माझी दुबई सहल (२०१५)

Submitted by arunv65 on 18 March, 2020 - 19:24

आपल्याकडे हिंदी मध्ये एक म्हण आहे . आसमान से गिरा और खजूर मे अटका . माझे तसेच काहीसे झाले म्हणजे मी नवीन वर्षाची
शकुनाची ट्रिप म्हणून Tokyo वरून Cape Town ला जायला emirates ने निघालो आणि दुबईत येता येता उशीर झाला.
मग काय emirates च्या कृपेने अरेबिअन पाहुणचार घ्यायला तयार झालो. (अल दुबई , अल खजूर आणि अल पाहुणचार )
थोडक्यात अस्मानातून उतरलो आणि दुबईत अडकलो आता दुबई आणि खजूर एकच कि .
माझ्या अरबस्तानाविषयी काही समजुती होत्या .
हॉटेल मध्ये उतरलो आहे तर एखादा डॉन पाण्यात गादी टाकून बियर मारत पहुडला आहे , सोने किंवा तस्त्तम मालाची देवाणघेवाण करतोय किंवा एखाद्या बांधकाम व्यावसाइकच्या बायका मुलांची आस्थेने चौकशी करतोय आजूबाजूला हुमाखान , बिंदू type च्या काही तरुणी पोहत आहेत पण तसले काही नाही किंवा आपल्याकडे कसा गावाकडे पाण्याला परसात आड असतो .(म्हणजे छोट्या परीघाची विहीर )तसे मला वाटले कि अरबाच्या परसात सुधा छोटा तेलाचा आड असेल आणि अरब बायकोला सकाळी सकाळी आपल्या अनेक बायकांपैकी जिच्यावर तेल काढण्याची (अरबाचे नाही अडातून ) जबाबदारी आहे अशा सह्धर्म चारिणी ला म्हणतोय आजी सुनती हो अपने आड मेसे जरा बादलीभर तेल निकालना (आता तो अरब असल्या मुले त्याचे अरबी चांगले असेल ना पण हिंदी यथा तथा च असणार ना ) मला मशिदीत नमाजला जायचे आहे अशा काहीशा संवादाची मी आपली मनातल्या मनात कल्पना केली होती पण तसाहि काही चमत्कार पाहायला मिळाला नाही कारण बऱ्याचशा अरबांच्या परसात समुद्रच निघाला बाकी भरपूर देशी लोक ओसंडून वाहणारी संपत्ती मात्र दिसली . ज्या देशात काही पिकत नाही त्या तेली लोकांनी तेलाच्या जीवावर स्वतासाठी काय काय उपलब्ध करून घेतले आहे ते बघण्यासारखे आहे . येता येता भूर्ज खलिफाची इमारत पण पाहून आलो . एका दुकानात असलेली फळे आणि सुकामेवा ह्यांचे फोटो पहा इतक्या प्रकारचा सुकामेवा कि बघून डोळे फिरतात तीच गत सोन्याची. अर्थात तिथल्या सोन्याचे एक वैशिष्ट्य आहे , सोने जरी दुबईत घेतले तरी delivery मात्र वर्सोवा beach लाच अर्धी फाटकी नोट दाखवून लाकडी खोक्यातून मिळते हे आपल्या चाणाक्ष हिंदी चित्रपट चाहत्यांना सांगायला नकोच . अधिक माहिती करता बच्चन (थोरली पाती) ह्यांना भेटा अथवा लिहा. त्यांचे पतंग पतंग आसारी आसारी खेळून झाले असेल तर ते नक्की उत्तर देतील
मी आपली एक दुबईची आठवण म्हणून अल्लाउद्दिन चा दिवा घेतला . घरी येवून घासून पहिला तर जीन वगैरे काही निघाला नाही
पण रंग जायला लागला मग वाटले कि बहुतेक फेडेड जीन असेल पण तसेहि काही घडली नाही फक्त दिव्याचा आणि नंतर माझ्या चेहेऱ्या वरचा रंग उडाला . दुबई एक गोष्ट जाणवली कि शहरात टोपी पडतील अशा उंच इमारती सोडल्या तर पाहायला काही नाही .
म्हणजे आपले शनीवार वाडा, पर्वती पेशवे पार्क असे काहीच नाही . एवढे उन आहे पण साधी शिंद्यांची छत्रीसारखी कुणाची छत्री पण नाही
त्यामुळे टूर घेतली तर फक्त हे हॉटेल आणि ते हॉटेल एवढेच पाहायला मिळाले . पण राहण्याची सोय म्हणून हॉटेलात जावे तर भाव इमारीतीपेक्षा उंच गगनाला टेकलेले . एका हॉटेलचा तर एक दिवसाचा दर ३० हजार डॉलर आहे म्हणे.असो शेवटी जाता जाता एक अरेबियन गोष्ट सांगून तुमचा काटा काढायचे थांबवतो
एक गावात एक अरब असतो त्याच्या जवळ १७ उंट असतात . तो आपल्या ३ मुलां मध्ये वाटण्या करतो त्या अशा कि
मोठ्या मुलाला ५० टक्के मध्यला मुलाला १/३ आणि धाकट्या मुलाला १/९ वाटणी द्यावी असे लिहून तो मरतो
आता उंट १७ असल्यामुळे आणि विचार करणारे अरब असल्या मुले तिढा ना सुटत नाही आणि शेवटी ते भांडायला लागतात .
पण शेवटी त्यानेही फार काही निष्पन्न होईल असे ना वाटल्या मुले ते गावातल्या एका वयस्कर आणि थोडी चतुर अशा बाईकडे जातात
(हि मला थोडी अतिशयोक्ती वाटली कारण एक तर ती अरब त्यातून बाईमाणूस आणि तरीही चतुर ???). असो
तर ती बाई म्हणते हे पहा मला काही तुमचा प्रश्न सोडवता येईल असे वाटत नाही . पण मी एक करू शकते
माझ्या कडे एक उंट आहे तो मी तुम्हाला देते आणि मुग बघा तुमचा काही तोडगा निघतो का ते
असे म्हणून ती तो उंट त्यांना देते आणि guess what problem solved
आता कसे ते विचारू नका मी वरच्या ओळीत वाचकांना
चाणाक्ष म्हटले आहे पण ठीक आहे
तर उत्तर असे
पहिल्या मुलाला ५० टक्के म्हणजे आता १८ उंट असल्यामुळे ९ उंट
दुसर्याला १/३ म्हणजे ६ उंट
आणि धाकट्याला १/९ म्हणजे २ उंट
आता बेरीज केली तर किती भरली
९ + ६ + २ = १७
म्हणजे बाईचा उंट बाईला परत

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हि मला थोडी अतिशयोक्ती वाटली कारण एक तर ती अरब त्यातून बाईमाणूस आणि तरीही चतुर ???). >>> काही ही . नॉट फनी ऑलटुगेदर. कोणी पण दुबईला जातं आज काल