तुम्ही मायबोलीवर लिहिण्यासाठी वेळ कसा काढता?

Submitted by बोकलत on 11 March, 2020 - 12:09

सगळ्यांना कोपरापासून दंडवत. तर तुम्हाला सगळ्यांना शिर्षकवरून लक्षात आलंच असेलच की मला काय बोलायचं आहे. माझी लिहिण्याची खूप इच्छा आहे परंतु कामाच्या व्यापामुळे म्हणावा तसा विचार करायला वेळ मिळत नाही. दिवसभर जास्तीत जास्त दोन चार कमेंट्स करण्यापलीकडे वेळ मिळत नाही. तर तुम्ही मायबोलीवर लिहिण्यासाठी वेळ कसा काढता?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या कडे वेळच वेळ आहे. वेळच वेळ!! माझा वेळ इथं कमी जावा यासाठी मला मदत हवी आहे. मला मायबोलीचं व्यसन लागले आहे.

वेळ लागतो... मी कधीकधी तीन तीन आठवडे लांब असतो माबो पासून... कधी रोज असतो...
जसा टाईम मिळेल तसे वाचायचे... मुद्दाम टाईम काढण्याइतके माबो वर काही नाही आहे...

सकाळी रिक्षात तीन मिनिटे. ट्रेनमध्ये चार मिनिटे. ऑफिसमध्ये दोनदा वॉशरूममध्ये सतरा सतरा मिनिटे. दुपारी तीनचा चहा घेताना सहा मिनिटे. परतीच्या प्रवासात पुन्हा ट्रेन आणि रिक्षाची अनुक्रमे चार आणि तीन मिनिटे... असा तुकड्यात रोज वेळ काढतो.

याऊपर आतासारखे जेवताना ऑनलाईन येतो. तसेच झोपण्यासाठी बेडवर लवंडल्यावर झोप लागेपर्यंत जर पोरे झोपली असतील तर निवांत माबोगिरी करता येते.

लिहायचं ठरवायच्या आधी काय लिहायचं हे ठरवायला वेळ काढावा लागतो मला. त्यात कितीही दिवस/महीने जाऊ शकतात. त्या नंतर एखाद दिवशी दोन ओळी कधी एक पॅरा असं करत करत कधी तरी पूर्ण होतं. शेवटी पेशंस इज द की Happy

मी नाही काढत वेळ.

वेळच मला काढतो आणि इथे घेऊन येतो जरा वेळ.

मी नाही काढत वेळ.

वेळच मला काढतो आणि इथे घेऊन येतो जरा वेळ.>>>>>>हे आवडलं Happy

ऑफिसमध्ये दोनदा वॉशरूममध्ये सतरा सतरा मिनिटे.>> म्हणजे वर्किंग अवर्स मधली ३४ मिनिटं रोज वॉशरूममध्ये घालवता..??? Rofl

झोपण्यासाठी बेडवर लवंडल्यावर झोप लागेपर्यंत पोरे झोपली असतील तर निवांत माबोगिरी>> हरे राम.... पोरे झोपल्यावर माबोगिरीत काय वेळ घालवायचा..??? Wink

बोकलत ,
तुमची ही व्यथा मी समजू शकतो . माझाही तोच प्रॉब्लेम आहे .
तुम्ही हा धागा काढला यावरून त्या मागची कळकळ समजते .
आभारी आहे .

खरं तर ,
मुळात , एकूण व्यापात ,
मला लेखनासाठी वेळ कमी मिळतो . वाचनही फारसं करायला मिळत नाही . - काहीच .
माबोहि नाही अन इतरही नाही .
पुस्तकं पाच दहा पानांच्या वर वाचली जात नाहीत
जेवढा वेळ मिळतो , जे शक्य आहे ते वाचतो .
जेव्हा शक्य आहे तेव्हा जसं जमेल तसे लिहितो .

माझ्या लेखनावर प्रतिक्रिया देणाऱ्यांनाही मी पटकन आभार म्हणू शकत नाही .
( त्यात एक गोष्ट आहे , की मी मोबाइलवरून काहीही ऑपरेट करत नाही ).
त्याबद्दल मी वाचकांची क्षमा मागतो .

इथे माबोवर किती तरी सुंदर लेखन आहे .
ते न वाचण्याचं दुःख आहे . त्या त्या लेखकांना प्रतिक्रिया देऊ शकत नाही याचीही खंत आहे .

कृपया लेखकांनी आणि वाचकांनी ही अडचण , माझा हा दोष समजून घ्यावा - हि विनम्र विनंती

बिपीन सांगळे तुम्ही एक महान लेखक आहात.
बोकलत यांची भुतावळ सतत फिरत असते, ती येऊन आठवण आणि प्रेरणा देते लिहायला. >>> मी लिहायला कंटाळा केला की कधीकधी माझं अकाउंट लॉगिन करून ते लिहितात.

ऑफिसमध्ये दोनदा वॉशरूममध्ये सतरा सतरा मिनिटे.>> म्हणजे वर्किंग अवर्स मधली ३४ मिनिटं रोज वॉशरूममध्ये घालवता..??? Rofl
>>>>>

चूक
मी म्हटलेय की ३४ मिनिटे माबोगिरीत जातात...
आयुष्यात फेसबूक व्हॉटसपही आहे..
आणि मुळात जे काम करायला वॉशरूममध्ये गेलोय ते ही थोडेफार आहे..
तब्बल तासभर मी विरंगुळा म्हणून तिथे बसतो..

हरे राम.... पोरे झोपल्यावर माबोगिरीत काय वेळ घालवायचा..??? Wink
>>>>>

आपल्या भावना समजू शकतो.
पण पोरे झोपल्यावर याचाच अर्थ मला ऑलरेडी एकापेक्षा जास्त पोरे असताना पुन्हा आणखी तेच ... कश्याला कश्याला.. Proud

मी लिहायला कंटाळा केला की कधीकधी माझं अकाउंट लॉगिन करून ते लिहितात.>>
मागे एका महान लेखक महोदयांना लॉगीन प्रॉब्लेम आला होता तेव्हा इतरांनीच त्यांच्या वतीने प्रतिसाद दिले होते, त्याची आठवण झाली.

म्हणजे... दोन पोरे वाल्यानी सेक्स करू नये कि काय ?
>>>>>
करावा की... त्यशिवाय लोकांना तिसरा होतो का
पण
लग्नानंतर ईतके वर्षांनी सेम पार्टनरसोबत
झोपली पोरं की व्हा सुरू.
असं सहजी नाही होत

राजमान्य राजश्री ऋन्मेष साहेब यांसी,
कोपरापासून दंडवत.

आपले खालील विधान वाचले,

"करावा की... त्यशिवाय लोकांना तिसरा होतो का
पण
लग्नानंतर ईतके वर्षांनी सेम पार्टनरसोबत
झोपली पोरं की व्हा सुरू.
असं सहजी नाही होत"

फारच क्विकबेट विधान वाटले. आपला नवीन धागा बर्याच काळापासून आला नव्हता. सध्याचा घरबंदीचा काळ बघता चिंता वाटत होती. आता चिंता मिटली. तुम्ही घरकामातून ( I.e. WFH) वेळात वेळ काढून इथे धागा/प्रतीसाद प्रसवाल यात शंका उरली नाही. Biggrin

सध्या तरी वेळ आहे माझ्याकडे. त्यामुळे अधून मधून डोकावते.
कामं सुरू झाली कि मग नाही जमणार कदाचित. तरीही वेळ काढणे काही अशक्य नाही. मिनिटभर पण लागत नाही कमेण्टायला.
(अखंडीत काम करणा-यांबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे)