सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग अठरा...सत्याचा विजय...काही गमावण्याचं दुःख

Submitted by मुक्ता.... on 25 March, 2020 - 18:20

"थांबा,मी जातो तिथे..." नविनने त्या बोटल्स गंगाकडून घेतल्या....
"दादा अरे...मला तस म्हणायचं नव्हतं ,पण सगळे आपल्या जीवाची बाजी लावताहेत आणि तू?..."
"गंगा मला राग नाही आला...मला माझ्या स्वार्थी पणाची कीव येतेय...माझी देवकी...चल जाऊ दे....शांता ने बरीच मदत केलीय...ती गेलीच...पण अनेकांचे प्राण वाचवण्याचा मन्त्र देऊन गेली...गंगा मी आता घाबरत नाही...माझी माय...ती ही...मलाच माझी लाज वाटते..असा भेकड वागलो मी...चल जाऊ दे...जगलो वाचलो तर...भेटू....."

नवीन ने गंगाचा हात सोडवला...आणि पारगावच्या त्या भयाण इतिहासाकडे निघाला...
"अविनाश माझी सगळी फॅमिली...."
रात्रीच्या अंधुक प्रकाशात जंगलात निघालेली नवीन ची किडकिडीत पाठमोरी मूर्ती...मोठ्या हिकमतीने निघाला होता...शेवटचा सोक्ष मोक्ष लावायला....आपल्या प्राणाची फिकीर न करता.....

त्या पाठोपाठ गंगा, अविनाश आणि डॉक्टर टंडन हेही निघाले....पण एक डिस्टन्स ठेवून...

हळू हळू ते त्या भग्न मंदिराच्या आवारात पोचले..
नवीन ने खिशातला कागद काढला...
"गिरर्म गिरम...करचा..स्टिक स्टिक...."
असा काहीसा विचित्र भाषेतला एक पाठ त्याने वाचायला सुरुवात केली....काही सेकंद झाले नसतील...तोच

किरी किरी किरी किरी...(कदाचित तो आला तो आला)
असे करत असंख्य अस्वस्थ लाल आणि हिरव्या प्रकाश लहरी मागच्या गुहेतून बाहेर आल्या...
त्या मंदिराला त्यांनी पूर्ण वेढलं....
आता नविनने त्या काचेच्या बाटल्या म्हणजे आपल्या वत्सल आत्या आणि गंगा यांनी केलेल्या प्रयोगाच्या बाटल्या....समोर ठेवल्या...नवीनच डोक काही काळ गरगरत राहिलं...विचलित झाला...पण त्याला देवकी आणि वत्सल आत्या दोघींचे शब्द आठवले.."फक्त दोन तास उरलेत नवीन...त्या शिलालेखात उल्लेख असलेला..तूच करू शकतोस,या जगाला वाचव"

आपल्या प्रिय व्यक्तींना समोरून नाहीस होताना ज्याने पाहिलं तो खरा कोलंडायला हवा होता पण तो आता ठाम झाला होता. त्याने आणखीन चेव घेऊन ते पुढे वाचायला सुरुवात केली. अविनाश आणि गंगा दुरून हे पहात होते..अखेरीस...ती प्रकाशाची वावटळ थांबली..
त्या दोन्ही शक्ती पूर्णरुप घेऊन नविनच्या समोर उभ्या राहिल्या. आता कोणताही काचेचा आडपडदा नव्हता की वत्सल तिथे नव्हती...तो शिलालेख म्हणजे त्या शक्तींना करायचे आवाहन होते...
खूप खुश होऊन ते परत सांकेतिक भाषेत बोलायला लागले.."कोचाकींनी बनि बनी...टिव्ह टिव्ह...बीप बीप?"
आणि आपले दात विचकून हसायला लागले

शांता...मेली...बकुळा..आमचे काम करून गेली..मारली...आता तू आहेस आरा...नवीन...ठिबक ठिबक त्याव बीप बीप!"

नविनने लक्ष दिले नाही...जळजळीत डोळ्यांनी एकदा वर मात्र बघितले.
तीन शिलालेख होते...एकावरच झालं..आता पुढचा..आता नविनच्या जवळ ते येऊ लागले..।पण नवीन डळमळीत झाला नाही...त्याने खिशातून दुसरा कागद काढला...

