणे सहानुभती वाटते. चेकअप करायला जातो तेव्हा त्याला नव्यानेच कळतं की, त्याचा प्रोब्लेम खुप मोठा आहे आणि वेळीच आय ट्रान्सप्लांट नाही केले तर हळूहळू त्याची संपूर्ण दृष्टीही जाऊ शकते. लहानपणापासून त्याला हा प्रोब्लेम आहे पण त्याची अशी भाबडी समजूत असते सगळ्यांना इतकंच दिसत असावं. रवी हा एका एजन्सीमध्ये क्रेडीट कार्ड पेयमेंट कलेक्शनच काम करत असतो. त्याच्या आयुष्यात इन मिन तीन चार माणसं आहेत. एक म्हणजे त्याचा बाॅस, दुसरी त्याच्यावर अव्यक्त प्रेम करणारी कलिग अनु, त्याचा वयस्कर मित्र नासर आणि चौथी व्यक्ती म्हणजे त्याच्या घरासमोर राहणारी मुलगी श्वेता.

अशाच एका रात्री श्वेताच्या घराचं दार तो ठोठवतो. दार एक मध्यमवयीन माणूस उघडतो आणि कथा एका नव्या वळणावर येते. श्वेताचा खून झालेला असतो आणि दार उघडलेला माणूस श्वेताचा बाॅस विजयप्रकाश असतो. तिचा बाॅस येण्याआधीच तिचा खून झालेला असतो पण रवीने पोलीसांसमोर आपली साक्ष देऊ नये म्हणून तिचा बाॅस रवीला काही पैसे ऑफर करायची तयारी दर्शवतो आणि रवीलाही ट्रिटमेंटसाठी 320000 हवे असतात म्हणून रवी त्याच्याकडून तितकेच पैसे घेतो. जमा केलेले पैसे घेऊन जेव्हा रवी हाॅस्पिटलात जातो तेव्हा त्याला कळतं की, ह्याउपर अजून आयसीयू चार्जेस, डाॅक्टर फी ह्यांचे वेगळे पैसे भरावे लागतील. तेव्हा रवी पुन्हा विजयप्रकाशला संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. मधल्या काळात पोलीस रवीच्या घरी चौकशीसाठी येतात आणि रवी साक्ष द्यायला तयार होतो. जेव्हा तो साक्ष द्यायला पोलिस स्टेशनला जातो तिथे आधीच एका आरोपीची पोलीस चौकशी करत असतात. आरोपी हा श्वेताचा बाॅयफ्रेड अरूण असतो. अरूणला काही लोकांनी श्वेताचा खून होण्याच्याआधी तिच्या घरातून रागाने येताना पाहीलेलं असतं आणि म्हणूनच पोलीस त्याची चौकशी करत असतात. जेव्हा तिथला पोलिस हाच का तो मुलगा? असं विचारतो तेव्हा रवी हाच तो म्हणून निघून येतो. जेव्हा अरूणच्या वकीलाला रवीविषयी कळतं तेव्हा ते त्याला साक्ष फिरवण्यासाठी पाच लाखाची ऑफर करतात आणि अरूणदेखिल ह्याला तयार होतो..

ह्या सगळया गुंत्यात खरा कुणी कोण? रवीच्या डोळयांचं ऑपरेशन होऊन तो ठीक होतो का? अनुचं प्रेम रवीला कळत का? बाॅस नेमका श्वेताच्या घरी कशासाठी आलेला असतो?
रवि नेमक्या कुणाच्या बाजूने साक्ष देतो? ह्या सगळया प्रश्नांच्या उत्तरांसाठी सिनेमा पाहायलाच हवा.

ह्या सिनेमाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे ह्या सिनेमाची सिंपलीसिटी, नैसर्गिकपणे केललं डायरेक्शन आणि कलाकारांचा उत्तम अभिनय. बर्याचशा सिनला डायरेक्टरने कुठलही बॅकग्राऊंड म्युझिक दिलं नाहीये. आजुबाजूचा गोंगाट, ट्रॅफिकचा आवाज, रवी जिथे राहतो तिथल्या रहिवाशांचं पाठीमागे होणारं बोलणं ह्यामूळे संपूर्ण सिनेमा हा खुपच रिअलास्टीक वाटतो. अभिनयाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर "रवी" साकारलेल्या विधार्तने भूमिकेला पुरेपुर न्याय दिला आहे. त्याचा अभिनय हा अभिनय वाटतचं नाही इतकं त्याने समरसून काम केलं आहे. ऐश्वर्या राजेश (श्वेता) हिच्या वाटेला फारसे सीन नाहीत पण तिनेही ठीकठाक काम केलं आहे. पुजा देवरियाने अनुची भूमिका उत्तम साकारली आहे. स्पेशली तिच्या चेहर्यातला गावरान गोडवा आणि तिचा साधेपणा कायम लक्षात राहतो. नासर ह्या चित्रपटात का आहे हा प्रश्न खुप वेळा पडतो पण नासर आणि रवीच्या संभाषणातूनच रवीच्या मूळ कॅरेक्टरला एक्सप्रेस होण्याचा वाव आहे असं नंतर लक्षात आल्याशिवाय राहत नाही. चित्रपटाच लेखन आणि डायरेक्शन आणि छायाकंन ह्या तीनही बाजू मनिकंदनने सांभाळल्या आहेत आणि म्हणूनच हा सिनेमा चांगला जमलाय असं म्हणायला हरकत नाही कारण लेखक आपल्या कल्पनेतली कथा परद्यावर इतर डायरेक्टरपेक्षा जास्त प्रभावी मांडू शकतो असं माझं तरी मत आहे. कथेला कुठल्याच गाण्याची गरज नाही हे ओळखून केवळ लांबी वाढवण्यासाठी गाण्याचा वापर केला नाहीये हे आवडलं. (तसंही मूळ तामिळ गाणी हिंदित डब केल्यानंतर ऐकण्याजोगी नसतातच.) यु ट्यूबवर हा सिनेमा मोफत पाहता येईल त्यासाठी खाली लिंकसुद्धा देतोय नक्की पाहा.

https://www.youtube.com/watch?v=dpHaJKput7c

पात्रे :

रविचंद्रन (रवी) - विधार्त
श्वेता - ऐश्वर्या राजेश
अनु - पुजा देवरिया
रेहमान - विजयप्रकाश
नासर - नासर (पात्राच्या नावाचा उल्लेख कुठेच येत नाही म्हणून नासर)
शिरीष अरविंद- अरूण.

का पाहावा :

संथ आणि साध्या पद्धतीने साकारलेल्या एक वेगळ्या सस्पेन्स थ्रिलरचा अनुभव घेण्यासाठी.

IMDb Rating : 7.8/10

मानांकन : ****1/2

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Spoilar अलर्ट: खरंतर प्रश्न आहे, नायकानेच खून केला आहे असं वाटतंय खरं, पण असं असू नये ही इच्छा आहे. सिनेमामध्ये क्लीअर केलेलं नाही

धन्यवाद मंदार, ताई.

Spoilar अलर्ट: खरंतर प्रश्न आहे, नायकानेच खून केला आहे असं वाटतंय खरं, पण असं असू नये ही इच्छा आहे. सिनेमामध्ये क्लीअर केलेलं नाही>>>>

सिनेमात बरेच हिंट दिले आहेत.. नीट पाहील्यास खरा खुनी कोण हे लगेच कळून येतं.. स्पेशली नासर आणि रवीचा शेवटचा संवाद ऐका पुन्हा एकदा.

अजयदा, मुवी बघितला!
सस्पेन्स वॉज रिअली ग्रेट.. Happy
पण मुवी बघुन झाल्यावरही एक गोष्ट डोक्यातुन जात नाही.हा माणुस इतका थंड कसा ब्वा?!

बघितला सिनेमा. छान घेतलाय, विशेषतः इमारती एकदम भारी निवडल्यात. संथ घेतलाय पण परिणामकारक आहे. आणि अंदाज आला पण तरीही मस्त वाटला सिनेमा.

पुन्हा एकदा धन्यवाद ताई,

धन्यवाद च्रप्स, मामी, जिद्दू, पद्म, रायगड.

@ अज्ञातवासी : धन्यवाद, तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझीसुद्धा रेटींग देत आहे.

@बिपीन - धन्यवाद, तुम्ही दिलेली लिंक अपडेट केली आहे.

@जिद्दु: तुम्ही सुचवलेला सिनेमा हिंदीत आहे का? असल्यास वेळ मिळाला की, जरूर बघेन..

पाहिला काल-परवा केव्हातरी आणि आवडला. प्राईमवर होता.
हीरोने मस्तच केलंय काम. त्याला फार उगाचच भावना ओतुन दाखवायचा रोल नव्हता पण तरीही तो ठोकळ्यासारखा वावरला नाही. त्याच्या आजारानुसार चेहर्‍यावर हलके गोंधळलेले, सावध भाव फार मस्त दाखवले असं वाटलं. संथ सिनेमा होता तरी त्यालाही लय होती त्यामुळे पुढे काय होईल असे शेवटपर्यंत वाटत राहिले.
काही महिन्यापुर्वी दाक्शिणात्य सिनेमा पाहीन असे वाटले नव्हते पण मायबोलीवरच्या धाग्यांनी पहायला सुरुवात केली. तसे ५-६ च पाहिले म्हणा पण चांगले होते सगळे.
थँक्यु ... अजय, अज्ञातवासी व इतर, ज्यांनी लिहिले अशा चित्रपटांबद्दल.

