.. तम दाहक लहरी होते!

Submitted by राघव_ on 31 March, 2020 - 15:31

डोहातील गर्ता जर्द..
ते डोळे जहरी होते!

खग निष्पाप जरी तो..
ते व्याधच कहरी होते!

गावातील नाती तुटती..
ते कपडे शहरी होते...

स्वातंत्र्य कुणाला येथे?
[मन स्वतःच प्रहरी होते..]

पणतीची वातीवर भिस्त!
तम दाहक लहरी होते!

--

तृष्णांची मनात वस्ती..
अन् मुखात श्रीहरी होते..

राघव

Group content visibility: 
Use group defaults

कल्पना खूप छान आहेत.
चालीवर म्हणायला थोड अडखळायला होतं..
पण कविता सुंदर...