Umbilical Hernia सर्जरी शिवाय त्रास टाळता येऊ शकतो का?

Submitted by शैलपुत्री on 15 April, 2020 - 07:27

मला गेली ५ वर्षे झाली डिलिव्हरी झाल्यापासून umbilical Hernia चा त्रास होत आहे. आधीच 2 वेळा c section झाल्यामुळे पुन्हा सर्जरी करायचं जिवावर आले होते. डॉक्टरानी सल्ला दिल्याप्रमाणे १० किलो वजन सुद्धा कमी केले आहे. त्यामुळं सतत होणारा त्रास कमी झाला. महिन्या दोन महिन्यातून कधीतरी पोट दुखते पण दिवसभरात बरे पण वाटते.

पण गेली ४ दिवस झाले सलग पोट दुखत आहे. नेहमप्रमाणेच यावेळी पण डॉक्टर सर्जरी चा सल्ला देणार. सर्जरी टाळता येणार नाही का? मला भीती वाटते सर्जरीची. आणि असं ऐकलंय की सर्जरीनंतर पण परत दुसरीकडे hernia develop होतो.

प्लीज कोणाचे काही अनुभव असतील तर शेअर करा. तसेच जाणकारांनी पण प्रकाश टाकावा ही विनंती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोठा आकार असेल
खोकताना, टॉयलेट , यूरिन करताना आकार फार मोठा होत असेल
तर सर्जरी ह्याच उपाय

कम्पनिची पॉलिसी असेल तर इन्शुरन्स कव्हर होईल
इंडिविजुअल पॉलिसी असेल तर हर्निया पूर्वीच्या सीजर ने झाला म्हणून उडवून लावतील

माझ्या बेंबी मध्ये हरनिया झाला होता.
१/२ cm (ardha centimeter) बेंबी वर आली होती.
टेस्ट केली तर mild hernia आहे असा निष्कर्ष निघाला.
बाकी त्रास काहीच नव्हतं कधी तरी दोन तीन महिन्यातून एकदा तीन चार मिन पोट दुखायचे नंतर आपोआप थांबायचे.
सर्जरी करावीच लागेल असे डॉक्टर ठाम पण सांगत नव्हते पण सर्जरी करून घ्या नंतर त्रास नको असा सल्ला दिला होता.
आयुष्यात पहिलीच वेळ होती सर्जरी ची शेवटी कुटुंबातील सर्वांचे मत सर्जरी करावी असे पडले .
डॉक्टर (फॅमिली डॉक्टर च) चा परत सल्ला घेतला एका दिवसात घरी सोडतील घाबरु नका असा विश्वास दिला.
मग
त्यांच्या सल्ल्या नी त्यांनी सुचवलेल्या दवाखान्यात दुपारी दाखल झालो.
सर्व आवश्यक टेस्ट केल्या गेल्या.
Sugar,blood pressure kahi नसल्या मुळे काही अडचण नव्हती.
मस्त रूम होती सर्व सोयींनी युक्त स्टाफ पण खूप चांगला होता.
दुसऱ्या दिवशी ऑपरेशन थिएटर मध्ये घेवून गेले भुल देणारे,सर्जरी करणारे,नर्स सर्व हजर होते.
भूल देणाऱ्या स्त्री डॉक्टर होत्या पाठी च्या मनक्यात इंजेक्शन दिले गेले त्या माझ्या डोक्याच्या बाजूला उभ्या होत्या हळू हळू ठराविक हिस्सा बधीर झाला मी सर्व बघू शकत होतो डॉक्टर ूऑपरेशन करताना गप्पा सुद्धा मारत होते.
ऑपरेशन पूर्ण झाल्यावर डॉक्टर च्या लक्षात आले एका जाळी ऐवजी दोन जाळ्या टाकल्या गेल्या आहेत पण ते फायद्याचं होते.

भूल उतरल्या वर तीव्र वेदना होत होत्या एका कुशी वरून दुसऱ्या कुशी वर वळणे पण शक्य नव्हत.
सौ २४ तास बरोबर होत्या सर्व काळजी घेत होत्या .
एक दिवस ठेवल्या नंतर दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला.
जखमेवर लावण्यास powder (konti त्याच नाव माहीत नाही) दिली होती .
अपेक्षा पेक्षा लवकर जखम भरून आली टाके काढले गेला .
तीन वर्ष झाली अजुन तरी परत काही त्रास नाही.
जखम भरून येईपर्यंत धोका असतो.
जखम चिघळली तर मात्र गंभीर स्थिती निर्माण होवू शकते.

२२mm साईझ आहे हर्नियाची. आत्ता जाऊन आले डॉक्टर कडे. Ultracet tablets दिलेल्या आहेत. असंही lockdown period मध्ये सर्जरी करता येणार नाही बोलले. इन्शुरन्स मध्ये कव्हर होतंय सो ते टेन्शन नाही. पण मलाच सर्जरी नको वाटतीये. गरज आहे तर करावीच लागेल म्हणा.

नौटंकी तुमचा प्रश्न सर्जरीपेक्षा त्या दोन सिझेरियनशी रिलेटेड आहे असं वाटतं. तुम्ही डॉ. ला विचारा त्याने कुठली रिस्क वगैरे आहे का? मग तुम्हाला बरं वाटेल डिसिजन घ्यायला. टेक केयर.

