विश्वव्यापी 'करोना' : चित्रसफर

Submitted by कुमार१ on 23 March, 2020 - 05:13

Corona हा तसा एक सामान्य इंग्लीश शब्द. त्याचे मूळ लॅटिनमधले crown, अर्थात मुकुट. सध्या जगभर धुमाकूळ घालून एका महासाथीला कारण ठरलेला विषाणू त्याचा मुकुट मिरवतोय.

सहज उत्सुकता म्हणून ‘करोना’ शब्दाचे अनेकविध अर्थ पाहिले आणि ते रोचक वाटले. जगात जवळपास एक डझनभर प्रकारचे करोना आहेत. ते आपल्या परिचयाच्या अनेक क्षेत्रांत आहेत. जरा त्यांची यादी तर बघा:

आकाश, वनस्पती, शरीर, विद्युतक्षेत्र, वास्तुकला, धार्मिक वेश आणि अर्थात सूक्ष्मजीव .

सध्याच्या जमावबंदीमुळे आपण घरांत काहीसे जखडले गेलो आहोत. करोनाच्या ‘कोविद’ बद्दल सतत वाचतोय, ऐकतोय आणि इथे व्यक्तही होतोय. या माहितीच्या भडीमाराने डोके अगदी भंजाळून जातेय. साथीच्या बातम्यांनी आपली चिंताही वाढते आहे. म्हणून घटकाभर हा विरंगुळा.

विश्वातील विविध करोनांची काही चित्रे सादर करतोय. अर्थात ती सर्व जालावरून साभार !

१. सुरवात करूया सूर्याच्या करोना अर्थात त्याचे प्रभामंडलापासून. माझ्याप्रमाणे ज्यांनी खग्रास सूर्यग्रहण पाहिले आहे त्यांनी हे दृश्य अगदी जिवापाड डोळ्यांत साठवले असेलच. ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले नसेल त्यांनी आयुष्यात एकदा तरी खग्रास पहायची संधी घ्याच !
cor sun.jpg

२. एखाद्या फुलाचा शास्त्रीय अभ्यास करताना आपल्याला ‘करोला’ आणि करोना भेटतात. हे पाहा:

cor flow.gif

३. विद्युत प्रकाशाची अनेक रूपे आपल्याला परिचित आहेत. या चित्रात जो लखलखाट दिसतोय तोही एक करोनाच.

cor electic discharge.jpg

४. आता वास्तुकलेत देखील करोना असतो तो पाहू. इमारतीच्या शीर्षकावरील हे देखणे शिल्प :

cor archit.jpg

५. आणि हा आहे घराच्या सजावटीतील करोना. अशी बरीच झुंबरे आपल्याला परिचित असतात.

cor chandeli.jpg

६. विशिष्ट धार्मिक केशभूषेत केलेला हा बघा डोक्यावरील करोना:

cor cleric.jpg

७. मानवी मेंदूचा शास्त्रीय अभ्यास करताना हे दृश्य दिसते. त्याला म्हणतात करोना रेडीएटा:

cor brain.jpg

८. करोना हे नाव विविध वस्तू-उत्पादकांनाही आकर्षित करते. धूम्रपानासंबंधी देखील एक करोना आहे आणि त्या प्रकाराला म्हणतात ‘करोना सिगार’. यात ‘फुल’ आणि ‘हाफ’ करोनाही असतात म्हणे !.

cor cig.jpg

(धूम्रपान हे आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे , हेवेसांनल . केवळ विरंगुळा म्हणून हे उदा.)
आणि वाचकहो,

सरतेशेवटी आपणा सर्वांना अतिपरिचित झालेल्या करोना विषाणूचा उल्लेख करतो. त्याचे चित्र आपण सतत अनेक ठिकाणी पाहतोच आहोत. म्हणून पुनरुक्ती टाळतोय.

.....या व्यतिरिक्तही काही करोना असू शकतील. माहिती असल्यास तुम्हीही भर घाला.
धन्यवाद !

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> Corona in eye

बऱ्याच ठिकाणी Cornea असा शब्द आहे तर काही ठिकाणी Corona

अतुल,

<बऱ्याच ठिकाणी Cornea असा शब्द आहे तर काही ठिकाणी Corona
>>>
गैरसमज नको.
Cornea हा Cornea च आहे.
Corona ciliaris हा डोळ्याचा वेगळा भाग आहे.
...
प्राचीन , धन्यवाद.

>> Corona ciliaris हा डोळ्याचा वेगळा भाग आहे.

छान माहिती. धन्यवाद सर Happy

अजून एक भर !
मांडवा (जि. नगर) येथील नव्या रस्त्याचे नाव :

corona road.jpg

Pages