"वळून बघ"

Submitted by mi manasi on 28 March, 2020 - 00:04

"वळून बघ"
धावता धावता थांबलय जग
आता तरी माणसा वळून बघ।।ध्रु।।

वळून बघ कोसळलं आभाळ
धरतीच्या कपाळी रक्ताचा गुलाल
उधळलाय सगळा तुझा डाव
सुटलाय ना तुझ्या काळजाचा ठाव?
कुठवर कसा धरशील तग...
आतातरी माणसा वळून बघ।।१

कडकडीत ऊन, मोकळा वारा
भूक, तहान, अन्न, वस्त्र, निवारा
एवढीच मागणी, त्याचीच चिंता
इतकंच हवय कळलं ना आता?
तू हे सगळं बदलशील ना मग...
आता तरी माणसा वळून बघ।।२

उभा ठाकलाय समोरच काळ
गळ्यात घालून नरमुंडाची माळ
मागे घे पाऊल थांब घरातच
होईल का रे सगळं होतं तसंच?
उद्याला जाळेल ही आजची धग...
आता तरी माणसा वळून बघ।।३
...धावता धावता थांबलय जग
....मी मानसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users