सनकी भाग १४

Submitted by Swamini Chougule on 28 February, 2020 - 11:34

काया आणि सुधीर ऑडीटोरीअम मधून बाहेर पडले ते सरळ गीता मिलमध्येच पोहचले होते. पक्या त्याच्या 30-40 माणसां बरोबर तिथे होता. रिचा अजून बेशुद्ध होती. कायाने व सुधीरने काळा मास्क घातला होता.कायाने रिचाच्या तोंडावर एक ग्लास गार पाणी मारले तेंव्हा रिचा शुद्धीवर आली.ती गडबडून इकडे तिकडे पाहू लागली.ती स्वतः ला सोडवण्यासाठी हात-पाय हलवू लागली पण तिला खुर्चीला करकचून बांधले होते. रिचाने कायाला त्याही अवस्थेत ओळखले. ती म्हणाली.

रिचा,“काया मास्क घातलेस ,कपडे बदलून आलीस तरी मी तुला ओळखले कारण असे नीच काम तूच करणार!पहिल्या पासून माझा तुझ्यावर संशय होता पण तू इतक्या खालच्या थराला जाशील असे वाटले नव्हते.” ती कायाकडे तिरस्काराने पाहत बोलत होती.

काया,“हे बरे झाले !चला म्हणजे आता कोणता ही आड पडदा ठेवायची गरज नाही सुधीर काढ तो मास्क”अस म्हणत तिने मास्क काढला. सुधीर मात्र घाबरला पण त्याने ही मास्क काढला.

रिचा,“ तुला काय वाटते ग ? माझे अपहरण करून शिवीन तुला मिळेल?how rubbish you are!”अस म्हणून ती हसली.

काया,“अरे वा! तुला तर सगळंच आठवतंय.मला वाटलं अजून नाटक करतेस की काय? तुला सगळं माहीत आहे ना की शिवीन आणि माझे अफेर होते. माझ्याशी लग्न कर म्हणून मी त्याच्या मागे लागले की त्याने मला सोडले.तो नालायक आणि तू त्याच्या पेक्षा महा- नालायक.”हे सगळं ती रागाने बोलत होती.

रिचा,“ what the hell is that? तू आमची बॅचमेट होतीस पण शिवीन आणि तुझे अफेर कधीच नव्हतं.शिवीन तर तुला ओळखत ही नव्हता उगीच वेड्यासारखे काही तरी बरळू नकोस.” रिचा जवळ जवळ ओरडली.

काया,“shut up; you bitch!मी वेडी नाही; खोटारडे! शिवीन फक्त आणि फक्त माझा आहे.”अस म्हणून ती रिचाला मारायला चालली पण सुधीरने तिला धरली.

रिचा,“तुम्हाला काय वाटतंय पोलीस आणि शिवीन मला शोधू शकणार नाहीत!माझे अपहरण करून तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. शिवीन कधीच तुझा नव्हता आणि कधीच तुझा होवू शकणार ही नाही. You stupid girl.”रिचा असं मोठ्याने ओरडत होती.

आणि काया तिच्यावर रागा रागाने धावून जात होती.पण तिला सुधीरने धरून तेथून नेले व पक्याला रिचाचे तोंड बांधायला लावले. पक्याने रिचाचे तोंड टेप लावून बंद केले व तो ही तिथून निघून गेला. रिचा आपण कोठे आहोत ते पाहत होती. जागेचे निरीक्षण करत होती. सगळीकडे कापसाचे ढीग व धूळ या खेरीच काही नव्हते. ते त्या बंद पडलेल्या टेक्सटाईल मिलचे गोडावून होते.
सुधीर कायावर चिडला होता कारण रिचाला आता तिचे कोण अपहरण केलय हे माहीत झाले होते.तिला जर सोडले तर ती सरळ पोलीसात जाणार व आपण पकडले जाणार या विचाराने तो घाबरला होता. सुधीर कायाला बोलू लागला.

सुधीर,“ काया दि तू रिचा समोर का आपले चेहरे येऊ दिलेस.आता ती आपल्याला सोडेल का आणि शिवीन तो काय करेल याचा विचार केलास का?”तो कायावर चिडून बोलत होता.

काया,“गप्प ए!मूर्खा तिने आपल्याला सोडण्या अगोदर आपण तिला सोडणार आहोत का? घाबरट कुठला” ती त्याच्यावर खेकसली.

सुधीर,“ म्हणजे तिचा जीव घ्यायचा? तो घाबरून म्हणाला.

