शोखियोंमें घोला जाये फूलों का शबाब...

Submitted by अतुल ठाकुर on 24 April, 2020 - 21:45

download_2.jpg

देव साहेब गोल्डीच्या दिग्दर्शनाखाली काम करायचे तेव्हा त्या चित्रपटांचा आणि गाण्यांचा दर्जा फार वेगळा होता असे मला प्रामाणिकपणे वाटते. त्यानंतर सबकुछ देव आनंद होऊ लागले. १९७० साली आलेल्या "प्रेम पुजारी" चित्रपटात तर देवसाहेब नायक, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शकही आहेत. अशावेळी जेव्हा संगीताची बाजु एसडी सारखा कसलेला संगीत दिग्दर्शक सांभाळतो आणि गीतं ही गोपालदास सक्सेना "नीरज" कवीकडून लिहून घेतली जातात तेव्हा एक तर्‍हेचे असंतूलन निर्माण होते. गीत, संगीत अत्युच्च प्रतीचे आणि त्यामानाने दिग्दर्शन त्या पातळीवर न पोहोचणारे. "प्रेम पुजारी" पाहताना हे वारंवार जाणवते. यातील काही गाणी ही त्या गायकाच्या कार्किर्दीतील मैलाचा दगड ठरलेली आहेत. किशोरच्या गाण्यांमध्ये "फूलों के रंग से" टाळता येईल का? खुद्द एस्डी ने गायलेल्या गाण्यांत " प्रेम के पुजारी हम है रस के भिखारी" याचा उल्लेख करावाच लागेल. लताचे "रंगीला रे" तर ग्रेटच आहे. पण हे सर्व डोक्यात ठेवून आपण गाणं जर पाहायला घेतलं तर फारसं काही पदरी पडत नाही.

वहिदा आणि देव आनंद एका ठिकाणी शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतल्यासारखे धावताना दिसतात. या दृष्यात एका ठिकाणी चक्क वहिदा धडपडताना दिसते तरीही हा सीन तसाच ठेवलेला आहे. इतकं धावूनही कुणाला धाप लागलेली नाही. गाणे सुरेल आवाजात सुरुच आहे. इतक्या तरल गाण्याच्या सुरुवातीलाच चमकिल्या मजबूत दातांची जाहिरात केल्याच्या थाटात वहिदा उसाचे कांडे काडकन फोडून खाताना दाखवली आहे. कशासाठी? ठावूक नाही. कपड्याच्या दुकानात जाऊन एकाच तागाने दोघांचे ड्रेस शिवले असावेत इतके ते एकाच लालजर्द भडक रंगाचे आहेत. त्या रंगाचाही डोळ्यांना त्रासच होतो. गवताच्या पेंढ्या असलेले लोकेशनही वायाच घालवले आहे. त्यातून चमकदार असे काही केलेले नाही. एका ठिकाणी मात्र सुरेख संधी होती. अलिकडे काय चूंबन सरळ सरळ दाखवले जाते. पण या गाण्यात ती एक जागा आहे. पण तेथेही देवसाहेब फारसे काही करु शकलेले नाहीत. सरधोपट, आग आणि खळाळते पाणी दाखवले आहे. पण येथे एसडी आणि किशोरने मात्र कमाल केली आहे.

आणि नेमके याचसाठी हे गाणे जबरदस्त झाले आहे.

चुंबन घेण्याच्या क्षणी "वो प्यार..." असे म्हणून किशोरने सार्‍या उत्कट भावना आवाजात आणून ती ओळ अर्धवट सोडली आहे. आणि पुढे एसडीने कमाल करीत सूचक म्युझिक पीसचा वापर केला आहे. ही एकच जागा काही क्षणांसाठी पाहण्याजोगी. कारण वहिदा मचाणावरून खाली वाकलेली असते आणि नायक खालून येतो.....

