द असेसिअन पार्ट - १

Submitted by डार्क नाईट on 1 April, 2020 - 15:58

सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक असून या कथेचा कोणत्याही व्यक्तीशी,ठिकाणाशी,नावाशी सबंध केवळ योगायोग समजावा.

______________________________________________________
वेळ :- सकाळी ९:०४
ठिकाण:- south beach,san francisco
तारीख:- १७ जुलै २०१५

डॅरेन आपल्या समुद्रा जवळ असलेल्या आलिशान घरात झोपलेला असतो.तेवढ्यात त्याचा फोन वाजतो.डॅरेन खडबडून जागा होतो व आपली फोन ची स्क्रीन पाहतो, तर त्याला प्रायव्हेट नंबर दिसतो व तो दोन सेकंद विचार करून कॉल रिसिवी करतो.

सेक्रेटरी:- हॅलो डॅरेन.

डॅरेन:- हॅलो, गूड मॉर्निंग सर.

सेक्रेटरी:- माझा आवाज ओळखलास तर.

डॅरेन:- सवय झाली आहे. कशी आठवण झाली माझी?

सेक्रेटरी:- एक मिशन आहे,आणि जे फक्त तू आणि तुझी
टीमच करू शकते.

डॅरेन:- सॉरी सर,पण मागच्या मिशन नंतर पुढील दोन महिने
कोणतेही मिशन करणार नाही असे मी स्वतःला वचन दिले आहे.

सेक्रेटरी:- मी कारण जाणू शकतो.

डॅरेन:-दोन कारणे आहेत सर,पाहिले म्हणजे मागच्या मिशन मध्ये माझे वाकडे झालेले नाक आणि दुसरे म्हणजे शहरात उद्या पासून चालू होणारे समर फेस्टिवल.मला थोडे दिवस रीलॅक‌्स आणि एन्जॉय करावेसे वाटते.

सेक्रेटरी:- मी तुझ्या तुटल्येला नकासाठी काहीही करू शकत नाही पण तुला आरामाची गरज आहे हे मी समजू शकतो.पण तुला आपल्या त्या लहानशा घरात आणि शहराच्या गोंगाटात सुट्टी एन्जॉय करण्यापेक्षा बहामास मध्ये प्रायव्हेट या‌ॅट‌‌वर सुट्टी एन्जॉय करण्यात जास्त मजा येईल असे मला वाटते.

डॅरेन:-पाहिले म्हणजे माझे घर लहान नाही हे एक थ्री बेडरूम पेंट हाऊस आणि मला कृपया तुमच्या बोलण्याचा अर्थ थोडक्यात कळेल का.

सेक्रेटरी:- हे एक असे मिशन आहे जे आम्ही काही खास कारणांमुळे सरकारी पातळीवरून करू शकत नाही,म्हणून C I A ने सर्व प्रायव्हेट टीम्स पैकी तुमची निवड केली आहे. आणि याचे पॅकेज ही मोठे आहे.

डॅरेन:-अच्छा अता मला कळले. किती डॉलोर्स चे पॅकेज आहे?
डॅरेन:-५ मिलियन डॉलोर्स माझ्या मित्रा.२ मिलियन मिशनच्या खर्चासाठी आणि उर्वरित सर्व तुमचे. आणि काही इन्फॉर्मेशन मी फोन वर देऊ शकत नाही कारण या वेळी शत्रू खूप हुशार आहे आणि ते इनक‌्री्पटेड कॉल्स ही टॅप‌ करू शकतात.

डॅरेन:-(थोडा वेळ विचार करून) ओके सर आय ॲम रेडी फॉर दिस मिशन.

सेक्रेटरी:- वेरी गुड द असेसिअन, मिशन ची इन्फॉर्मेशन तुला काहीच दिवसात मिळेल. हॅव अ गुड डे, बाय.

डॅरेन:-युवर्स टू, बाय.

Daren McKnight ज‌्याला अंडरवर्ल्ड मध्ये द असेसिअन या नावाने ओळखले जाते जो कुख्यात गुंडांपासून गुप्त सरकारी संस्था पर्यंत सर्वांसाठी पैशासाठी काम करतो.
______________________________________________________
वेळ:- सकाळी ११:०८
ठिकाण:- C I A headquarters,Langley, Virginia
तारीख:-१६ जुलै २०१५

सेक्रेटरी आपल्या ऑफिस मध्ये बसून एजंट २५७३ बोलत असतात.