काया,“हो,ऐक पक्या उद्याची सकाळ ती रिचा पाहणार नाही याची काळजी तू घ्यायची.मागशील तितके पैसे मिळतील तुला.” तिने पक्याला ठामपणे सांगितले.

पक्या,“ ठीक आहे तुम्ही काळजी नका करू मॅडम” तो हसत म्हणाला.

सुधीर,“पण आपण तिचे फक्त अपहरण करणार होतो ना!” तो भेदरलेल्या नजरेने कायाकडे पाहत म्हणाला. पण कायाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

पक्या आता रिचाला संपवायची तयारी करायला लागला.
इकडे कमिशनर साहेब व शिवीन पोलिसांचा फौज- फाटा घेवून G.P.S ट्रॅकरच्या साहाय्याने निघले. ते मुंबई बाहेरील एका जुन्या गीता नावाच्या टेक्सटाईल मिलच्या बाहेर पोहचले.G.P.S सिग्नल आणखीन स्ट्रॉग झाले होते. याचाच अर्थ रिचा तिथेच होती. शिवीन व काही पोलीस कसला ही आवाज न करता हळूहळू त्या मिलला असणार्‍या खिडक्यांतून रिचा कुठे दिसते का व एकूण आत माणसे किती आहेत? याचा अंदाज घेत होते. असेच पाहत असताना शिवीनला रिचा एका खुर्चीला बांधलेली दिसली.
शिवीनने इशारा केला. त्याचा इशारा मिळताच पोलीसांनी सगळ्या मिलला घेरले. कमिशनर आणि राहिलेले पोलीस मेन गेटने आत गेले. शिवीन खिडकीतून रिचा जिथे होती तिथे उतरला व हळूच त्याने रिचाला सोडवून घेतले. रिचा त्याला काही बोलणार तर शिवीनने तिच्या तोंडावर हात ठेवला व तिला गप्प बसवले.ते दोघे पक्याच्या माणसांची नजर चुकवत ,लपत -छपत मिलच्या मेन दाराकडे निघले कारण कमिशनरनी त्याला तिथेच बोलावले होते. ते मिलच्या मुख्य एरीयात पोहचले आणि शिवीन व रिचाला पक्याने पाहीले. त्याने व त्याच्या माणसांनी दोघांना पकडले. तो पर्यंत कमिशनर व पोलीस मिलमध्ये घुसले.पक्या व त्याच्या माणसांना पोलीसांनी पकडले.शिवीन आणि रिचाला ही पोलीसांनी सोडवले. काया व सुधीर लपून हे सगळे पाहत होते. ते पळून जाण्याच्या प्रयत्नात होते पण ते ही पकडले गेले.
सुधीर व कायाला तिथे पाहून शिवीनला मात्र आश्चर्याचा धक्का बसला. त्याने प्रश्नार्थक नजरेने रिचाकडे पाहीले.तो पर्यंत काया व सुधीरला पोलीसांनी अटक केले. रिचा त्याला काही सांगणार तो पर्यंत कायाने एका पोलीसाचे तिच्याकडे लक्ष नाही याचा फायदा घेऊन बंदूक हिसकावून घेतली. शिवीन व रिचा पोलीस कमिशनर बरोबर मेन दारात उभे होते व काया आणि सुधीर त्यांच्या समोर उभे होते. तिने बंदूक रिचावर रोखली. पोलीस तिला धरणार पण ती ओरडली.

काया,“ बाजूला व्हा नाही तर या रिचाला गोळी घालीन.”

