Pudina (पुदीना)- a plant to start kitchen gardening

Submitted by अक्षता08 on 8 March, 2020 - 00:29

एका संध्याकाळी बाल्कनीमध्ये चहा पीत असताना अचानक विचार आला. आपण का म्हणून balcony/kitchen garden सुरु करु नये ?
पण ज्या गोष्टीत आपल्याला शुन्य अनुभव किंवा माहिती आहे त्याची सुरुवात कुठून आणि कशी करायची ?
मग videos बघुन, blogs आणि पूस्तकं वाचून
प्राथमिक माहिती मिळाली.
पण जोपर्यंत आपण स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत पूस्तकी ज्ञान (therotical knowledge) उपयोगी नाही.
तर, शेवटी पुदीना लावायच ठरलं
पण पुदीनाच का?
ज्यांना बागकामामधला काही अनुभव नाही ते ही पुदीना लावुन, जगवुन वाढवु शकतात म्हणुन.

फक्त पुदीना लावताना घ्यावयाची काळजी ही की
त्यांना सुर्यप्रकाशाची गरज असते पण उन्हाळ्यात ज्या वेळेस सुर्याची प्रखरता खुप असते तेव्हा मात्र त्यांना थोड्या आडोश्याच्या जागी ठेवावे.पुदीन्याला खत दिले नाही तरी चालण्यासारखे आहे परंतु १५ दिवसांमधुन एकदा खत दयावे.

पुदीना लावण्याच्या दोन पध्दती आहेत.
१.पुदीन्याच्या काड्या ४५° मध्ये कापुन (जिथे पानं येतात त्याच्यावर) सरळ एका ग्लासात पाणी घालुन ठेवाव्या, दर ७-८ दिवसांनी पाणी बदलावे.
२. ४५° मध्ये कापलेल्या काड्या एका कुंडीत लावाव्या. साधारणतः १०-१५ दिवसात नवीन पानं यायला सुरुवात होते.

आपण लावलेल्या रोपाला/झाडाला जेव्हा नवीन पालवी फुटते/नवीन पानं येतात; ते बघण्यात जो आनंद आहे तो दुसऱ्या कशात नाही

WhatsApp Image 2020-03-08 at 10.55.37 AM.jpeg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हो मीसुद्धा पुदीना व बेसिल याप्रकारे काड्या आधी पाण्यात ठेवून मग मुळं फुटली की लावला होता.
पुदीना किती सुरेख फ्रेश दिसतोय.

माझा अनुभव

पाण्यातल्या काड्यांना मुळेही फुटली पालवीही आली पण नंतर जळून गेला पुदिना

कुंडीतला हळू वाढत होता पण कदाचित पावसाच्या माऱ्यात टिकला नाही. (आम्ही या नवीन जागेला हळूहळू सरावतोय. त्यामुळे जसे लक्षात येतील आणि जमतील तसे बदल करतोय कुंड्या ठेवण्याच्या जागेत)

आता परत लावला आहे कुंडीत. पालवी फुटलेय. आता टेरेसला काही भागात अच्छादन (सॉर्ट ऑफ मंडप केलाय) केलं आहे (हिरव्या रंगाचे गार्डन कर्टन येतात त्याने.) आता नवीन छोटी झाडे आणि पुदीना वगैरे ज्याला पावसाची झोडपणी वाढेपर्यंत सहन होणार नाही ती शिफ्ट केल्येत त्या मंडपात. आता तरी तगावा अशी आशा आहे

मी पण लावला होता . छान आला होता .फोटोतल्या प्रमाणे पहिल्यांदा पाने आली . पण नंतर आली ती फारच पातळ आली . काड्या ही बारीक वाटल्या . मातीत काही कमी पडते आहे का ? खत म्हणून काय घालता येईल ? सध्या बाल्कनी मध्ये अजिबात ऊन येत नाही म्हणून असेल का ?

तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने बाजारातून आणलेल्या पुदिन्याच्या काड्या ४५ अंशात कापून पाण्यात ठेवल्या होत्या. त्यातल्या ४-५ काड्यांना लगेच मुळं फुटली. त्या काड्या कुंडीत लावल्या. त्यातली एकच काडी रुजली.
आता त्यातून मस्त पुदिना तरारला आहे. Happy

तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने बाजारातून आणलेल्या पुदिन्याच्या काड्या ४५ अंशात कापून पाण्यात ठेवल्या होत्या. त्यातल्या ४-५ काड्यांना लगेच मुळं फुटली. त्या काड्या कुंडीत लावल्या>> असेच सगळे करुनही थोडा वाढला की पुदिना सुकून जळून जातोय माझ्याकडे. ३-४ वेळा झाले असे

टेरेसवर ठेवला/ खिडकीत ग्रिलमधे ठेवला पण काही फरक नाही. एंड रिझल्ट पुदिना वॅनिश

अरे हो की माझाही पुदीना गायब झालाय.कदाचित पावसामुळे गळला असावा.

याबबत आणखी एक निरीक्षण म्हणजे पुदीना कापला/तोडला की अजून बहरायला हवा. त्याऐवजी सुकत जातो.ही दुसरी वेळ आहे.

मी पण लावला होता . छान आला होता .फोटोतल्या प्रमाणे पहिल्यांदा पाने आली . पण नंतर आली ती फारच पातळ आली . काड्या ही बारीक वाटल्या . मातीत काही कमी पडते आहे का ? खत म्हणून काय घालता येईल ? सध्या बाल्कनी मध्ये अजिबात ऊन येत नाही म्हणून असेल का ? >>

मलाही हा अनुभव वारंवार येतोय. काय तोडगा आहे ह्यावर?

पुदीन्याला खत दिले नाही तरी चालण्यासारखे आहे परंतु १५ दिवसांमधुन एकदा खत दयावे >>

खताबद्दल अधिक माहिती द्या.

परत पुदिन्याच्या काड्या लावल्या.यावेळी एकदम मोठमोठी पाने आली आहेत.मिरच्या,धणे पेरले आहेत.

Pages