टाकाऊ ते खाऊ : सावर डो स्टार्टर मफिन

Submitted by मेधा on 19 March, 2020 - 13:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

१ ते १.२५ कप सावर डो स्टार्टर
१ ते दीड कप होल व्हीट ब्रेड फ्लावर किंवा ऑल पर्पज फ्लावर
१ टी स्पून मीठ
१ टी स्पून बेकिंग सोडा
२ अंडी
१/२ कप तेल
१/२ कप साखर
१/२ कप ड्राय फ्रूट / नट्स - ऐच्छिक. मी घातले नव्हते

क्रमवार पाककृती: 

सावर डो ब्रेड करायचा असेल तर त्याचं स्टार्टर हे विरजण जपण्यापेक्षा जास्त व्यापाचं आहे. दर आठवड्याला जरी ब्रेड बनवला तरी बरंच स्टार्टर उरतं. ते टाकून द्या असे रेसिपीवाले सांगतात. ते टाकवत नाही म्हणून एकदा पॅन केक्स करुन पाहिले ते फारसे आवडले नाहीत.
या आठवड्यात सगळी चिल्लर जनता घरी आहे त्यांच्यासाठी मधल्या वेळचा खाऊ म्हणून हे मफिन्स बनवले.

स्टार्टर आणि ब्रेड फ्लावर नीट मिसळून ८-१० तास झाकून ठेवावे. मिश्रण इडली पिठापेक्षा थोडे घट्ट हवे, पण ब्रेड / पोळीच्या पेक्षा थोडे सैल.
८-१० तासांनी ते मिश्रण परत नीट ढवळून घेऊन त्यात इतर साहित्य मिसळावे. हे सर्व मिश्रण केक किंवा मफिनच्या कंसिस्टंसीचे हवे. लागेल तसे थोडे पाणी घालू शकता.
तेलाचा हात किंवा कपकेक लायनर लावलेल्या मफिन पॅन मधे ३/४ येईल इतपत पीठ घालावे .
३५० डि फॅ ओव्हन मधे २७-३० मिनिटे बेक करावे.

स्टार्टरमधे किती पाणी आहे त्यानुसार ब्रेड फ्लावर कमी / जास्त लागू शकते.
माझे या प्रमाणात १५ मफिन्स झाले.

वाढणी/प्रमाण: 
खाल तितके
अधिक टिपा: 

मूळ रेसिपी मधे वितळलेले लोणी आहे. मी ऑलिव्ह ऑइल वापरले
मूळ रेसिपी मधले स्टार्टर आणि फ्लावर याचे प्रमाण वेगळे आहे.

माहितीचा स्रोत: 
https://www.culturesforhealth.com/learn/recipe/sourdough-recipes/the-basic-sourdough-muffin/
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा रेसिपी आली. पुन्हा केली तर फोटो पण टाका.
ते स्टार्टरचं मनावर घेऊन ही रेसिपी (आणि ब्रेड पण ) बनवून पाहायला हवा.
ठ्यांक्स Happy

Mastach