अग ए मर्दाने

Submitted by Swamini Chougule on 7 March, 2020 - 22:58

अग ए मर्दाने
बन की तू बी झाशीची राणी
बन की जरा तू बी जिजाऊवानी
बन की तू बी सावित्रीची वाणी
पाज की तुझ्या बुद्धिमत्तेचं पाणी
गा की तू बी आहिल्येची गाणी

अग ए मर्दाने
काय रडतेस अबलेवानी
हो की जरा कालीवानी
वाकड्या नजरेने बघल त्याला
दाखव की तुझ्या अंगातलं पाणी

अग ए मर्दाने
कशाला जगतेस ग घाबरल्यावानी
विसरलीस काय आहेस तू वाघीण
कशाला ग तुला हवी कोणाची मदत
हो स्वतः च्या पायावर उभा कर की जतन
©Swamini chougule
अग ए मर्दाने
झुकव जग तुझ्या पायाशी
आहे की तेवढी धमक तुझ्यापाशी
बनून मुलगी, पत्नी, आई, बहीण अन् मावशी
राह की उभी तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी
त्यांची बन तलवार अन् ढाल नको बनू काळजी
म्हणूनच म्हणते बाई हो वाघीनी वानी

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
(कविता रांगड्या कोल्हापूरी भाषेत आहे त्यामुळे शुध्द लेखन नाही तपासले तर बरे होईल)

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे कविता.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

@परांजपे
माझी कविता कोणाला तरी वाचायला सुचवली त्या बद्दल आभार