कढीपत्ता (Curry leaves- Easy to grow tropical plant )

Submitted by अक्षता08 on 15 March, 2020 - 00:22

घराघरात दररोज लागणारी गोष्ट म्हणजे कढीपत्ता.हाच कढीपत्ता आपल्याला घरातुनही मिळू शकतो.

आपण तीन पध्दतीने कढीपत्ता लावू शकतो.
१. कढीपत्त्याच्या बियांपासुन कढीपत्ता लावणे. परंतु ह्या प्रक्रियेला (process) खुप वेळ लागतो.
२. कढीपत्त्याच्या फांदीपासुन ( ४५° मध्ये कापुन). कढीपत्त्याची फांदी कुंडीत लावावी. नवीन पालवी फुटेपर्यंत कींवा रोपट थोड मोठं होइपर्यंत त्याला अशा जागी ठेवावे जेथे थेट सूर्यप्रकाश नसेल व माती नेहेमी ओली (moist) ठेवावी. एकदा रोपट मोठ झाल्यावर त्याला मोठ्या कुंडीमध्ये लावुन अशा जागी ठेवावे जेथे भरपुर व थेट सूर्यप्रकाश मिळेल.
३. सर्वात सोप्पा पर्याय म्हणजे नर्सरी मधुन कढीपत्त्याच रोपटं विकत आणणे.

कढीपत्ता ही उष्णकटीबंधीय वनस्पती (tropical plant) आहे. त्यामुळे त्याला भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. कढीपत्त्याला well drain माती म्हणजेच पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि mild acidic माती लागते.
हिवाळ्यात आणि पावसाळ्यात कढीपत्त्याला रोज पाणी देण्याची गरज नाही. १-२ दिवसातुन एकदा पाणी द्यावे कींवा माती कोरडी झाल्यावर पाणी द्यावे. उन्हाळ्यात मात्र रोज पाणी द्यावे.कढीपत्त्याला १० दिवसातुन एकदा खत दयावे.

ताक पाण्यात एकत्र करून (७५% पाणी २५% ताक ) दर १० दिवसातुन एकदा दयावे. ताक दिल्याने पानांची चांगली वाढ होते व नविन पालवी फुटते. कढीपत्ता २० फूट उंच वाढु शकतो. त्याची वर्षातुन एकदा कींवा दोनदा काटछाट( pruning) करावी. म्हणजेच त्यांच्या कशाही वाढलेल्या फांद्या कापाव्या. त्यामुळे कढीपत्त्याला चांगला आकार मिळतो आणि वाढीस मदतही मिळते.

कढीपत्त्याला बुरशीचा (black spot fungus) प्रार्दुभाव होतो. त्यांच्या पानांच्या मागील बाजुस काळे डाग येतात.दर ७ दिवसातुन एकदा नियमितपणे कडुनींबाच्या तेलाचा फवारा मारावा (neem oil spray).ज्या पानांना बुरशीचा जास्त प्रार्दुभाव झाला असेल ती पाने काढुन टाकावी व झाडाला कडुनींबाच्या तेलाचा फवारा मारावा. बुरशी पुर्णतः जाइपर्यंत दर २-३ दिवसातुन एकदा neem oil spray मारावा.

ज्याच्याशीवाय फोडणी/ तडका अपूर्ण आहे असा हा कढीपत्ता सहजरीत्या आपल्याला सेंद्रिय खतापासुन घरच्या घरी मिळू शकतो.

IMG20200314142701.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आम्ही ब्राझिलला रहात असताना एकदा सुपर मार्केटमधे कढी पत्त्याचे रोप मिळाले. शेजार्‍यांना फार्म हाउसवर लावण्यासाठी म्हणून भेट दिले. आता १० वर्षांनी त्याचा मोठा वृक्ष झालाय. नुकताच फोटो पाठवला होता त्यांनी. Happy

अक्षता तुमचे लेख वाचून बागकाम करावं वाटत.मागचा एक लेख वाचून मी आणि माझ्या मुलांनी मेथी लावली,आता त्याला छानशी पालवी आली आहे.

छान धागा.

विक्रमसिंह, तो फोटो इथेही टाका की.

आमच्या घरात अशा इकडच्या दृष्टीने एक्सॉटिक वाटणारी झाडं आणून माझ्या गळ्यात टाकणार्ञा व्यक्तीने Wink कढीपत्त्याच्या बीया आणून लगेच लावल्या होत्या. पुढचे वर्षभर त्यातून काही उगवायची आम्ही वाट पाहणार आहोत. Wink मग वैतागून त्या बीयांच्या कंपन्यांशी संपर्क साधला तेव्हा ओह मग आम्ही तेवढ्या किमतीचं क्रेडीट देतो तुम्ही रोप मागवा हा लकडा लावला. मी काही त्यांना नवा बिन्नेस देणार नाही. कानाला खडा.