बाकी वहीदासारखे सौंदर्य असले म्हणजे बर्‍याच गोष्टी सुसह्य होतात हे देखिल तितकेच खरे. पडद्यावर वहीदा म्हणजे निव्वळ नेत्रसूख. देवसाहेबांची मान हलण्यास सुरुवात झालेला तो काळ. त्यांनी फार काही केलेलं नाही. येथे विजय आनंद असता तर बहार आली असती असं वाटत राहतं. त्याने देव आनंदकडून काहीतरी वेगळं करून घेतलं असतं. गाण्यात खरी केमिस्ट्री रंगलेली आहे ती लता आणि किशोर यांचीच.

पडद्यामागील गायक गायिकांची केमिस्ट्री ही पडद्यावरील नायक नायिकांच्या केमिस्ट्रीइतकीच महत्त्वाची गोष्ट असते ही बाब हे गाणं अगदी अधोरेखित करतं. लताचा प्रेयसीचा, प्रीतीने भरलेला, तरल, कोवळा आवाज. काहीसा अवखळ आणि खेळकरही. लता म्हटल्यावर किती लिहू आणि किती नको असं होऊन जातं. स्त्रीच्या या बारीक सारीक भावना लताच आवाजात पकडू जाणे. आणि किशोरने देवाअनंद बनूनच गायिलेलं गीत याच या गाण्याच्या भरभक्कम बाजु. सुरुवातीलाच नीरजजी प्रेमाची रेसिपी सांगतात. प्रेम काय आहे?

शोखियों में घोला जाये, फूलों का शबाब
उसमें फिर मिलाई जाये, थोड़ी सी शराब
होगा यूं नशा जो तैयार, वो प्यार है

बस हेच खरं. काव्याचा आस्वाद घ्या, गाण्यातील संगीताचा आस्वाद घ्या. आणि गायक गायिकेतील सुरेख केमिस्ट्री अनुभवा. काही एका जागेसाठी गाणे पाहायलाही हरकत नाही. कारण गाण्यात वहीदा असली कि आपले लक्ष तिच्याकडेच असते. निदान माझे तरी...

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुलजी मुकेश च्या गाण्यांच्या यादीत ‘यह दिन क्या आयें’, ‘क़ई बार यूँही देखा हैं’ गाण्यांचा उल्लेख करतील असं वाटलं होतं. Happy

बाकी, आ अब लौट चले, जिस देश में गंगा बहतीं हैं, चाँद को क़्या मालूम चाहता हैं उसको चितकोर, जो तुमको हो पसंद, इक दिन बिक जाएगा वगैरे कितितरी वेगळ्या मूडमधली मुकेश ची गाणी आहेत. तेच इतर गायकांबद्दलही आहे.

मुकेशचं कल्याणजी ने रेकॉर्ड केलेलं, एक नॉन-फिल्मी गाणं जे नंतर त्याच्या मुलानं, पंकज उधास च्या आवाजात रेकॉर्ड करून मोहरात वापरलं ते म्हणजे, ना कजरे की धार. यू-ट्यूब वर आहे ते गाणं. संत ज्ञानेश्वर मधलं ज्योत से ज्योत जगाते चलो पण छान गाणं आहे.

सीमंतिनी, वक्त ने किया, कैसे कोई जिए आणि कोई दूर से आवाज दे ही गीताची गाणी लताने श्रद्धांजली या अल्बममध्ये गायलीत. बघा ऐकून. ती कोणाच्या आवाजात अधिक ठसतात का ते?

ओ पी ला आशा सापडायच्या आधी त्याची गायिका गीता होती. प्रीतम आन मिलो, मेरा नाम चिं चिं चु, बाबुजी धीरे चलना यासारखी गाणी दुसर्‍या कोणत्या आवाजात ऐकायला आवडतील का?

अतुलजी मुकेश च्या गाण्यांच्या यादीत ‘यह दिन क्या आयें’, ‘क़ई बार यूँही देखा हैं’ गाण्यांचा उल्लेख करतील असं वाटलं होतं.
फेरफटका खरंच ही दोन गाणी राहिलीच. आभार Happy

वक्त ने किया, कैसे कोई जिए आणि कोई दूर से आवाज दे ही गीताची गाणी लताने श्रद्धांजली या अल्बममध्ये गायलीत. बघा ऐकून. ती कोणाच्या आवाजात अधिक ठसतात का ते?
भरत १००००+ अनुमोदन.

