म्हणी ओळखा : चित्रखेळ

Submitted by कुमार१ on 29 February, 2020 - 02:26

थोडा विरंगुळा.
बघा या चित्रातील म्हणी ओळखता येतात का ?
संयोजक,
चालेल ना हा उपक्रम ? धन्यवाद.

mhnaee pict.png

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१६. दुष्काळात तेरावा महिना
१७. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे
१८. रात्र थोडी सोंगे फार
२०. उंदराला मांजर साक्ष

माउमैया, यातली बहुतेक उत्तर दिलेली आहेत.
आता फक्त उरलेली उत्तर शोधूया.
धागाकर्ते स्वतःच त्याबद्दल संभ्रमात आहेत.

२१. दुरून डोंगर साजरे
२२. आयत्या बिळात नागोबा
२३. नाचता येईना अंगण वाकडे
२४. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी
२५. एक घाव दोन तुकडे

२४. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी
>>> हे पटतंय .

टीप:
हे कोडे मला मित्राकडून मिळाले. त्यामुळे अधिकृत उत्तरे माहित नाहीत. जिथे मतभिन्नता आहे तिथे आपण बहुमताने ठरवू.
धन्यवाद.

छान आहे खेळ.

१६. दुष्काळात तेरावा महिना,
१८. रात्र थोडी सोंगे फार,
२१. दुरून डोंगर साजरे
या ३ विशेष आवडल्या.

१९ व २४ बद्दल एकांना विचारले. ते म्हणाले की कोड्याचे उत्तर देताना चित्रक्रम आणि उत्तराचा शब्दक्रम जुळला पाहिजे.
>>>>>
म्हणून २४ = दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, हे उत्तर नसावे.

१९ = पुढच्यास ठेच , मागचा शहाणा , याबद्दलही साशंकता वाटते.

>>>>
चित्रक्रम आणि उत्तराचा शब्दक्रम जुळला पाहिजे.>>>>
हा प्वाइंट बराबर वाटतोय.
डोके खाजवावे लागेल बरेच.

खास 'करोना' सक्तीच्या सुटीसाठी नवा खेळ
म्हणी ओळखा

एकूण ५ ओळखायच्या आहेत. प्रत्येक म्हणीसाठी ३ शब्द शोधसूत्र म्हणून देत आहे. ते शब्द उत्तरात जसेच्या तसे असणार नाहीत. फक्त त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा .तसेच त्यांचा क्रमही उत्तरात ओळीने नाही.

१. दौड, नकार, शरीर

२. भंग, अवयव, प्राणी

३. वाढ, बोट, पहाड

४. सम्राट, दाम, कप्पा

५. ईश्वर, कलत्र, ती

४.
पाण्यात राहुन माशाशी वैर पक्तरु नये?
५.
डोंगर पोखरुन उंदीर काढणे.
६.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
७.
उँटावरुन शेळ्या हाकणे.
८.
गोगलगाय पोटात पाय.
१०.
नाव मोठ लक्षण खोट.
११.
कुत्र्याची शेपुट वाकडी ती वाकडीच.
२०.
उंदराला मांजराची साक्ष.
२१.
दुरून डोंगर साजरे.


एका हाताने टाळी वाजत नाही

पाण्यात राहून माशाशी वैर पत्करु नये

डोंगर पोखरुन उंदीर काढणे

गोगलगाय पोटात पाय
१०
नाव मोठे लक्षण खोटे
११
कुत्र्याची शेपूट वाकडी
१३
शेरास सवाशेर
२३
नाचता येइना अंगण वाकडे

१५.
चार दिवस सासुचे चार दिवस सुनेचे.

अंधारात तीर मारलाय गं.. Lol कुमारदांनी बरोबर का चुक हे कुठ सांगितलंय अजुन??

२.
एका हाताने टाळी वाजत नाही.
१६.
दुष्काळात तेरावा महीना!
१७.
अंधाळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.

खेळातील सुरवातीचे चित्र दिसत नव्हते अशी तक्रार आल्याने ते पुन्हा चढवले.
त्यातून काही नवे लोक इथे आले, धन्यवाद. तुमचे बरोबर आहे.

सर्व उत्तरे आधी देऊन झाली आहेत. फक्त १९ व २४ वर एकमत नाही.

१९ = पुढच्यास ठेच , मागचा शहाणा आणि
२४ = दोन्ही घरचा पाहुणा उपाशी,

ही उत्तरे चित्रांच्या क्रमानुसार योग्य वाटत नाहीत. त्यावर वेगळा विचार जरूर करा.
(कोडे मी तयार केलेले नाही).

३.
आंधळा दळतोय कुत्रा पिठ खातोय.
१८.
खाली मुंडी पाताळ धुंडी

<१८.
खाली मुंडी पाताळ धुंडी >>> चूक.

Pages