सध्या भारतीय दुकानात फारसं जाणं होत नाही पण माझी आई तिथे तिला आवडतं म्हणून कढीपत्ता सुकवून आणि थोडासा परतून इतर काही पाठवते तेव्हा आमच्यासाठी पाठवते. आय अ‍ॅम सो ब्लेस्ड कारण जानेवारीमध्येच गूळपोळ्याच्या निमित्ताने आलेल्या सामानातून तिचा कढीपत्ता माझ्या घरातल्या स्वैपाकात मी अगदी पुरवून पुरवून वापरते आहे.असो. उगा स्वतःलाच बस कर पगली फिलिंग येतंय Happy

ज्यांना आवडत/जमत असेल त्यांनी कुंडीत पण लावला पाहिजे इन्क्लुडिंग मी Lol
अर्थात >>कढीपत्ता ही उष्णकटीबंधीय वनस्पती (tropical plant) आहे, इथे आमचं घोडं पेंड खाणार आहे. Happy

माझ्या बाल्कनीत होता. पाच फुट वाढल्यावर बाजूच्या इमारतीत दिला तो त्यांनी खाली जमिनीत लावला. त्याचा वृक्ष झाला. कुंडीतलं झाड ही एक फक्त गंमत असते.

माझ्याकडे साधारण दहा वर्षाचे झाड आहे. ना आजवर माती बदलली ना कुंडी, ना कुठले खत ना औषध. फक्त ऊन-पाण्यावर जगते. नो डिमांड्स.
वर्षभर भरपूर तजेलदार पाने आणि दरवर्षी पावसाळ्यात काही डझन नवी छोटी रोपं देते. झाडांमधील साधूसंत जणू Happy

रोपं सगळीकडे वाटल्यामुळे त्याचा वंश दूरवर पसरलाय आता.

<<<माझ्याकडे साधारण दहा वर्षाचे झाड आहे. ना आजवर माती बदलली ना कुंडी, ना कुठले खत ना औषध. फक्त ऊन-पाण्यावर जगते. नो डिमांड्स.
वर्षभर भरपूर तजेलदार पाने आणि दरवर्षी पावसाळ्यात काही डझन नवी छोटी रोपं देते. झाडांमधील साधूसंत जणू >>>>

सेम पिंच.....
फक्त नवीन रोपे येत नाहीत.. बाकी एकदम गुणी बाळ Happy

माझा कडिपत्ता दिड वर्षे जसाच्या तसा आहे कमी नाही आणि नवीन पानं पण नाही.. मोठ्या कुंडीत लावू का? काही खायला प्यायला देऊ का?

माझ्याकडचा कढीपत्ता नर्सरीतून आणल्यावर पहिलं वर्षभर वाढला नाही, मेलाही नाही, होता तसाच उभा होता.

दुसर्‍या वर्षी थोडी थोडी उंची वाढली.

तिसरं वर्ष (पहिला लॉकडाऊन) - त्याला फुलं आली. त्यानंतर उंची वाढण्याचा वेग थोडा वाढला. एखादी फांदी छाटली की तिथे पुन्हा कोंब फुटायला लागले.

छाटलेल्या फांद्या मी तिरक्या कापून मातीत रोवून पाहायचे. त्याला पालवी फुटून मरून जायची. नेटवरचे खंडीभर व्हिडिओ पाहून त्यात सांगितलेलं सगळं करून पाहिलं. फांदी मातीत रोवताना दालचिनी/हळद्/कोरफडीचा रस यात बुडवून पाहणे वगैरे अनेक प्रकार केले. पण व्यर्थ. मग तो नाद सोडून दिला. कारण मुख्य खोड आता जोमाने वाढत होतं.

एक वर्षाने (दुसरा लॉकडाऊन) पुन्हा फुलं आली. उंची भराभरा वाढली. तजेलदार पानं, छान सुवास. आता बाजारातून क्वचित कढीपत्ता विकत आणते.

यंदा मार्चमध्ये फुलं आली नाहीत. मात्र तब्बल चार वर्षांनी कुंडीत अचानक तीन नवीन रोपं आली आहेत. ती सुद्धा जोमाने वाढतायत. त्यामुळे आय्याम्म हॅप्पी !!

चार वर्षं रोज पाणी, अधूनमधून कुंडीतली माती मोकळी करणे आणि (वावेच्या पद्धतीने) घरी तयार केलेलं खत घालणे - इतकं केलं आहे. साधारण १२ इंच व्यासाची कुंडी आहे. सकाळी ११-१२ वाजेपर्यंत बाल्कनीत कडक ऊन असतं. नंतर नाही.

घरी खत तयार करण्याची वावेची पद्धत कोणती? >> वावे चा कम्पोस्ट चा धागा आहे.

https://www.maayboli.com/node/66338
फारसं सुरवातीला विरजण म्हणून जैविक काही नसलं तरी वर्षभरात खत नक्की होतं.
माझं दोन वेळा फेल गेलं तरी परत कुठे ना कुठे वाचलं की करून बघायची उर्मी येते , तिसऱ्या वेळी छान झालं.

Pages