आ जाने जा ... आ मेरा ये हुस्न जवा ...
हे पडदा पेटवणारं गाणं आहे. कँब्रे फक्त आशाच गाऊ शकते या समजूतीला सणसणीत अपवाद असणारं गाणं.

आलं मुकेश हिट्स शोधताना या गाण्याचा शोध लागला.

रुक जा व जानेवाली रुक जा!!!
अप्रतिम, स्पिडी आणि त्याचबरोबर जबरदस्त म्युजिक.

श्रद्धांजली ऐकली आहे. त्या बाबतीत भरत आपल्याशी एकमत आहेच असं वाटतयं. मी देखील "ती गाणी लता, आशा ह्यांनी म्हणायला हवी होती असे कधी वाटले नाही इतक्या चपखल वाटल्या" असंच तर लिहीले आहे. नक्की मुद्दा काय आहे आपला? आपल्याला लताने म्हणलेली आवडली का? तसं असेल तरी ठीकच आहे. पसंद अपनी अपनी....बाकी ह्या चर्चेच्या निमीत्ताने अनेक आयडींनी अनेक गाण्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मस्त....

आँ? आपण दोघेही एकाच भाषेत लिहितोय ना? तुम्ही गीताला वन साँग वंडर म्हणालात. त्यावर मी हे दाखले दिले की ही इतकी सारी गाणी गीताचीच होती.

माझ्या मते लता आशा नंतर स्व तंत्र मोहोर उठवलेली गायिका गीताच. शमशादच्या आवाजामुळे तिला विशिष्ट प्रकारचीच गाणी गावी लागली असं म्हणता येईल.
वन साँग वंडरचं चपखल उदाहरण म्ह णजे मुबारक बेगम. तिची इतर कोणतीही गाणी , कभी तनहा इयोंमें इतकी गाजली नाहीत की ही तिच्यासाठीच बनलीत असं वाटलं नाही. हे गाणंही तिला नशिबानेच मिळालं. आता हे त्या गाण्याचंच नशीब म्हणायला हवं.

आणखि एक
अफसाना लिख रही हूं ....उमादेवी
तुम अपना रंजो गम....मीना कपूर
आपकी याद आती रही...छाया गांगुली

कुठेतरी ऐकलंय. बर्मनदा गाणं रेकॉर्ड व्हायच्या आदल्या दिवशी गायकांना फोन करून त्यांचा आवाज फोनवर ऐकत असत. काही क्षणच. त्यांच्या गायकांना त्यांची ही सवय माहित होती. काय कारण असेल? जाणकारच सांगू शकतील.

गोल्डी, सचिनदा आणि फली मिस्त्री हे कॉम्बिनेशन जबरदस्त होतं. किंबहुना देव आनंद पेक्षा ह्या तिघांमुळेच सिनेमे प्रेक्षकांनी उचलून धरले आणि नवकेतनला चांगले दिवस दाखवले. नाहीतर फक्त देव आनंद चा अभिनय कोणताही सिनेमा तारून नेणे केवळ अशक्य!
मात्र त्याकाळी देव आनंदने हुशारीने गायकांच्या तत्कालीन प्रसिद्धीचा योग्य फायदा करून घेतला. म्हणजे, ज्यावेळी हेमंतदा फॉर्म मध्ये होते तेव्हा त्यांचं पार्श्वगायन, तेच तलत, रफी आणि किशोर कुमार बाबतीत.

मला वाटतं सुरुवातीच्या काळात कोणतं गाणं कोणाला द्यायचं याचा निर्णय सर्वस्वी संगीतकाराचा असे. आणि हे संगीतकारही या स्टार्स इतकेच मोठे होते. त्यामुळे देव आनंदने गायकांच्या प्रसिद्धीचा फायदा करून घेतला असं म्हणणं चूक आहे.

शिवाय पडद्यावर शेवटी देवच दिसणार होता. त्यामुळे लोक त्याला पाहायला येत नव्हते, असं म्हणणंही पटलं नाही. अभिनयाशिवाय सुपर स्टार झालेली उदाहरणं अजूनही आहेत की.

