मी ,झोप आणि घड्याळ

Submitted by मुक्ता.... on 11 March, 2020 - 15:03

मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात एक मध्यम वर्गीय नोकरी करणारी कुटुंब वत्सल स्त्री आपल्याच झोपेशी काव्यात्म संवाद करत आहे...

मी ,झोप आणि घड्याळ

झोपेला म्हटलं ये आता डोळ्यांत
बांध ना घरटं....
मनाच्या झुल्यावर झोके घे छान...
तुझ्या आंदोलनांनी...पापण्या
जडशीळ होतील छान...
छताकडे बघत बघत तुला..
हजार कुर्निसात करतील...
तुझे झोके आणखीन उंच उंच घे....
म्हणजे, कसं होईल म्हणजे...
दमतील ना डोळे...आढ्याला लागलेले....
बंद होतील....काही तासांसाठी...
मग मी आतल्या आत बसेन.....
मोजत स्वप्नांची रास....
तुझ्या घरात असलेली अस्ताव्यस्त पसरलेली
घनदाट स्वप्न....चिडवतात मला ग....
पापण्यांची दार घट्टमिट्ट बंद असताना...
मेंदू आराम फर्मावत असताना...
तो मोबाईल सारखा चॅलेंज देतो....
पण तू झोपे तू हटू नक्कोस अजिबात...
माझं घर तुला आंदण दिलाय.....
तुला मोकळं अंगण दिलाय...मलाही आता खेळायचं आहे...
हराम असला तरी आराम हवाय.....
सारखच दचकायला होतंय ग..सारखंच...

जाग नाही आली तर...पाणी भरून नाही होणार ग..
जाग नाही आली तर...
माझी 8.22 चुकेल...मैत्रिणी नाही ,मैत्रिणी नाही ग...माझी ती डोअरला असलेली...
कॉर्नर ची जागा जाईल ग..
जाग नाही आली तर....
छे ग...यांना नको त्रास..त्यांची झोप झाली पाहिजे...यांना बाहेरच चालत नाही ग……
जाग नाही आली तर.....

नको नको तू येऊच नको...
स्वप्न नको, झुला नको....
आपण घड्याळाच्या काट्यावर धावत राहू...
माझं मेलीच काय?
मी तर सुपर मॉम आहे ना...
म्हातारी दिसले तर डाय लावीन
कम्बर मोडली तर बाम लावीन...
सिक्स साईन ऑफ एजिंग साठी...क्रीम लावीन...
पोपडे निघाले स्किन चे तर लोशन लावीन.
अर्ध्या झोपेने ऍसिडिटी झाली तर सोड्याची पावडर घेईन..
सगळं सगळं बाजारात मिळते ग झोपे...
नाही मिळत ती... शांत झोपेची किल्ली...
चल झोपुया....
अगबाई बेल वाजली....दूधवाला आला
मीच जाते...यांना पातेलं नाही कळायचं ना...

मुक्ता

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@मुक्ता -
>>>>>अगबाई बेल वाजली....दूधवाला आला
मीच जाते...यांना पातेलं नाही कळायचं ना...>>>> या ओळीवरती हसले. मला विनोदी वाटल्या. बाकी तिरकस हसू नव्हते. असो,

बरं सामो....नीट लक्षात नाही आलं म्हणून विचारलं....आणि रागाने नव्हतं बर....मनापासून थँक्स...
त्या ओळी म्हणजे .... कवितेतली स्त्री काम आटोपून झोपेच्या कुशीत शिरतंच असते आणि पहाट होते....अशा अर्थी आहेत...