करोना

Submitted by परशुराम परांजपे on 11 March, 2020 - 04:00

करोना विषाणू वेगाने पसरण्याचं कारण आहे दाटीवाटीने राहणारे, काम आणि प्रवास करणारी लोकं.
करोनापासून वाचण्यासाठी शाळेत जसं आपण खांद्यावर हात ठेवून एका हाताचे अंतर राखून रांग करत होतो, तसेच एक दहा फूट लांब बांबू जवळ बाळगायचा. माणूस दिसला की बांबू सरळ करुन माणसाला तितकं अंतर ठेवायला भाग पाडायचे.
काही वस्तू हवी असेल तर लांबून फेकायची कींवा बांबूला पिशवी बांधून जवळ घ्यायची. कशालाही हात लावला की लगेच सॅनिटायझरनं हात स्वच्छ धुवावेत.
महिनाभर घराच्या बाहेर पडायचं नाही. घरात सारखं साबणाचं पाणी फवारत रहायचे. घरापुढील कारंज्यात साबण पावडर टाकावी. दाराजवळ कोणी येऊ नये म्हणून दहा फुटांवर अडथळा उभारावा. मोबाईल बंद करून ठेवावा. जेवण पाण्यात उकळून उकळून घ्यावे. फळं सुध्दा!
जेवढं शक्य होईल तेवढे आयसोलेशन निर्माण करावं. बाकी तुम्ही सुचवा. वरचे उपाय मी पाळत आहे. कुणी पाळावे ही बळजबरी नाही. मला माझा जीव प्यारा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी आधीच दोन धाग्यांवर उपाय लिहिलाय त्यामुळे हा रोग खात्रीपूर्वक बरा होतो. इथे परत लिहितो. वाटवाघळच्या रक्ताने दरवाजावर ओ करोना कल आना लिहा.

अत्यंत उपायुक्त माहिती. ह्या लेखाची खरच गरज होती. एक शंका आहे - मोबाईल बंद करून ठेवावा - हा मोबाईल मधून पण पसरतो का? म्हणजे मला इतळीवरून कॉल आला तर उचलायचा ( कॉल) का नाही?
हा लेख तुमच्या नावसाहित whatsapp वर शेर केला तर चालेल का???
जाता जाता तुम्ही पण MD आहात का??

नाही मी एमडी नाही तर सुमडी आहे. शेर करायची जबाबदारी तूमची. मोबाईल बंद ठेवला तर कोणी बोलावणार नाही. एक सांगायचं राहिलं पुर्ण ब्रह्मचर्य पाळायचे, शक्ती राखून ठेवायची. क्षक्ष नाश हाच मृत्यू!

करोनामुळे पावलोपावली खबरदारी घेण्याचे उपाय सांगितले जात आहेत. मात्र, लोकांनी इतका अतिरेक केला आहे, की चार चार महिन्यांच्या चीजवस्तू साठवून ठेवणं सुरू केलं आहे. ताकही फुंकून घेण्यासारखा हा प्रकार आहे. क्रीडाविश्वही त्यातून सुटलेलं नाही. क्रिकेटच्या तर सर्वच स्पर्धा स्थगित कराव्या लागल्या आहेत... https://www.kheliyad.com/2020/03/coronavirus-indian-premier-league.html

मी आताच तालुक्याच्या ठिकाणी सुपर मार्केट मध्ये गेलो होतो तर तुफान गर्दी. दोन तीन दिवसांपूर्वी मोकळे ढाकळे असणारे दुकान आज फुल्ल भरलेले होते. लोक कमीत कमी दोन ते चार पाच हजार रुपयांची खरेदी करताना दिसत होते.