सुखात भेटतोस दुःखातही भेट मित्रा

Submitted by गोपीनाथ जगताप on 26 April, 2020 - 21:04

खरंच सुखात भेटतोस दुःखातही भेट मित्रा

सुखात भेटतोस दुःखातही भेट मित्रा
आज माणसाला माणुसकी ची गरज आहे मित्रा

घराचे दरवाजे कधीकधी उघडे ही असावे
कधी गरज आपल्याला कधी गरजेला धावावे

सुखात भेटतोच दुःखातही भेट मित्रा

कमव पैसा जरी कर पुण्याची कमाई
देणाऱ्याला देई लाख विठूची विठाई

दिला श्वास ज्याने त्याचेही गुण गात जा
तिरस्कार सोडून प्रेमाने पाहत जा

दुःखात रडतोस सुखातही रडत जा मित्रा
माणुसकीच्या पायवाटेने तुम्ही घडत जा मित्रा

नाही उद्याचा भरवसा आज प्रेम देऊन जा
आज प्रेम रंगात सारा आसमंत रंगवून जा

आज माणुसकीचा सदरा घालून बघ
सारीच माणसं नसतात वाईट जवळून बघ

गर्दीतल्या एकटेपणाला आज हरवून बघ
दुःखातही थोडं थोडं आज हसून बघ

ना आकाशाला हद्द ना वाऱ्याला रे भिंत
उरली इथ रीत अन उरणार फक्त प्रीत

पाठीवरती हात ठेवून लढ म्हणण्याची देर  
भलीभली  संकटे ही सहज होती दूर

कोण राहिला इथे संपता वेळ त्याची
म्हणून तू जान किंमत वेळेची

प्रेमाचे दोन शब्द तुझे आहेत लाखमोलाचे
नाही लाख  छदाम तुझे माणुसकीच्या तोलाचे

सुखात भेटतो दुःखातही भेट मित्रा
आज माणसाला माणुसकी ची गरज आहे मित्रा

Group content visibility: 
Use group defaults