पुन्हा विक्षिप्त शब्द.. या वेळेला समोर अक्षर उमटायला सुरुवात झाली...तशा त्या शक्ती अस्वस्थ व्हायला लागल्या...ती उतावळी हिरवी शक्ती तिने त्याच्यावर वेटोळे घेत हल्ला चढवला. पण स्पॉट ऑन ती बाजूला फेकली गेली....ही घटना त्या शक्तींना गोंधळात टाकणारी ठरली....लाल शक्ती जरा मागे हटली. तसा नवीन ने तो कागद वाचणे थाम्बवले. लाल शक्तीने लगेच नविनवर हल्ला चढवला...त्याला पूर्ण घेरले...

दादा...एक अस्फुट किंकाळी गंगाच्या तोंडून निघाली..पण अविनाशने तोंडावर हात ठेवला आणि तिला संयम ठेवण्यास सुचवले...कुठलीही चूक महागात पडणार होती...

पारगावच्या हद्दीत कडेकोट बंदोबस्त होता. कुणालाही तिथे यायची मुभा नव्हती...मिशन नवीन आणि त्या संबंधित व्यक्तींखेरीज...

जसे बकुळा भोवती असे वेटोळे घेऊन तिचे शरीर कोळशासमान केले तसेच...पण त्याच क्षणी नविनने पुन्हा तो कागद वाचायला सुरुवात केली तशी ती लाल शक्ती त्या हिरव्या शक्तीकडे जाऊ लागली....
बिव्हक्याब बिव्हक्याब....स्टिक स्टिक....ती हिरवी शक्ती मागे मागे सरकली पण आता त्यांना त्या भग्न वास्तूच्या कक्षेच्या बाहेर जाता येईना...कारण तेव्हढ्या वेळात नवीन ने बाटली नंबर दोन आणि तीन मधील पाणी त्या वास्तूच्या सर्व भागात ओतले..बाटली नंबर एक मधले पाणी संपले होते..त्यातील लाल आणि हिरवे असे गोटीच्या आकाराचे स्फटिकी बॉल नविनने काढले. ते पाहून त्या शक्ती हादरल्या. त्यांना कळून चुकले काय ते.....

काही मिनिटे शांत गेली...अविनाश आणि गंगा यांची अस्वस्थता वाढत होती...किती वेळ काहीच हालचाल नव्हती...आणि एकदम...टिक टिकटिक...टी टी टी टी मोठा स्फोट झाला....धडाड....
एक मोठा विजेचा लोळ तत्क्षणी आकाशातून त्या वास्तूच्या दिशेने आला....त्या भोवती...लाल आणि हिरव्या प्रकाशाची सरमिसळ, असंख्य प्रकाश तंतू, जसे आपल्या कथामालिके चे कव्हर चित्र आहे तसाच....वसकन त्या वास्तूवर पावसासारखा बरसला...
मोठी थरथर त्याक्षणी आसपासच्या परिसरात जाणवली...तो लोळ कोसळला आणि थाम्बला.
पुन्हा एकदा मोठा स्फोट ...धडाड...आणि एक लोळ आकाशाच्या दिशेने झेपावला...पण यावेळेस तो प्रचंड मोठे एखादया मोठ्या वावटळी सारखे रूप घेऊन...आणि त्यात स्पष्ट लाल आणि हिरव्या लहरींची सरमिसळ दिसली....पूर्ण दक्षिण गोलार्धात याची जाणीव झाली असेल कारण नंतर अगदी दिवस असावा तसे काही मिनिटे आकाश उजळले होते.
अविनाश आणि गंगा लांब फेकले गेले होते...बेशुद्ध झाले होते...

सकाळचे दहा वाजले होते...
अविनाशने डोळे उघडले...तो हॉस्पिटल मध्ये होता...त्याला काही काळ कळतच नव्हते तो कुठेय ते...अविनाश फक्त गंगा चे नाव घेत होता...गंगा कुठाय? गंगा कुठाय चा पुकारा त्याने सुरू केला...नर्सने तातडीने डॉक्टरना बोलावले...
त्याने खूप गोंधळ घातला...टंडन सर त्याला कसेबसे शांत करू शकले...

इकडे बाजूच्या वॉर्ड मध्ये गंगा अतिशय नाजूक अवस्थेत होती...हाती पायी नीट पण मेंटल कंडिशन एकदम नाजुक..."दादा , दादा..."एव्हढच काय ते बोलत होती..

