टीप - १. अतिविस्तारभयास्तव खालील धागाकर्त्याचे प्रतिसाद गाळले आहेत, मात्र त्याच्या डूआयडीचे प्रतिसाद असू शकतात
२. सदर लेखाचा व प्रतिसादांचा मायबोलीच्या कुठल्याही धाग्याशी अथवा आयडीशी संबंध नाही. असल्यास.... योगायोग तर नक्किच नाही.
(ह.घ्या. ही विनंती)
लॉकडाऊन मध्ये काय करावे?
Submitted by तुमचा मेंढा on 15 April, 2020 - 21:00
पंतप्रधानांनी जेव्हा लॉकडाऊनची घोषणा केली, तेव्हा माझ्या संपूर्ण ऑफिसात धावपळ उडाली. वर्क फ्रॉम होम हा आमच्या फिल्डमधील फार अवघड प्रकार आहे (यावर धागा काढलाय, पुन्हा वाद नको, की नवीन धागा का काढला नाहीस. हा धागा वेगळ्या कामासाठी काढलाय. पण दोन वेगवेगळे धागे काढावे की एक धागा काढावा असा फार मनात डायलेमा होता. यावर वेगळा धागा काढावा का?)
तर आता मूळ मुद्यावर येतो. परवा माझ्या ऑफिसातल्या एका कलीगला कामानिमित्त फोन केला, तर तो म्हणतो, "कशाला काम? एन्जॉय द लाईफ. युह आर सो सिरियस."
यावर मी त्याला म्हणालो की ज्या कामामुळे मला दोन वेळेचं जेवण आणि मनसोक्त नॉन व्हेज खायला मिळतं, ते काम न करणं माझ्या तत्वात बसत नाही. यावर त्याची बोलती बंद होऊन त्याने फोन कट केला.
मात्र आजकाल याचा फार ताण यायला लागलाय. गर्लफ्रेंड म्हणते लॉकडाऊन नंतर मोबाईलवर GST वाढणार आहे, तर आताच मोबाईल घेऊ, तेही जमत नाही. पूर्वी आपला बॉस जगन्नाथ म्हणून ऑफिसमध्ये त्याची लाल करावी लागायची, आता घरी केव्हाही फोन आला तरी करावी लागते. रात्री अपरात्री केव्हाही फोन येतो. घरात मुलांनाही वेळ देता येत नाही. हा मात्र शाहरुखचा चित्रपट लागला, तर मी कुणाचाही कॉल घेत नाही. ही इज द किंग ऑफ द बॉलीवूड!
....मात्र सगळ्यात वाईट गोष्ट घडलीये, ती म्हणजे मला मायबोलीवर येता येत नाहीये.
पूर्वी मी रात्री माझ्या आवडत्या मायबोलीवर अनेक लेख टाकायचो. आता वर्क फ्रॉम होममुळे ते जमत नाही. कारण रात्रीही ऑफिसची कामे निघतात. केव्हाही कुणाचंही काम निघेल अशी कायम भीती असते.
...आणि ऑफिस अवर मध्ये मायबोली उघडण आपल्या तत्वात बसत नाही. तत्व म्हणजे तत्व...
पण मग असं वाटत, की ऑफिसने आपल्या पर्सनल लाईफवर अतिक्रमण केलंय, तर आपणही ऑफिस अवर मध्ये पर्सनल लाईफ जगूच शकतो असा खूप मोठा डायलेमा तयार झालाय.
लॉकडाऊन मुळे तुमच्या आयुष्यात असं काही वादळ आलंय का???
सेम प्रॉब्लेम असणार्यांसाठी चर्चा करायला हा धागा!
प्रतिसाद!
------------------------------------------------------------------
ओ, हो हो हो, ओ हो हो हो इशक तेरा तडपावे - कोकलत
मलासुध्दा सेम सिच्युएशन. सायकॉलॉजीकल. अधूनमधून गाणी ऐकते. रॉक सोंग्स. नाचतेही. मध्येच पपी येऊन भुंकून जातो. नॉटी बॉय. इकडे हैद्राबादला कलकलाट असतो गाड्यांचा. एन्जॉयड इट. वर्क फ्रॉम होम. नॉट बिग डील.