ती त्वेषाने ओरडली. व कोणाला काही समजण्या आधी तिने रिचावर गोळी झाडली. पण डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच शिवीन चपळाईने रिचा समोर आला आणि गोळी शिवीनला लागली. शिवीनचे रक्त रिचाच्या तोंडावर उडले. रिचा मोठ्याने शिवीन म्हणून किंचाळली.शिवीन जागेवर कोसळला. ते पाहून कायाच्या हातातील बंदूक गळून पडली. एका कॉन्स्टेबलने बंदूक उचलून घेतली. सुधीर व कायाला आणि पक्या त्याच्या गँगला पोलीस घेऊन गेले.
इकडे शिवीन डोळे झाकू लागला. रिचा रडून त्याला सतत उठवत होती. कमिशनर ने एम्ब्युलन्स बोलावली. एम्ब्युलन्स पंधरा मिनिटात आली. शिवीनचे रक्त वाहत होते.रिचा रक्त थांबवण्याचे प्रयत्न करत होती. शिवीन आता बेशुद्ध झाला होता. शिवीनला एम्ब्युलन्समध्ये नेले गेले रिचा त्याच्या जवळच बसली.
कमिशनर साहेबांनी रिचाच्या वडीलांना फोन करून शिवीनच्या आई-वडिलांना नानावटी हॉस्पिटलमध्ये बोलावले. रिचा आणि शिवीनचे आई- वडील घाबरून हॉस्पिटलमध्ये पोहचले. एम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या दारात पोहचली. शिवीनला स्ट्रेचर वरून हॉस्पिटलमध्ये आणले गेले. रिचा पूर्ण शिवीनच्या रक्ताने माखली होती. शिवीन बेशुद्ध होता. हे पाहून रिचा आणि शिवीनच्या आई -वडीलांना धक्का बसला. शिवीनची आई तर शिवीनची अवस्था पाहून जागेवरच कोसळली. तिला रिचाच्या आईने सावरले. रिचाचे मात्र कोणाकडेच लक्ष नव्हते. शिवीनला डॉक्टरांनी डायरेक्ट ओ.टी मध्ये घेतले. रिचा तिच्या वडीलांना मिठी मारून मोठं मोठ्याने रडू लागली. शिवीनचे वडील स्तब्ध होते. पण त्यांच्या डोळ्यातून नुसते अश्रु वाहत होते.शिवीनची आई ही रडत होती.तिला रिचाची आई सावरत होती.
रिचाला खुर्चीवर बसवुन रिचाचे वडिल कमिशनरकडे गेले.

सरनाईक,“ शिवीनला गोळी कशी लागली?” त्यांनी विचारले.
कमिशनर,“ shivin is very breve. Mr sarnaik you and your daughter are very lucky. She has life partner like shivin कारण शिवीनने रिचावर ओढवलेले जीवघेणे संकट स्वतः वर घेतले. रिचावर झाडली गेलेली गोळी त्याने स्वतः वर घेतली.त्याच खूप प्रेम आहे रिचावर” ते सांगत होते.

कमिशनर शिवीनच्या वडीला जवळ गेले व म्हणाले.

कमिशनर,“Mr k.t शिवीनला काही होणार नाही.he is very breve so don’t worry.” ते त्यांच्या खांद्यावर हात ठेवत बोलले.

Mr.kt,“ पण रिचावर किंवा शिवीनवर कायाने का गोळी झाडली? अस काय शत्रुत्व आहे तिचं माझ्या मुलांशी की; ती त्यांच्या जीवावर उठली आहे? त्या दोघांनी ही कधीच कोणाचे वाईट केले नाही.” त्यांनी प्रश्नार्थक नजरेने कमिशनरला विचारले.

कमिशनर,“ ते मी शोधून काढेनच” ते ठामपणे म्हणाले.
नंतर कोणीच काही बोलले नाही. दोन तासाने ओ.टीचे दार उघडले डॉक्टर बाहेर आले तसे त्यांच्या भोवती सगळे गोळा झाले. सगळ्यांच्या नजरेत एकच प्रश्न होता.शिवीन कसा आहे.डॉक्टर बोलू लागले.

डॉक्टर,“ आम्ही शिवीनच्या छातीमधील गोळी काढली आहे. गोळी हार्टच्या एक इंचवर लागली आहे त्यामुळे जरा बरे पण...”म्हणून डॉक्टर थांबले.

रिचा,“पण काय? डॉक्टर शिवीन ठीक आहे ना?”ती डोळ्यातील पाणी पुसत म्हणाली.

डॉक्टर,“ no he is not fine. रक्तस्त्राव खूप जास्त झालाय. त्याला येत्या सहा तासात जर शुद्ध नाही अली तर.... काही सांगू शकणार नाही. hope for the best. आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करू. तुम्ही ही त्याच्यासाठी प्रार्थना करा.”असे म्हणून ते निघून गेले.

