। मौनं सर्वार्थ साधनं।

Submitted by Kashvi on 26 April, 2020 - 16:14

परवा मुंबई पुणे मुंबई चित्रपट बघितला त्यात मुक्ता म्हणते "किती बोलतोस तू तुला दम नाही लागत?"खर तर खूप बोलणारी माणस भेटली की मला ही अस वाटत काही जण खरच फारच बोलतात.बोलण्यामुळे नाती जोडली जातात,भावनांची देवाण घेवाण होते पण अति काम ते कोणतेही नसावे हे म्हणतात ते उगाच नाही.
मानवाला ईश्वराने वाणीचे वरदान दिले
आहे.पंचमहाभूताने सिद्ध असा देह, दश इंद्रिया सहित प्राप्त झाला आहे.जगातले कालचक्र सतत फिरत असते.हे कुणासाठी ही थांबत नाही.वर्षांमागून वर्ष या कलचक्रात आपले आयुष्य घटत जाते.डोळे,नाक,जीभ, कान आणि त्वचा,या ज्ञानेंद्रियात महत्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे जीभ.जिचा उपयोग आपण बोलण्यासाठी आणि पदार्थाची चव चाखण्यासाठी करतो.पण या दोन्ही गोष्टीच्या अतिशयोक्ती केली तर आपल्यालाच त्रास होतो.
श्रीमद् भगवत गीतेत सांगितल्या प्रमाणे आपले मन शुद्ध करण्यासाठी मानसिक तप करण्याची आवश्यकता आहे,या तपस्येला च मौनव्रत म्हणतात.
परंतु आपल्या वाणीला विराम देणे सर्वानाच जमतेच असे नाही.आपल्यामधील काही जण असे असतील ज्यांना काही न बोलता रहाणे अशक्य प्राय आहे,त्यांची जीभ कात्री सारखी सतत चालू असते.बोलण्यासाठी काही असो व नसो पण बडबड मध्ये खंड नसतो.

मौनात कलहहानी:स्यान्मौनादायु: प्रवर्धते।
मौनाच्य प्राप्यते सौख्यं तस्मान्मौनं समाचरते।।

समंजस लोक कमी बोलतात,ज्यामुळे कलह कमी होतात.मौनधारणेमुळे आपले मन शांत आणि शुद्ध होते. मनुष्य प्रक्रुती ही मुळातच सहीष्णू,क्षमाशील आणि अंतर्मुख असते.मौनामुळं तिला सुख समाधान प्राप्त होऊ शकते.लॉंगफेनोच्या म्हणण्यानुसार मौन आणि एकांत हे आत्म्याचे आवडते मित्र आहेत.मौनता हे इंद्रियावर प्रभुत्व मिळवण्याचे उत्तम साधन आहे,आणि ज्याने ते मिळवले त्याला जितेंद्रिय म्हणतात.मौन या विषयावर खुप लिहीता येईल पण सध्या इतकच...
चला तर मग आज पासून आपणही हे मौन व्रत स्वीकारू ,आणि अगदी मौन नाही पाळता आलं तरी निदान बोलण्यापूर्वी थोडं विचार तरी करून बोलु कारण आपले संत म्हणतात......
घासावा शब्द । तासावा शब्द ।
तोलावा शब्द । बोलण्यापूर्वी ।।
शब्द हेचि कातर । शब्द सुईदोरा ।
बेतावेत शब्द । शास्त्राधारे ।।
बोलावे नेमके । नेमके , खमंग खमके ।
ठेवावे भान । देश , काळ, पात्राचे ।।
बोलावे बरे । बोलावे खरे ।
कोणाच्याही मनावर । पाडू नये चरे ।।
कोणाचेही वर्म । व्यंग आणि बिंग ।
जातपात धर्म । काढूच नये ।।
थोडक्यात समजणे । थोडक्यात समजावणे ।
मुद्देसूद बोलणे । हि संवाद कला ।।
शब्दांमध्ये झळकावी । ज्ञान, कर्म , भक्ती ।
स्वानुभावातून जन्मावा । प्रत्येक शब्द ।।
शब्दांमुळे दंगल । शब्दांमुळे मंगल ।
शब्दांचे हे जंगल । जागृत राहावं ।।
जीभेवरी ताबा । सर्वसूखदाता ।
पाणी , वाणी , नाणी । नासू नये ।।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जेव्हा विद्वज्जनांकडून एखाद्या सामाजिक घटनेवर प्रतिक्रिया अपेक्षित असते त्यावेळी जर त्यांनी मौन बाळगले तर लोकांना ते आवडत नाही व आता का बोलती बंद झाली असे म्हणून डिवचण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरुन त्यांनी मौन सोडावे व काहीतरी प्रतिक्रिया द्यावी. काही मौन intellectually correct सदरात मोडतात. काही मौन ही सूचक मौन असतात.ट्रोलिंग ला उत्तर देण्यापेक्षा मौन हे योग्य असते त्यामुळे ट्रोलरचा चडफडात होतो.. असहमती दर्शवण्यासाठीही मौन वापरले जाते. शब्द हे शस्त्र असते जपून वापरावे लागते. त्या पेक्षा मौन बरे!

आत्मनो मुख दोषेण बध्यन्ते शुक सारिका।
बक: तत्र न बध्यन्ते।
मौनं सर्वार्थ साधनं।

चांगल्या बोलांमुळे मैना तथा पोपट याना पिंजरयात ठेवले जाते.
पण बगळ्याला पिंजऱ्यात ठेवले जात नाही.

तोंड बंद (मौन) ठेवण्याचे अगणित फायदे आहेत!

भर्तृहरी नीती शतक !

मध्यंतरी नरेंद्र दाभोलकरांच्या नावावर काही विद्रोही कविता अशाच फिरत होत्या.अंनिस वार्तापत्राने या दाभोलकरांच्या कविता नाहीत. दाभोलकर कविता करीत नव्हते. असा खुलासा केला तरीही त्या फिरत होत्या

<< चांगल्या बोलांमुळे मैना तथा पोपट याना पिंजरयात ठेवले जाते.
पण बगळ्याला पिंजऱ्यात ठेवले जात नाही.
तोंड बंद (मौन) ठेवण्याचे अगणित फायदे आहेत! >>
पटले.

एडिट केला ते बर केलत. काही लोक स्वत: च्या नावावर कविता म्हणुन तर काही तुकाराममहाराजांच्या नावावर अभंग म्हणून सोशल मिडियात फिरवतात. नुकतीच मी याची संतसाहित्याचे अभ्यासक व तुकाराम महाराजांचे वंशज डॉ सदानंद मोरे यांचे कडुन खात्री करुन घेतली आहे. संतांच्या नावे प्रक्षिप्त भाग बराच असतो.

ट्रोलिंग ला उत्तर देण्यापेक्षा मौन हे योग्य असते त्यामुळे ट्रोलरचा चडफडात होतो.. असहमती दर्शवण्यासाठीही मौन वापरले जाते. शब्द हे शस्त्र असते जपून वापरावे लागते. त्या पेक्षा मौन बरे!>>>>>अगदीच सहमत. शिवाय मौन राहिले म्हणजे निरुत्तर झाले असे ही नाही. आपल्या पुरता संभाषणाला विराम दिला असे ही असू शकते.