सेक्रेटरी:- हॅलो..हॅलो एजंट माझा आवाज तुला येतोय?

एजंट २५७३ :- येस सर.

सेक्रेटरी:-आम्ही ज्या ठिकाणी हत्यारांची डिल होणार आहे
त्याचे लोकेशन मिळवले आहे,आणि तुझ्या फोनवर पाठवले
आहे.त्या लोकेशन वर जा तिथे काळया BMW X1 गाडीतून डिलर तर पिवळ्या Lamborghini Aventador गाडीतून स्वतः Aleks Andreyev येणार आहे. पुढील सूचना लोकेशन वर पोहचल्यावर मिळतील.
एजंट २५७३ :- ओके सर.

Aleks Andreyev एक कुख्यात आतंकवादी ज्याला NATO समथ॑क देशांमध्ये दहशत पसरवन्यासाठी व त्यांच्या गुप्त सरकारी संस्थांचे एजंट्स पकडून माहिती काढण्यासाठी NATO विरोधक देशांकडून समर्थन व पैसे मिळतात.

एजंट २५७३ चा फोनवर लोकेशन येते( district ५,espinsan hotel,Iran).एजंट २५७३ मिळल्येल्या लोकेशन वर जाण्यासाठी सबवे चा वापर करून हॉटेल espsinsan वर पोहचतो.

एजंट २५७३:- हॅलो सर,मी लोकेशन वर पोहचलो आहे.

सेक्रेटरी:- ओके एजंट,हॉटेल बाहेरच थांब आणि त्यांच्या येण्याची वाट बघ आणि योग्य वेळ मिळताच दोघानाही मारून यांच्याकडील हतियार ताब्यात घे.

एजंट२५७३ हॉटेलचा गार्डन मध्ये फोन वर बोलायचे नाटक करत डिलर व Aleks Andreyev यांच्या येण्याची वाट बघत असतो,तेवढ्यात मागून कोणी तरी येऊन त्याच्या तोंडावर काळा कपडा टाकतो व त्याचे हात बांधतो व त्याच्या माने वरील ट‌्रॅकींग device काढून टाकतो.

सेक्रेटरी यांच्या इअरपीस मध्ये धक्काबुक्कीचा आवाज येतो व त्यांचा I pad वरून एजंट चे लोकेशन गायब होते.

सेक्रेटरी:- हॅलो..हॅलो एजंट तुला माझा आवाज येतोय?काय
चालले आहे तिथे? तू ठीक आहेस ना?

Aleks Andreyev:- हॅलो मिस्टर सेक्रेटरी.

सेक्रेटरी:- कोण बोलतंय आणि एजंट कुठे आहे?

Aleks Andreyev:- तुम्हाला काय वाटते मिस्टर सेक्रेटरी की फक्त तुम्हीच गुप्त माहिती काढून पाळत ठेवू शकता.मी Aleks Andreyev आहे हे लाखात ठेवा. आणि एजंट माझ्या ताब्यात आहे.

सेक्रेटरी:- कृपया करून आमच्या एजंट ला सोडून दे त्यासाठी आम्ही तुझ्यावर पाळत ठेवणे बंद करू व तुला पाहिजे ती रक्कम देवू.

Aleks Andreyev:- पैशांची मला कमतरता नाही मिस्टर सेक्रेटरी,मी एकाच अटीवर तुमचा एजंट तुम्हाला देईन.जर तुम्ही मला माझा एक जुना शत्रू मिळवून दिलात तर.आणि हे काम फक्त तुम्हीच करू शकता.

सेक्रेटरी:- कोण पाहिजे तुला?

Aleks Andreyev:- Daren McKnight.
______________________________________________________
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच सुरुवात... एकदम फ्रेश कथा.

कथा पार्श्वभुमी सॅन फ्रान्सीस्को असली तरिही, ते काही शब्द मराठीत लिहिता का ? वाचायला बर वाटत.
Aleks Andreyev - अ‍ॅलेक्स अ‍ॅन्ड्रीव्ह
Daren McKnight - डॅरेन मॅकनाईट ............असच काही आहे ना ?

* पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

छान सुरुवात.

शुद्धलेखन >>>>> मी Aleks Andreyev आहे हे लाखात ठेवा.