Coronavirus आणि गुंतवणुकीवर परिणाम

Submitted by sneha1 on 29 February, 2020 - 10:53

मंडळी,
Coronavirus मुळे मार्केट बर्‍यापैकी डाऊन झाले आहे. तर ह्यावर काय करायला पाहिजे? ४०१ के, mutual funds, IRA ह्यासाठी आणि बाकी पण गुंतवणुकी साठी चर्चा अपेक्षित आहे.
धन्यवाद!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वयं प्रभू खेडे ही भारताची ओळख होती.
खेड्यातील सर्व गरजा खेड्या मध्येच भागल्या जायच्या.
हळू हळू बदल होत गेला स्वयं प्रभू खेडी नष्ट झाली आणि अर्थ व्यवस्था जागतिक झाली.
सुरवातपासून पासून लोकांची आर्थिक स्थिती बदलत गेली असंख्य सुखाची साधने उपलब्ध झाली लोक भौतिक सुख उपभोगू लागले.
आता ह्याला उतरती कळा लागली आहे.
आयुष्य अस्थिर झाले आहे पूर्वीची जगण्याची सर्व साधने नष्ट झाली आहेत लोक हे पहिले स्वलंबन वर आयुष्य जगात होते ते swalambhan नष्ट झाले आणि लोकांचे आयुष्य दुसऱ्या वर अवलंबून झाले.
नोकरीची कोणतीच शास्वती नाही ,ठराविक लोकच जगाचे स्वामी झाले .
लोकांना अनेक समस्या येवू लागल्या.
व्हायरस चीन मध्ये आणि चिंता भारतात ह्याला ह्या सर्व गोष्टी जबाबदार आहेत.

sneha1,
आम्ही सध्या काहीच बदल करणार नाही. २०१९ च्या IRA चे पैसे अजून भरायचे आहेत ते भरु. सीडी मॅच्य्युअर झाली, त्याला रीन्युअल रेट खास मिळणार नव्हता म्हणून ते पैसे मनीमार्केटला टाकले. बाकी ४०१ के वगैरे नेहमी प्रमाणे. अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन थोडे अ‍ॅडजस्ट करु पण त्याचा मार्केटशी काही संबंध नाही. ते आमच्या सध्याचे वयोगटाच्या हिशोबाने अ‍ॅडजस्ट करतोय.

धन्यवाद!
स्वाती, २०१९ च्या IRA चे पैसे आम्ही पण नाही भरले अजून. तुमची उत्तरे नेहमीच चांगली असतात.

401k ला आत्ता कंट्रीब्युशन वाढवलं मी. ते पैसे काढायला लागणार नाहीयेत आणि लाँग टर्म मध्ये मार्केट वर येईल.
अर्थात हा कुणाला सल्लाबिल्ला अजिबात नाही. आणि चूक का बरोबर ते काळ सांगेलच.

Sanjay111, संपूर्ण स्वावलंबित्व आता नवीन जगात कोठेच शक्य नाही. त्यासाठी आपल्याला इतिहासातच जगावे लागेल. अगदी वैयक्तिक आयुष्यात अन्न स्वतःचे स्वतः पिकवून खायचे म्हणून शेती केली तरी पाण्यासाठी, पंपासाठी, अवजारांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. त्या सर्व गोष्टी आपण घरी बनवू नाही शकत. मोबाईल, इंटरनेट साठी वेगळ्या लोकांवर अवलंबून राहावे लागते. तीच गोष्ट देशाची देखील. आपल्याला लागणारे सर्व पेट्रोल, लोह, कोळसा, युरेनियम हे आपल्याकडे उपलब्ध नसते. अश्या वेळी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणे भाग आहे. ते नको असेल तर देशातील सर्वच लोकांनी अश्मयुगीन दिनचर्या स्वीकारावी, तरच राष्ट्रीय स्वावलंबन शक्य होईल.

प्रो ग्रो प्लस प्लॅन आहे दहा वर्षाचा, पाच वर्ष पैसे भरले आता काढू शकते पण मार्केट खूपच खाली गेलं आहे, अर्धे पैसे काढून अर्धे ठेवावे असा विचार आहे.

उपचार सापडेल व्हायरस वरती.
शोध चालू आहे जगातील संशोधन क्षेत्रातील लोकांचे.
जग एकमेकावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे हे मात्र अश्या प्रसंगामुळे सिध्द होते.

चंपा,
ही वेळ मार्केट टाईम करायची नाही. तुम्हाला हे पैसे नजिकच्या काळात लागणार नाहीत या हिशोबाने तुम्ही दहा वर्षांसाठी गुंतवले होते ना? तसे असेल तर आता एकदम घाबरुन जावून काढायची घाई करू नये असे मला वाटते. आत्ता तुम्हाला जे नुकसान दिसत आहे ते पेपरवरच आहे. पैसे काढलेत तर ते नुकसान प्रत्यक्षात असेल. हे वायरस प्रकरण झाले नसते तरी अमेरीकन मार्केटात १०% करेक्शन अपेक्षित होतीच त्यात वायरसमूळे जी अनिश्चितता आली त्याने अजूनच भर पडली. वॅक्सिनसाठी प्रयत्न सुरु आहेत. वायरस आटोक्यात रहावा म्हणून वर्ल्ड हेल्थ या दृष्टीनेही एकत्र प्रयत्न केले जातील. आपल्या बाजूने आपण वायरसचा प्रसार कमी होण्यासाठी सामान्य माणूस म्हणून स्वच्छतेचे काही साधे नियम पाळून हातभार लावू शकतो.

धन्यवाद स्वाती. वीसवीसचा प्रीमियम अजून भरला नाही. प्रीमियम भरला नाही तर दोन महिन्यात तसेही पैसे काढावेच लागतील. त्यावेळी मार्केट चांगले असेल तर पूर्ण नाहीतर अर्धे पैसे काढेन.

कोसळलेले स्टॉक मार्केट मला अतिशय आवडते, कारण त्यामुळे मनसोक्त खरेदी करता येते. स्टॉक मार्केट अजून 5-10% खाली गेले आणि बेअर टेरिटरीत गेले तर बहार येईल.

कोसळलेले स्टॉक मार्केट मला अतिशय आवडते, कारण त्यामुळे मनसोक्त खरेदी करता येते.

अगदी बरोबर

जुन्या बाजारात जशा अमूल्य वस्तू अगदी कवडीमोलाने मिळतात तसेच पडक्या बाजारात उत्तम समभाग फार कमी किमतीला मिळतात.

मला बाजारात झालेला सर्वात जास्त फायदा हा २००८ च्या मंदीनंतर घेतलेल्या समभागानी दिला आहे.

मग "एस आय पी" वाले अर्थतज्ज्ञ काहीही म्हणोत.

कोसळलेले स्टॉक मार्केट मला अतिशय आवडते, कारण त्यामुळे मनसोक्त खरेदी करता येते. स्टॉक मार्केट अजून 5-10% खाली गेले आणि बेअर टेरिटरीत गेले तर बहार येईल.>>>>>>>>+१११११
Valuations खूपच जास्त आहेत.
Market PE २० पर्यंत तरी जायला हवा.