दुनियादारी कळली आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 5 March, 2020 - 06:57

वीट मुळातुन हलली आहे
जरी इमारत तगली आहे

दुनियेमध्ये फिरून आले
दुनियादारी कळली आहे

(प्रेम-बीम सब झूठ यहा पर)
फ्रेझ ही खरी ठरली आहे

'जग कळते मज, मी न जगाला'
म्हणून दुनिया दमली आहे

उपरी ठरते मैफलीत तू
तुला वाटते जमली आहे

दिवस उद्याचा पाहिला कुणी ?
ब्याद आजची टळली आहे

बिनापगारी कामगार तू
दुनिया जरी उजळली आहे

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users