कुठेतरी ऐकलंय. बर्मनदा गाणं रेकॉर्ड व्हायच्या आदल्या दिवशी गायकांना फोन करून त्यांचा आवाज फोनवर ऐकत असत >>>
मी हे किशोर कुमारच्या बाबतीत ऐकलं आहे. अमित कुमार हा किस्सा सांगतो.
बाकी सचिन दा, नय्यर साहेब, लक्ष्मी प्यारे आणि शंकर- जयकिशन ह्यांचा रफी वर प्रचंड विश्वास होता. राज कपूर, देव आनंद वगैरेंनी जेव्हा रफी सोडून इतर गायकांचा आग्रह धरला तेव्हा नाखुशीनेच त्यांनी तो मान्य केला होता, असे किस्से ऐकून आहे.

Happy नाही हो, गीता दत्तला वन साँग वंडर म्हणण्याइतकी इंग्रजाळले नाही अजून... अमांच्या 'लता समर्थ आहे' ला उद्देशून मी चार-पाच उदाहरणे दिली की
लता समर्थ असली त्या त्या गायिका त्या त्या गाण्यात चपखल वाटल्या. त्या यादीतल्या काही वन-साँग-वंडर होत्या इतकंच. Happy
हो, मुबारक बेगम आहेच. अजून उदाहरणे हवी असतील तर 'चोरी चोरी जब नजरें मिली' मधली संजीवनी किंवा 'ओ री छोरी' मध्ये वसुंधरा दास. रिजनल भाषात प्रसिद्ध असतील पण हिंदी नाही गायल्या. मात्र एक अविस्मरणीय (किंवा स्मरणीय) गाणे देवून गेल्या.

मना डे यांची काही गाणी वानगीदाखल-

कौन आया मेरे मन के द्वारे - देख कबिरा रोया
ना मांगूँ बंगला गाडी - बॉबी
लपक झपक तू आ रे बदरवा - दो आँखे बाराह हाथ
मूड मूड के देख ना
अपने लिए जिये तो क्या जिये

सुमन कल्याणपूर -
ना तुम हमें जाने, ना हम तुम्हे जाने
आज कल तेरे मेरे प्यार की चर्चा

आज कल तेरे मेरे हे सुमनने शारदासारखं गायलंय.
न तुम हमें मध्ये आवाज कधीही चिरकेल असं वाटतं.

मला आवडलेली दोन गाणी
शगुनमधलं बुझा दिले हैं खुद अपने हाथों मोहब्बतों के लिये जलाके
आणि जहॉंआरातलं बाद मुद्दत के ये घडी आयी.

मला सुमन कल्याणपूर यांचं प्रचंड आवडणारं गाणं फरियाद मधील आहे..हाले दिल उनको सुनाना था...संगीत स्नेहल भाटकरांचं आहे यासाठी आणखी आवडतं. Happy

मन्नाडें + लताजीच ' तुम गगन के चंद्रमा' हे गाणं मला आवडतं.
मेहमूदला मन्ना डेंचा आवाज एकदम छान सूट होत असे, जसे पडोसन मधील गाणी.

लेख मस्तच.

एक सुधारणा “तुम अपना रंजो गम....मीना कपूर”
हे गाणे जगजित कौर यांनी गायले आहे. स्वर्गिय खय्याम यांची पत्नी. त्या पंजाबीमधील प्रसिद्ध गायिका
होत्या. 

मला असे वाटते की दर्द सगळ्याच गायकांनी सुंदर व्यक्त केलाय. उदा. रफ़ीचे “यहां मै अजनबी हुं", तलतचे
"शाम-ए-गम की कसम", किशोरचे "मंझिले अपनी जगह है".