- रोमा
मला बटाटे बिलकुल आवडत नाही. लोकडाऊनमुळे तेच खावे लागतात. मेंढ्याला अनुमोदन - वाटाणाप्पा
मलाही लॉकडाऊनमध्ये काम करता येत नाही, पण मांजर काम करत नसली की बोका शेफरतो याचा अनुभव असल्याने शायनिंग मारायला दहा बारा इमेल फॉरवर्ड करून ठेवते. - तू_कोण
पुरुष वर्क फ्रॉम होम करू शकत नसल्याने स्त्री जातीवर किती लोड येतो, याचा डेटा मिळू शकेल का? - टॅमी
ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने बघायला गेलं, तर हा लॉकडाऊन उपयुक्त सिद्ध होऊ शकतो. मी पियरो गोरकीनला फॉलो करतेय. ही इज बेस्ट. त्याचे लेक्चर मनशांती देतात. धागा चांगला आहे. - रेमो
मला तर वेळच वेळ आहे, कालच केक केला - चावी
छान धागा, केकची पाककृती दे ना चावी - रिद्धी
थांब ग, धागाच काढायचा विचार करतेय. आता यावरून मला धागा धागा विणतेय असं चिडवू नका. - चावी
मी भरपूर केर काढला घरातला. आता नवऱ्याला कामाला लावतेय. अरेच्या कुठे गेला? थांबा आलेच - (मला समस्त स्त्री आयडीकडून मार खाण्याची बिलकुल इच्छा नाही. )
शेटला सांगा, लोकडाऊन हटव. सगळे प्रॉब्लेम संपतील - पांढरा बोका
आणि तुझ्यासारख्याना रान मोकळं, कंपाउंडर - तू तुझा
सगळे प्रॉब्लेम नाही, सगळे संपतील बोक्या - सद्विवेक
आताच डेटा बघितला. लॉकडाऊन मुले इतक्या लोकांच्या नोकऱ्या जाणार. ही बघा लिंक, आणि सरकार नवनवीन खेळ खेळतय - ठरत
तुझ्या त्या बाईकडे काय हालहवाल? - तू तुझा
इथे आता कोण मोदींच्या बाजूने, आणि कोण विरुद्ध याची यादी तयार करावी का? - रेमो
माझ्या प्रश्नाच उत्तर कुणीही पुरुष देऊ शकत नाही, म्हणून कल्टी - टॅमी
घरात बसून मला तर काही प्रॉब्लेम नाही, बायको मात्र जरूर वैतागली आहे - वाटदाव्या
माननीय मोदीजीनी लॉकडाऊन केला, म्हणून आज भारत वाचला. रामायण महाभारत पुन्हा प्रक्षेपित करून त्यांनी जगण्याचा मार्ग सुकर केला - कोण?सोहम!!!
खरं बघायला गेलं, तर मला धर्मात इंटरेस्ट नाही. अध्यात्मिक आहे, पण स्वतःची वाट स्वतः शोधण्याचा प्रयत्न करतेय इ. इ.......... - साधीनिशा
म्हसोबानो, तुमचा शेट तिथे खेळ करतोय, आणि देश खड्यात घालतोय.
तुम्हाला त्याच काय?
थुकून चाटायची लायकी.
- अरारारारारारा खतरनाक....
ओ उडणे वाली हवा जरा, जरा मेरे बॉस के पास जा, ऊसे बोल दे, की तू गाव को जा, और मार खा! - कोकलत
कोकलत बॉस अमानवीय की काय? - महाज्ञानी
छान धागा. मलासुध्दा खूप बोर.........होतंय - सन्याSSSSSS
तुझ्या शाहरुख, स्वप्नील ला व्हिडीओ कॉल लाव की - सहस्त्ररश्मी
मला विरोधासाठी विरोध नाही करायचा, पण मी हा लॉकडाऊन पाळणार नाही, यासाठी माझी वैयक्तिक कारणे आहेत. - अगगगगा
मुळात घरातच जास्त काळ राहिल्याने ... नावाचा मानसिक आजार होतो. मी ... मध्ये असताना अशी बरीच उदाहरणे बघितली. यावर .... प्रभावीरित्या काम करते - दासबोध
हा मानसिक आजार आहे ही बिग बॉस वाल्यांनाही कळत - पांढरा बोका
कंपाउंडर ला कळत का? - दासबोध
नाही वैद्यांना कळत - अगगगगा
मी .... मधला निवृत्त डॉक्टर असून तुम्ही मला वैद्य म्हणून हिणवतात. तुमच्या बुद्धीची कीव कराविशी वाटते.
