डोम्बअरी ( कविता)

Submitted by Muzaffar on 26 April, 2009 - 04:45

डोंबारी

"लटपटत्या पावलांनी
मनात तुझे चिंतन करीत
जीवनाच्या तारेवर
आशेचे बांबू सावरीत
चालतोय मी...

बघताहेत लोक, बघू देत
हसताहेत, हसु देत
मीच केलाय माझा तमाशा!
तू नाही ना हसणार ?

फुल ? कसली फुल ?
केव्हांच गेलीत कोमेजून
काटे आहेत ना!
तुझ्या स्मृतींचे!
मनात सलणारे,
बोचणारे काटे!

लाल भडक रक्ताने
माखलेले काटे!
त्यांच्याच भांडवलावर
जगतोय मी!

- मुजफ्फर शेख "

गुलमोहर: 

ड. शेख मुझफ्फर सलीम,
ख्ररे आहे, सरावने शिकेन कीबोर्ड. प्रतिसदा बद्दल ध्न्यवद!

मुजफ्फर कविता छान आहे.......!
सुहास शिन्दे

न् म स कार सुहअस, किबोर्ड जम् त न स ल्या ने कविते च बट्ट्य बोळ झअल रे.
आज म् द त पुस्तकअ च प्रिन्ट घेत् ल आहे. आता अभ्यअस कर् तो घरी जऊन. मित्रअं ना वअटेल
मला शुध लेखन येत नही. धन्यवअद .

खुप छान कविता ! आवडली ! मुगले आझम मधील कव्वालीची आठवण झाली . धन्यवाद !

मुजफ्फर भाई बहोत खुब...........
**********
मी या जगाचा नागरिक आहे.

छान आहे. येथे दोन संकल्पना एकत्र केल्यासारखे वाटते आहे, हो का?
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
"छान आहे. "

अरे व्वा, आपण शेजारी की हो. येवा मग बहारीनला. चांगली सुरवात आहे.

जीवनाच्या तारेवर
आशेचे बांबू सावरीत...
छानच!