Marrital Rape अर्थात वैवाहिक बलात्कार

Submitted by chittmanthan.OOO on 5 April, 2020 - 00:21

"उसका मन हो तो वो लेटेगी और उसका मन नही तो नही.. ऐसा कैसे चलेगा भाई..." अश्या प्रकारच्या कॉमेंट्स आपण सहज ज्या विषयावर पास करतो तो विषय म्हणजे marrital rape...!!! . हा शब्द ऐकला की अनेकांच्या भुवया उंचावतात किंवा याबद्दल बोलणं म्हणजे लग्नसारख्या पवित्र गोष्टीवर धर्मविरोधी लोकांनी उडवलेले शिंतोडे वाटतात. पण आजच्या दिवस माझ्यासोबत तिची बाजूही ऐकण्याचा प्रयत्न करा. जमलं तर यावर विचार करा नाहीतर काय फालतूपणा आहे म्हणून ही गोष्ट सोडून द्या.
पहिल्यांदा तुम्हाला बलात्कार म्हणजे काय हे सांगतो. बलात्कार म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी तिच्या मनाविरुद्ध ठेवलेले शारीरिक संबंध होय. मी व्यक्ती हा शब्द जाणूनबुजून वापरला कारण बलात्कार हा स्त्री आणि पुरुष या दोघांवरही झाल्याची उदाहणे या जगात आढळतात.
बलात्कारासारखा गंभीर विषय असूनही त्याची व्याख्या ही जो बलात्कार करतो त्याच्यावर अवलंबून असते. म्हणजे जर पर पुरुषाने जबरदस्ती केली तर बलात्कार पण नवऱ्याने बायकोशी तिची ईच्छा नसताना संबंध ठेवले तर आपला समाज त्याला intence lovemaking म्हणतो.
Intence lovemaking म्हणताना बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर किंचितशी smile सुद्धा येते. त्याच हसू येणाऱ्यांना एक किस्सा सांगतो एक खरं घडलेला किस्सा... जेव्हा नवीन लग्न झालेली रूपा हनीमून साठी केरळ ला जायचं प्लॅन ऐकते तेव्हा तिथल्या समुद्रकिनारे निसर्ग याबद्दलचे विचार तिच्या मनात उड्या मारायला चालू होतात.पण जेव्हा ती हनिमून ला जाते तेव्हा तिचा नवरा निसर्ग सोडा पण साधं हॉटेलच्या पण बाहेर नेत नाही त्या चार दिवसात फक्त आणि फक्त संभोगच करतो... तेव्हा वाटत की अश्या intence lovemaking वर प्रश्न उठवावा की नको....!!!
भारताबद्दलच बोलायचं तर फक्त ५-६ % महिला अश्या आहेत ज्यांना आपला पार्टनर निवडण्याचा अधिकार आहे. बऱ्याच मुलींना हे देखील माहीत नसते की आपण ज्याच्याशी लग्न करतोय तो माणूस नेमका कसा आहे . त्याच्याशी नीट ओळख व्हायच्या आतच शारीरिक संबंध ठेवला जातो . घरच्यांकडून ह्या विषयावर विचार करण्याऐवजी हा विषय थट्टा मस्करी मध्ये घेतला जातो.
जर marrital rape कायद्याच्या चौकटीत आणून त्यावर शिक्षा सुनावण्यात आली तर भारतीय विवाह संस्था धोक्यात येईल अशीही टिप्पणी करणारे लोक सापडतील. काही महाभाग तर असाही म्हणतात की स्त्रिया या कायद्याचा वापर करून नवऱ्याला ब्लॅकमेल करतील. असाच निश्कर्ष लावायचा तर बलात्काराचा कायदा पण रद्द करायला हवा कारण खोट्या केसेस आहेतच ना...!!!
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक कायद्याला पळवाट असतेच त्याचा दुरुपयोग होतो . तशी ती marrital rape कायद्याच्या मध्ये पण असेल पण म्हणून २% खोट्या केसेस दाखल होतात त्याच्या ओझ्याखाली ९८% महिलांवर अन्याय होतो त्याच काय?
शेवटी एक गोष्ट नक्की की पितृसत्ताक आणि feminist या दोन्ही चष्मे बाजूला टाकून एक माणूस म्हणून या विषयावर बघायला शिकल पाहिजे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users