डॉक्टर टंडन आणि डॉक्टर टंडन याना कल्पना होतीच. अविनाश आणि गंगा यांनी गेल्या काही तासात प्रचंड मानसिक तणाव झेलला होता. त्यांची मानसिक अवस्था खूप नाजूक होती.....त्यांना ठीक व्हायला काही महिने कदाचित लागणार होते....देवकी, वत्सल ,नवीन यांचे काय झाले नेमके? हे काहीच कळत नव्हते....

*****************************************

इकडे पारगावच्या जंगलात...अर्ध जंगल उध्वस्त झालं होतं...पार कुट्ट काळं...त्या भग्न वास्तूच्या जागी आता एक मोठा खड्डा पडला होता...जणू एखादा अशनी पडला असावा....नवीनचा शोध घेण्याचा पूर्ण प्रयत्न झाला....पण जिथे त्याच्या भोवती असणाऱ्या वनस्पती राहिल्या नव्हत्या तिथे नवीन काय सापडणार? काहीच अवशेष शिल्लक नव्हते...

सरकारने ती जागा सील करण्याचे ठरवले...अनियमित कालावधीकरिता...फक्त वैज्ञानिकांना तिथे जाण्याची मुभा होती.....देवकीही नाही सापडली...आणि वत्सल अत्याही..बकुळाही...तिला तर त्या शक्तींनी जीवे मारले..कदाचित बकुळाची नवीन चे घर नष्ट करण्याची इच्छा पूर्ण झाली!!

तीन महिने लोटले गंगा आणि अविनाश हळू हळू सावरले...त्यांनी आता हे वास्तव मान्य केले की नवीन आणि देवकी नाही राहिले...आणि वत्सल आत्या ही....
आणि नविनने घेतलेले, देवकीबरोबर संसाराचे स्वप्न रंगवलेले टॉवर ही..तिथे काहीच राहिले नाही. शांताच्या शरीराचे ठिकर ठिकर तुकडे होऊन ते त्या टॉवर सहित गेले....
विजय सर...त्यांचाही काहीच पत्ता नव्हता....गेले कुठे?

त्या शक्तीतर नाहीश्या झाल्या..आपलं मिशन नवीन यशस्वी झालं पण त्याने इतके बळी घेतले?

अविनाश आणि गंगा दोन दिवस बंगलोर ला गेले आणि तिकडून आले ते थेट पारगावातच...काय झालं त्या दोन दिवसात?
उलगडा अंतिम भागात....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांता ,देवकी,वत्सल आत्या यांचे काय झाले हे कोणत्या भागात आहे,१७ मध्ये तर त्याचा उल्लेख नाही.बाकी कथानक मात्र खूप थरारक आहे, पुभाप्र.

सुर्यगंगा,हा प्रश्न विचारलात, त्यासाठी आभार...
पुढचा भाग याचे उत्तर देईल...आज रात्री प्रकाशित करेन. ही कथामालिका दोन निवेदक आणि फ्लॅशबॅक तंत्राचा वापर करून लिहिण्याचा प्रयत्न केलाय...
खूप खूप आभार

वत्सल आत्यांचं नक्की काय झालं हे १६ व्या आणी १७ व्या भागात पण कळलं नसल्यानं थोडा गोंधळ झाला.
"गिरर्म गिरम...करचा..स्टिक स्टिक" - हे कमी टाकलं असतं तरी चाललं असतं.
बाकी वेग छान. १६व्या भागापासून कथा आवरायचा प्रयत्न केलाय का?

वर बोलल्याप्रमाणे सलगता जाणवत नाहीये या आणि मागच्या भागात. एखादा भाग स्कीप झाल्यासारखा वाटल.
२ वेळा मागील भाग परत वाचून पाहीला Lol

डॉक्टर टंडन आणि डॉक्टर टंडन याना कल्पना होतीच. >>>> ??

खरंच लिंक तुटल्यासारखं वाटलं. अविनाश आणि गंगा बेंगलोरला निघाले होते, आणि मध्येच नवीनला घेऊन पारगावला कसे गेले? वत्सल आत्या कुठे होत्या? शांता कधी गेली? तो मंत्र कोणी शोधला?
पुढच्या भागात सगळी सरमिसळ आणि आमच्या डोक्यातील गोंधळ संपवाल ना?

बकुळा,देवकी आणि शांता या तिघींबाबत काय झालेल ते आठवतंय.. वत्सल चे काय झाले ते आठवेना.. परत शेवटचे दोन भाग वाचुन काढेल.. आणि महत्वाच राहीलंच..
पुभाललटा! Happy