काल पाहिला. संथ आहे पण कंटाळा येत नाही. दोन्हीत काही फरक आहे का...
मला सस्पेन्स आवडतात हॉरर नाही...
सुनिधी, मी पण इथले परीक्षण वाचून बघायला लागले.

*******************स्पॉयलर अ‍ॅलर्ट ****************************

आत्ताच बघून उठले. सिनेमा चांगला घेतलाय पण काही प्रश्न आहेत आणि एक गोंधळ पण आहे, शेवटी कोर्टरूमच्या सीन मध्ये कधीही टनेल व्हिजन दाखवली नाहीये. त्याला ट्रक मधून मारून जातात, तो तिथून तडक तिच्या बॉसकडे जातो, त्या सीन नंतर टनेल व्हिजन नाहीये. त्यामुळे मला दोन शक्यता वाटल्या एक - टिपिकल बॉलीवूड ईस्टाईल डोक्याला मार बसल्यावर त्याची व्हिजन नीट झाली किंवा कोर्टात केस उभी राहीपर्यंत त्याने बॉसकडून पैसे घेऊन ऑपरेशन करून घेतले. (पण मग पोलिसांना कळलेच असते आणि मग एवढे पैसे कुठून आले याची चौकशी झाली असती.)

नासिरच्या पात्राचे प्रयोजन काय? तू नेत्रदान केले आहेस का असे रवी त्याला विचारतो तेव्हा तो त्याला निघून जायला का सांगतो? (रवीचा conscious keeper असं का?)

बॉसकडून २५ लाख मिळवतो ना तो? तरीपण लग्न केल्यावर जरा बरे घर घेत नाही का?

धन्यवाद सुनिधी,

@मंजूताई - धन्यवाद,
दोन्हीत काही फरक आहे का...>>>> कशाबद्दल बोलताय नक्की तुम्ही??

@ रायगड - धन्यवाद.
विपू करतो नंतर. इकडे सविस्तर लिहता येणार नाही..

कारण त्या दोघांचं अफेअर असतं पण जेव्हा त्याला काहीतरी डोळ्याचा प्रॉब्लेम आहे हे तिला कळतं तेव्हा ती नातं तोडून टाकते आणि नंतर जेव्हा तो तिच्या घरी जातो (अरूण बाहेर पडतो त्यावेळी) तेव्हाही या बाबीवरून त्यांच्यात वादावादी होते. तिची दोन दोन अफेअर्स आहेत हे देखिल तो बघत असतोच. त्यामुळे कारणं दोन - हिरोच्या डोळ्याचा प्रॉब्लेम आणि पुरुषी इगो.

@ पाफा- मी avoid करत होतो पण आता काय? टाकलचं आहे स्पाॅयलर तर काय करू शकतो? स्पाॅयलरसकट लिहायला मस्त स्कोप होता आणि ह्या सिनेमाची नेमकी फिलाॅसाॅपी एक्सप्लेन करायला अजुन आवडलं असतं..
ईट्स ओके कुणाला बोलून आता काय फायदा नाही.. झालं ते झालं..

@अज्ञातवासी - हो चालेल ना.. माझी हरकत नाही..

फोटो बघूनच चित्रपट ईण्टरेस्टींग वाटतोय.
मी तामीळ म्हणून धागा उघडायला अंमळ आळस केला. हिंदीत डब आहे हे ऊत्तम. आज उद्या बघतो. छोटाच दिसतोय दिड तासाचा. सुचवल्याबद्दल अर्धे धन्यवाद. उरलेले अर्धे चित्रपट बघून झाल्यावर देतो Happy

धन्यवाद ॠन्मेऽऽष..

धन्यवाद स्वस्ति..

@रायगड विपू केली आहे वाचा...

अजय चव्हाण, पाफा ... तसंही सस्पेन्स सिनेमा आहे हे लक्षात घेऊन बघायला सुरुवात केली की अंदाज येतोच कोण खुनी असणार याचा. त्यामुळे चालतंय.

अजय चव्हाण, शीर्षकात लिहा फारतर की प्रतिसादांत स्पॉयलर्स आहेत.

Pages