हे ऐकून सगळेच स्तब्ध झाले. शिवीनची आई मात्र खूप रडत होती. त्याचे वडील स्तब्ध होऊन एका खुर्चीत बसले होते. शिवीनला I.C.U. मध्ये हलवण्यात आले. त्याचे आई व वडील काचेतून त्याला पाहत होते व देवाकडे त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत होते. हॉस्पिटलच्या सगळ्या फॉर्म्यालिटी रिचाच्या वडीलांनी पूर्ण केल्या. रिचाची आई देखील प्रार्थना करत होती. रिचा I.C.U चे दार उघडून आत गेली. शिवीनच्या शरीराला ईसीजी मशीन,बी.पी मशीन,नाका-तोंडाला ऑक्सिजन मास्क लावले होते त्याच्या एका हाताला ड्रीप लावून रक्त चढवण्यात आले होते. तो अगदी शांत डोळे झाकून पडला होता.I.C.U.च्या त्या शांत वातावरणात ईसीजी मशीनचा आवाज जीवघेणा वाटत होता. रिचा त्याच्या बेड जवळ एका स्टूलवर त्याचा हात धरून बसली व ती बोलू लागली.

रिचा,“ शिवीन तू चिटिंग केलीस माझ्याशी.तू मला सोडून कोठेही जाणार नाहीसं. समजलं तुला! आपण दोघांनी पाहीलेली स्वप्ने जगायची आहेत आपल्याला आणि हो तू काय सरप्राईज देणार होतास मला? असं खुशाल झोपून राहू देणार नाही मी तुला समजले. हे बघ मी जातेय त्या कायाने जे तुझ्यावर आरोप केलेत ना ते मला खोडून काढायचे आहेत. ती खोटं बोलतेय हे सिद्ध करायचे आहे मला.मी परत येई पर्यंत तू डोळे उघडले पाहिजेत समजलं.”

ती असे म्हणून उठली व शिवीनच्या निस्तेज चेहर्‍यावरून हात फिरवले. त्याच्या केसातून हात फिरविला व त्याच्या कपाळाचे प्रेमाने चुंबन घेतले. डोळे पुसले व एकदा त्याच्याकडे पाहून ती I.C.U.च्या बाहेर पडली.

आत्ता पर्यंत शिवीनला कायाने गोळी घातली ही न्यूज सगळीकडे पसरली. रिचाचे वडील तिचा फोन घेऊन आले व तिला म्हणाले कोण एस.एस आहे त्याचा फोन सतत येत आहे त्याला तातडीने बोलायचे आहे असे म्हणत आहे. तिने फोन घेतला तिकडून एस. एस बोलत होता.

एस.एस.,“मला माहित आहे ही वेळ नाही बोलायची; शिवीन बद्दल कळले मला पण काया बद्दल खूप महत्त्वाची माहिती व तिच्या बद्दल सर्व काही सांगणारा माणूस माझ्या बरोबर आहे. मी तुमच्या कामासाठीच दिल्लीला गेलो होतो.” तो पुढे काही बोलणार तर रिचा बोलली.

रिचा,“ठीक आहे तुम्ही त्यांना घेऊन मुख्य पोलीस स्टेशनला या”रिचा बोलली व तिने फोन ठेवला.
सरनाईक,“रिचा शिवीन अशा अवस्थेत असताना तू पोलीस स्टेशनला जाणार?” ते आश्चर्याने रिचाकडे पाहत म्हणाले.

रिचा,“घाबरू नका डॅड त्याला काही होणार नाही पण त्याचाच मान परत मिळवायला मला जावं लागेल.मी आल्यावर सगळं सांगेन.” असं म्हणून ती शिवीनच्या आईकडे वळली.

“आंटी शिवीनला काही नाही होणार तो आपल्याला सोडून कोठेच नाही जाणार तुम्ही रडणं थांबा” तिच्या विश्वासाच खरं तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते.

काया खरं बोलत होती की रिचाचा शिवीनवरचा विश्वास खरा होता? शिवीन वाचेल का? रिचा त्याला या दुहेरी संकटातून बाहेर काढू शकेल? एकीकडे कायाने शिवीनवर लावलेले आरोप दुसरीकडे तो मृत्यूशी झुंजत होता. रिचावर प्रेम करणारा शिवीन ज्याने आपल्या जीवाची बाजी तिच्यासाठी लावली . खरंच त्याने कायाला फसवलं असेल? काया विषयी कोणती माहिती एस एस ने आणली होती. खरंच रिचा म्हणत होती तसं शिवीन निरपराध होता का?
क्रमशः

(सदरचे लेखन कॉपी राईट या कायद्या अंतर्गत येत असून लेखकाच्या नावा शिवाय कोठेही पोस्ट करू नये . साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@मनिम्याऊ
धन्यवाद, पुढचा भाग आज येईल
Happy

छान