हो बरोबर आहे. पण तुमचा डॉ. यावर तुम्हाला माहिती देऊ शकेल. मी पहिल्या सि नंतर नॉर्मल करताना डॉ.नी बरंच एज्युकेशन केलं होतं. (मन वळवायचा प्रयत्न वगैरे) अर्थात शेवटी ती नॉर्मल केली पण त्यांनी सी ची तयारी केली होती. मी तेव्हा का तसं केलं माहित नाही. पण येस इट वॉज अ रिस्क आय टूक. पेपर्स साइन करा वगैरे. पण ते शक्यच नसतं तर डॉ. नी देखील केलं नसतं. हेच सांगायला हे उदा. दिलं. सो स्पष्ट विचारा तेही माहिती देतील.

वेका, बरोबर आहे तुमचं. डॉक्टर पण असच बोलतात की तुम्हाला त्रास वाटत असेल तरच सर्जरी करा. नाहीतर जसे सुरू आहे तसे ठीक आहे फक्त खूप जड वस्तू न उचलणे, सिट अपस किंवा पोटावर ताण येईल असे व्यायाम न करणे अशा काही गोष्टींची काळजी घ्यायला सांगितली आहे.

आणि अगदी माझ्या भाषेत सांगायचं तर मला पुन्हा पुन्हा शरीराची चिरफाड करून घ्यायची इच्छा नाही. Happy सो खरंच गरजेचं असेल तर करीन.

माझ्या नवऱ्याचे hiatus hernia ची सर्जरी झाली मागच्या वर्षी मार्च मध्ये.
त्याच पित्त वर यायचं esophaugus diameter मोठा असल्याने (3cm) आणि तो खूप पथ्यावर होता त्या त्रासामुळे तूर डाळ, चणा डाळ, चिंच, टोमॅटो, डीप फ्राईड सगळे पदार्थ ई. ई आम्ही खूप अव्हॉइड करायचो. सर्जरी झाल्यावर एक महिन्यांनी वाटलं सगळं खाता येईल.
पण कसलं काय सर्जरी नंतरही त्रास होतंच राहिला.
आम्ही पुण्यामधल्या दीनानाथ मधल्या सगळ्या डॉक्टर्स ना दाखवले.
आम्हा दोघांना खूप त्रास झाला.
एका पॉईंट ला वाटलं सर्जरी नसती केली तर बर झालं असतं.

सीझर सर्जरी डीप असते

हर्निया सर्जरी त्यामानाने सुपरफिसल असते , त्यात घाबरण्यासारखे नाही
उलट त्या 2 सर्जरीने जो विकनेस आला आहे , तो जाळी घातल्यावर कमी होईल,

सीजर सर्जरी म्हणजे गाडीचे टायर इनर बदलण्या इतके मोठे काम,
हर्निया म्हणजे पंक्चर काढून पॅच लावणे
( हे विधान फक्त या केस पुरते आहे .
हायटस हर्निया, आतडीला पीळ पडून हर्निया कॉम्प्लिकेट होणे वगैरे फार अवघड शस्त्रक्रिया असतात.)

माझ्या मुलाची वयाच्या तिसऱ्या वर्षी सर्जरी झाली होती. त्याला त्रास काही नव्हता आणि आम्हालाही कधी काही वेगळं जाणवलं नव्हतं. पण त्याच्या डॉक्टरांनी टेस्टीकल्स बघून हार्निया आहे आणि सर्जरी करावी लागेल सांगितलं. आम्ही दोघेही वयाने लहान होतो त्यामुळे घाबरून गेलो, सेकंड ओपिनियन घेतलं नाही कारण लहान मुलांचे सर्जन डॉ गोविंद दातार आहेतच तसे. फारच उत्तम डॉक्टर आणि खूप छान माणूस.

आता खूप वर्ष गेली आहेत. तो शाळा, zp आणि आंतरराष्ट्रीय क्लब असा बऱ्याच ठिकाणी फुटबॉल खेळला आणि खेळतो. त्याला नन्तर कधीच काही त्रास झाला नाही, त्यामुळे तेव्हा घेतलेला निर्णय योग्यच असावा.

हल्ली ओपन सर्जरी न करता लाप्रोस्कॉपीक करतात त्यामुळे रिकवरी लवकर होते. सी सेक्शन पेक्षा नक्कीच कमी त्रास होतो.
सध्या तुम्ही आधारासाठी बाईंडर वापरू शकता.

लहान मुलांच्या हर्नियाला congenital henia म्हणतात, म्हणजे जन्मजात असतो
हर्निया होतो म्हणजे भिंतीचा एखादा भाग कमकुवत होते, मग त्याच्या आत जे आहे , ते दाबाने बाहेर येऊ लागते , म्हणून फुगवटा येतो, म्हणजे उशी फाटली , उसवली की कापूस कसा बाहेर येतो तसे , मग त्यावर उपाय म्हणजे ते शिवणे किंवा कापडाचा तुकडा घालून शिवणे
असा कमकुवतपणा एखाद्या ठिकाणी सतत च्या सर्जरीने होऊ शकतो
किंवा काही वेळेला जन्मजात असतो

हर्निया ची सर्जरी जर वेळेवर केली गेली नाही तर भयंकर वेदना सहन करण्याची तयारी सुद्धा ठेवायला हवी.
हर्णीया वाढला आणि त्या मध्ये शरीरातील आतला अवयव जर फसला आणि चीमटला तर गंभीर स्थिती येवू शकते

तुम्हा सर्वांच्या प्रतिसादामुळे सर्जरी बद्दल सकारात्मक मत तयार झालय. BLACKCAT, तुम्ही सिझर आणि मला करायला लागणाऱ्या सर्जरी मधला फरक एकदम सोपा करून सांगितला. माझा सगळा गोंधळ दूर झाला. Prashant तुमचा सर्जरी वेळेवर करण्याचा सल्ला पण अगदी पटलाय. Lockdown संपल्यावर नक्कीच वेळ न घालवता हा प्रश्न निकालात काढीन. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. Happy