केला विजांनी जो नाद आहे

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 19 April, 2020 - 10:53

केला विजांनी जो नाद आहे
का तो नभांचा उन्माद आहे

आक्रोश होता की गर्जना त्या
की काळजा काही साद आहे

केली पुढे वावा फार त्यांनी
गेली म्हणे मागे ब्याद आहे

मी टाळतो तेव्हा आरसाही
माझाच माझ्याशी वाद आहे

रंगात येतो ना डाव काही
चाली अता खऱ्या बाद आहे

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त:
स्वानंदसम्राट (गागालगागा गागालगागा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users