एक तुही अढळ भगवंता

Submitted by राजेंद्र देवी on 26 April, 2020 - 14:02

एक तुही अढळ भगवंता

सारी मानव जात चलबिचल
एक तुही अढळ भगवंता ||

कधी ठेविसी कर कटेवरी
कधी धारिसी मुरली अधरी
शांत पहुडलेला शेषशायी
ना अनाठायी तुज चिंता
एक तुही अढळ भगवंता ||

सहज बाळगी सर्प गळ्याशी
लीलया पेलसी गदा स्कंधाशी
भात्यात असती अमोघ रामबाण
तूच आहेस जगद जननी माता
एक तुही अढळ भगवंता ||

तूच तारणहारी तूच संहारी
तूच सौख्यकारि तूच दुःखहारी
उभा पाठीशी तू भक्ता
काय मागू तुज मी अनंता
एक तुही अढळ भगवंता ||

राजेंद्र देवी

Group content visibility: 
Public - accessible to all site users