कफर्यु

Submitted by दधिची on 23 April, 2020 - 13:16

केवढा तो कल्लोळ , कसला हा आकांत
जरा बस निवांत अन अनुभव हा एकांत
बघ जरा खिडकीतून भवताल हा फुललेला
पूर्वेच्या कुशीत नारायण तो झुललेला
भरून घे उरात वारा थंड सुटलेला
सोडून दे उसासा उगीच मनात साठलेला
पाखरांच कूजन साठव जरा कानी
ऐकावीत कधी-मधी आदिम ती गाणी
चहाचा कप घेऊन बाल्कनीत उभा राहा
घोट घोट आयुष्य चवीने पिऊन पहा
बघ कसा स्तब्ध आहे आसमंत सारा
तुझ्यासाठीच आहे हा दिगंताचा पसारा
घराचे भिंती कोपरे नीट निरखून घे
अस्तित्व तुझे इथे नव्याने सोडून दे
अचाट तुझ्या कल्पना स्वयंपाक घरात घेऊन ये
खमंग वास त्यांचा संपूर्ण घरात दरवळून दे
आई बाप , बायका पोरे यांच्यात जाऊन बस
बरे आहेत ते हि बिचारे एकदा बोलून तर बघ
देसाई, नेमाडे अन माडगूळकर काढ बाहेर कपाटातून
नको सोडू विंदा, पाडगांवकर तुझ्या या झपाट्यातून
ऐक जरा सूर रफी-लता अन किशोरीचे
साठव शब्दन शब्द भटांच्या लेखणीचे
आयुष्य इथेही सुंदर आहे घरात बसून बघ
फक्त थोडे दिवस जिंदगी वर कर्फ्यू लावून जग ||
~दधीची

Group content visibility: 
Public - accessible to all site users