असो माझा शेवटचा प्रतिसाद. - दासबोध
Mala asa watat, lockdown ha changala nirnay nahi. Tyache wait parinam hotil. - कानबाई
बाईंचा कीबोर्ड बिघडला वाटतं - तू तुझा
हॅव अ फन - क्रर्क्स
मोटोरोलाचा नवीन मोबाईल लाँच होणार होता. दणकट फोन. स्टॉक अँड्रॉइड. लॉकडाऊनमुळे लवकर लाँच होणार नाही आता - tse
शाहरुख तर किंगचा किंग! - @warda
सहस्त्ररश्मी, या मेंढ्याशी डोकं लावण्याची ताकद असल्याबद्दल सलाम - सुपरस्मित
हायला मजा मारायची सोडून लॉकडाऊन वर चर्चा काय करत बसले - समितन
हो ना, आमच्या ह्यांचा हा किती हे झालाय बघ - स्नोव्हाइट
सुप्रभात डोंबिवली. अरेच्या गल्ली चुकली. बारक्या थांब, आलेच - वेध
इबा आजकाल दिसत नाहीत. मी इमाजिन करतोय, लॉकडाऊन मुळे आणि त्या धाग्यामुळे त्या विषकन्या बनायची तर रेसिपी शोधत नसतील - डेडएन्ड
हममे इतना जहर है, की विषकन्या बननेकी जरूरत नाही. बादवे व्हाईटे, ती फालतू कविता वाचलीस का - इबा
जगात काय फालतू नसतं. माझा तर वेळ फालतू कामातच जातो - फांद्या
मोदीजीना विरोध करण्यासाठी विरोधक कशाचाही वापर करतात.
फकीर!
- फकीर
आमच्या युनायटेड स्टेटस ऑफ कोथरूड मध्ये योग्य उमेदवार भाजपने दिला नाही याबद्दल राग आहेच. लॉकडाऊन मात्र मास्टरस्ट्रोक - नवनव
लॉकडाऊन मुळे पक्षी निरीक्षण करता येत नाही. जुन्या बाजारातही जाता येत नाही. सध्यातरी दुपारी शांतपणे जुनी गाणे ऐकणे व चित्रे रेखाटत बसणे हाच उद्योग करतोय. - हरहर
हिंदुत्व आणि सरकार या टोटली वेगळ्या संकल्पना असून त्यांची गल्लत केल्याने एक विशिष्ट विचारसरणी नाराज झाली व नाईलाजाने लॉकडाऊन वाढवावा लागला. त्यांना कडक शासन होणच योग्य, पण माणुसकीचा विचार करूनच शासन व्हावं.- आराधना
लोक येतात आणि जातात, सरकारला फरक पडत नाही. देश भारत वाचायला हवा. मला काहीही प्रॉब्लेम नाही. बाजारात भाजीपाला महागलाय - येराजूSSSSS
जंजिरा उत्तम प्रतिसाद, टोटली सहमत - (एक आयडी)
अरे पण जंजिराने प्रतिसाद कुठे दिलाय? - (दुसरा आयडी)
इंदिरा गांधींनी ब्रिटिशांना पॅसिफिक महासागरात बैलगाड्या पाठवून धूळ चारली होती, आणि मोदीला कोरोना घालवता येऊ नये? - पांढरा बोका
मी ना, या लॉकडाऊनआधी अस्सा सुंदर चिनीमातीच्या भांड्यांचा सेट नाईलवरून मागवला होता. महागच पडला असेल, पण लोकल दुकानदाराकडे साध्या मातीचा होता. मग कोरोनाची भीती वाटून तो सेट फेकून दिला. माझी अंदमानी शेजारीणसुद्धा तसलाच सेम सेट वापरते. तिला मेलीला कसं काही होत नाही काय माहीत? - असशी
2
(पुढील प्रतिसाद, प्रतिसादात )
अमा तुम्ही अमाच रहा. मला रोमा
अमा तुम्ही अमाच रहा. मला रोमा म्हटलं की ती जंगली बिल्ली आठव>> हाउ स्वीट . ड न्न.
