मायबोलीवरील संक्षिप्त शब्द / वाक्य

Submitted by मित्रा on 4 March, 2020 - 16:46

-^- नमस्कार मायबोलीकरांनो -^-
मी नवीन मायबोलीकर असून, मायबोलीवर उपलब्ध साहित्यावर आलेल्या भन्नाट प्रतिक्रिया वाचताना मजा येते..पण त्यात बरेचजण संक्षिप्तरूपे वापरतात जसे कि पु.ले.श (माझ्या माहितीप्रमाणे पुढील लेखनास / लेखास शुभेच्छा). मला त्यातील बऱ्याच शब्दांचे दीर्घरूप माहित नाही.
तर अश्या मायबोली संक्षिप्तरूपांचे दीर्घरूप अशी काही सूची मायबोलीवर उपलब्ध आहे का? असेल तर दुवा द्या आणि नसेल तर या धाग्यावर जमेल तेवढी माहिती दिली तर खूप मदत होईल आणि वाचनात अजून मजा येईल...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझे स्वागत आहे मित्रा! मला तुझे हे छोटे का होईना पण पूर्ण मराठीत लिहीलेलं लिखाण आवडलं. हल्लीचं इंग्रजीनं बरबटलेलं मराठी वाचताना किंवा ऐकताना फारच त्रास होतो, फक्त माबोवरच असं नाही तर सगळीकडे. जाता जाता माबो हे अजून एक संक्षिप्त रूप तुझ्यासाठी Happy