तसेच मुकेशनेही. फक्त त्याची जातकुळी किंचीत वेगळी. थोडीशी उपरोधिक, स्वतःला दोष देणारी. तो जेव्हा
"मेरे टुटे हुए दिल से" मध्ये म्हणतो की "सदा आज़ाद रहते थे, हमें मालुम ही क्या था मोहोब्बत क्या बला है" किंवा "सब कुछ सीखा हमने ना सिखी होशियारी" किंवा “तेरी जफ़ा का चर्चा ही कैसा अपनी वफ़ा पर में शरमा रहा हूँ” तेव्हा डोळ्यात जखमी भाव घेउन ओठाच्या कोपर्यातुन कडवट हसणारा राज कपुरच दिसतो. मुकेशच्या निधनानंतर राज कपुर म्हणाला होता की काय बोलु? माझा आवाजच गेला.

अर्थात त्याची इतरही काही गाणी आवडीची आहेत, "वो तेरे प्यार का गम, एक बहाना था सनम", "चले जाना जरा ठेहरो" (या गाण्यात शारदा गायला लागली कि मात्र कान बंद करा.), "जिस गली में तेरा घर ना हो बालमा"

@ सीमंतिनी
वन सॉंग वंडर मध्ये श्रीराधा बॅनर्जींचे हे "लबों से चुम लो, आंखो से थाम लो मुझ को" गाणे जरुर ऐका.

शाम ए गम की कसम हे तलतने गायलं आहे.
तलतचं सीने मे सुलगते हैं अरमान हे बेफाट आहे. लिरिक्स, चाल आणि आवाज एकाहून एक सरस. सीने में सुलगतेचं मराठीत भाषांतर करायचं झालं तर ते कसं उतरेल या प्रयत्नात मी छंद aणि चाळा म्हणून बराच वेळ घालवला आहे. असंच एक दुसरं गीत म्हणजे ऐ चांद मुबारक हो तुम्हें रात सुहानी. मराठीत कसं वाटेल?

एक सुधारणा “तुम अपना रंजो गम....मीना कपूर”
हे गाणे जगजित कौर यांनी गायले आहे. स्वर्गिय खय्याम यांची पत्नी. त्या पंजाबीमधील प्रसिद्ध गायिका
होत्या.

येस. माझा हा गोंधळ नेहेमी होतो. माझ्या डोक्यात अनिल विश्वास यांच्य पत्नी मीना कपूर यांचं "कुछ और जमाना कहता है " हे गाणं आहे. त्यांनाही बहुधा वन साँग वंडर म्हणता येईल.

असंच एक दुसरं गीत म्हणजे ऐ चांद मुबारक हो तुम्हें रात सुहानी. मराठीत कसं वाटेल? >> ह्या गाण्याला थोडा धार्मिक भाग आहे. तेव्हा शब्दशः भाषांतराच्या मागे उगाच चांगला चाललेला धागा भरकटायला नको. मराठीत ह्या भावनेच्या आसपास "ही कशाने धुंदी आली" गाणे आहे. एकदम गोड पण यूट्यूब वर पाहिलं तर राजा गोसावी... जळ्ळं नाय त्या गाण्यांचं रिमिक्स करतात, इथे रिमिक्सची गरज आहे तरी गश्मीर ते रितेश देशमुख एक जण मनावर घेईना...

नौशिरवान ए अदिल मधलं ते गाणं आहे. त्याची पार्श्वभूमी माहीत आहे. पण त्याचे शब्द किती सुंदर आहेत इतकंच ठळक करायचं होतं. त्यात धागा काय भरकटणार!

नौरशेरवान इ आदिल मधल्या त्या नरम मुलायम गोड गाण्याला फक्त व फक्त प्रेमाचा संदर्भ आहे. माला सिन्हा माझ्या आवडत्या यादीत नव्हती कधी पण यात ती प्रचंड गोड दिसते. या चित्रपटात एकसोएक गोड गाणी आहेत. राजकुमार पण प्रिन्स चारमिंग दिसतो अगदी. कित्येक वर्षे झाली चित्रपट पाहून. कुणी याची digitalized व्हर्जन केली तर उपकार होतील. नाहीतर धुरकट फिल्म बघावी लागते यु ट्यूबवर.

https://www.youtube.com/playlist?list=PL0N5Xw9ii8-_YUByD6V36FkvObcmavBqJ

Pages