वेका, का आणखी दहा प्रतिसादांची सोय करून देताय?> मी दिला बघ पहिला.
@सिद्धी - धन्यवाद! (केकची
@सिद्धी - धन्यवाद! (केकची पाककृती मिळाली असेल अशी आशा करूयात Lol
Submitted by अज्ञातवासी on 10 April, 2020 - 00:36
- केकची पाकृ पोस्ट करुन झाली पण. खाऊन पण झाला केक !
अज्ञा, अरे हे नेमक कुठल्या धाग्यावर झालंय?

मला काहीच आठवत नाहीये.. Proud Lol
Submitted by मन्या ऽ on 10 April, 2020 - 01:41
- आठवायचा प्रयत्न ही करू नकोस गं. उभ्या जन्मात सापडायचा नाही धागा.
घंटासिंग
घंटासिंग
>>>>> आम्ही जुन्या कंपनीतील तिघे मित्र आता वेगवेगळ्या ठिकाणी आहोत पन तेव्हाच्या सवयीनुसार चिडलो कि अजुनही एकमेकाना घंटासिंग च म्हणतो ....
“अय घंटासिंग”
असल्याचे?? सिरियसली?अरे हा
असल्याचे?? सिरियसली?अरे हा अंड्यातून बाहेर येणारच नै का? Uhoh
>>>>>>
ती पोस्ट अलटी पलटी विनोद प्रकारातली होती.

भरत यांनी अचूक ओळखली बघा.
नसती ओळखली तर मी खरेच अजून अलटी पलटी करत त्यावर दहा प्रतिसाद खेचून तुमचा माझा आपल्या सर्वांचाच थोडा टाईमपास केला असता या लॉकडाऊन काळात
भरत यांनी मजा घालवली. याबदल्यात आता मी एक मोदींच्या कौतुकाची पोस्ट लिहीणार वा धागा काढणार
अहो काय हे :फिदीफिदी:...जमलयं
अहो काय हे
किलर जमलयं की!! मी तर मनात कल्पना करत होते. 
.
अतिविस्तारभयास्तव >> भय दूर करा आणि भाग दोन येऊद्या.
मलाही बेफिकीर यांच्या प्रवासवर्णनाची आठवण झाली.>>>मलाही साधनाताई... आर्त व्याकूळ आणि काय काय id होते.
प्रामाणिक, भिडणारे,खरे अनुभव
प्रामाणिक, भिडणारे,खरे अनुभव लिहिणारे आइडी आहेत त्यांना विडंबनात घेता येत नाही. असले प्रसंग आपल्यावरही कधी शेकलेले असतात पण ते आपण कधी मांडलेले नसतात.
वो srd, म्हंजे ज्यांची नावे
वो srd, म्हंजे ज्यांची नावे वरती हायती, ती सारी खोटी, अप्रामाणीक हाय का? :डोळे वटारणारी भावली:
काल्पनिक, ललित, विनोदी ,
काल्पनिक, ललित, विनोदी , काथ्याकूट चर्चा, ठराविक शैलीत बातमी देणारे इत्यादी करणारे आईडी विडंबनास वाव देतात. खऱ्या खोट्याचा संबंध नाही.
मस्त विनोदी लेख.
मस्त विनोदी लेख.
मेंढा आहे म्हणून म्हणल. 
पण कोतबो ऐवजी मफबो ( मलाच फक्त बोलायचय) म्हणा ना.
Pages