विषाणूं विषयी माहिती

Submitted by आर्यन वाळुंज on 24 February, 2020 - 02:06

विषाणू या जीवसृष्टीतील घटकावर थोडी माहिती देऊ इच्छितो. माझ्या पदरचं काही नाही. कॉपी पेस्ट करून माहिती या धाग्यात देत आहे.
अॅडमिनना हे पसंत नसेल तर धागा बंद/उडवू शकता.
विषाणू : विषाणू ज्याला इंग्रजीत 'व्हायरस' असे म्हणतात त्या सजीवांची व्याख्या करणे शास्त्रज्ञांना सुध्दा अवघड होऊन बसले आहे. विषाणू अतिशय सुक्ष्म असतात. त्यांना पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन सुक्ष्मदर्शीची मदत घ्यावी लागते. ते सजीव आणि निर्जीव दोन्ही अवस्थेत असतात. विषाणू हे दुसऱ्या पेशींत वाढतात.
विषाणूंचा शोध मायर या शास्त्रज्ञाने इ.स. १८८८ मध्ये लावला. तंबाखूच्या पानांचा अभ्यास करताना मायरला विषाणूंचा शोध लागला.
विषाणू सुक्ष्मजीवांपेक्षाही सुक्ष्म असतात. ते सेंटीमीटरचा दशलक्षांश भाग किंवा त्याहूनही सुक्ष्म असतात. ते हवेत तरंगतात तेव्हा अतीव सुक्ष्म स्फटिकांच्या स्वरुपात असतात. ते जेव्हा एखाद्या सजीवाच्या संपर्कात येतात तेव्हा त्याच्या शरीरात प्रवेश करुन पेशींमध्ये प्रवेश करतात आणि सजीवांसारखे वागू लागतात.
पुढे चालू.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मुखपृष्ठ » संपादकीयउत्क्रांतियात्रा
विषाणू : सूक्ष्मांपासून अतिसूक्ष्मांकडे
जीवन म्हणजे रेणूंच्या सहकारी संघांची लीला. जेव्हा यांपैकीच काही चुळबुळे घटक बंड पुकारून दुसऱ्या संघांवर हल्ले चढवायला सज्ज होतात, तेव्हा अवतरतात विषाणू.
admin | माधव गाडगीळ - madhav.gadgil@gmail.com | Published on: June 20, 2014 1:36 am
जीवन म्हणजे रेणूंच्या सहकारी संघांची लीला. जेव्हा यांपैकीच काही चुळबुळे घटक बंड पुकारून दुसऱ्या संघांवर हल्ले चढवायला सज्ज होतात, तेव्हा अवतरतात विषाणू.

आपण सारे सजीव अणू-रेणूंचे सहकारी संघ आहोत. अव्यवस्थित नाही तर अतिशय सुसंघटित, कार्यक्षम सहकारी संघ. सारी जीवसृष्टी निसर्गाच्या चाळणीत अगदी जीवोत्पत्तीच्या काळापासून, गेली पावणेचार अब्ज वष्रे सतत पाखडली जाते आहे. या पाखडणीत गळथान जीव-जंतू खडय़ासारखे उचलून बाहेर फेकले जातात; जगण्यात, वाढण्यात, विणीत तरबेज तेवढे सांभाळले जातात. हळूहळू या प्रक्रियेत मोठय़ा मोठय़ा आकाराचे, अधिकाधिक जटिल रचनेचे जीव उद्भवले आहेत. पण उत्क्रान्तीचा प्रवाह केवळ छोटय़ांपासून मोठय़ांकडे, साध्या-सुध्यांपासून अधिक गुंतागुंतीच्या दिशेने वाहत नाही. आकाराने अगदी लहान, एका मिलिमीटरात दोन हजार बसतील इतक्या छोटय़ा, साध्या रचनेच्या बॅक्टेरियांसारख्या जीवांची अधिसत्ता अजूनही अबाधित आहे. आजही बॅक्टेरिया प्रचंड संख्येने जगभर पसरलेले आहेत, एवढेच नाही तर समुद्रतळावरच्या खोल गाळात, जमिनीखालच्या पाषाणांत तर त्यांच्याखेरीज कोणालाच शिरकाव नाही. शिवाय उत्क्रान्तीचा ओघ विरुद्ध दिशेने मोठय़ांपासून छोटय़ांकडेही वाहतो आहे; काळाच्या ओघात बॅक्टेरियांहूनही खूप लहान, रचनेने खूप साधे असे जीव अवतरत राहिले आहेत. हे आहेत आपल्याला सर्दी-खोकल्याने बेजार करणारे, एड्ससारख्या भयानक रोगाने ग्रस्त करणारे विषाणू अथवा व्हायरसेस. हे तर एका मिलिमीटरात पन्नास हजार बसतील इतके अतिसूक्ष्म असतात. पण उत्क्रान्तीची अजब चाल असे सूक्ष्म परजीवी जीवजंतू निर्माण करण्यावर थांबलेली नाही. यातले काही विषाणू आपल्या आनुवंशिक रेणूंचा, डीएनएचा एक कायमचा अंश होऊन बसलेले आहेत, आणि त्यांच्या मदतीनेच आपल्यासारखे सस्तन पशू गर्भपात टाळू शकतात. अशा आत्मीकृत विषाणूंशिवाय आज जगात उंदीर-चिचुंद्रय़ा, वाघ-सिंह, हत्ती-गेंडे, वटवाघळे-देवमासे, माकडे-माणसे दिसलीच नसती!

म्हटले की सारे जीवजंतू अणू-रेणूंचे सहकारी संघ असतात. साहजिकच विचारावेसे वाटते : अतिसूक्ष्म विषाणूही असेच सहकारी संघ आहेत का? होय, ते इतर जीवजंतूंप्रमाणेच अणू-रेणूंचे सहकारी संघ आहेत, पण त्यांच्याइतके परिपूर्ण, स्वयंपूर्ण संघ नाहीत. ते आहेत जीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेवर. जीवांची तीन व्यवच्छेदक लक्षणे आहेत : वाढ, व्यवहार आणि वीण. सारे जीवजंतू स्वत:च्या मनगटाच्या बळावर आकाराने वाढू शकतात, विणीतून आपल्यासारखेच इतर निर्माण करू शकतात. यासाठी त्यांना सतत ऊर्जाव्यवहार, पदार्थव्यवहार चालू ठेवावा लागतो. प्रकाशाची किंवा इतर सेन्द्रिय रेणूंची ऊर्जा, पाणी, पोषक द्रव्ये शोषत राहावी लागतात, त्यांचा चोथा बाहेर फेकून द्यावा लागतो. या उलाढालींत नानाविध तऱ्हेचे रेणू आपापल्या परीने योगदान करतात. हे साधायला नेटक्या माहितीचे पाठबळ हवे. ही माहिती न्यूक्लिइक आम्लांचे दोन प्रकारचे रेणू हाताळतात. दोन-पेडी डीएनए या माहितीचा साठा सांभाळते, तर एक-पेडी आरएनए या माहितीचे संचलन करीत अमिनो आम्लांची माळ नेटकेपणे गुंफत प्रोटिन बनवून देते. ऊर्जाव्यवहार केला जातो साखरेच्या रूपात एटीपीच्या रेणूंच्या मदतीने. या सगळ्यांना हवे तेच रेणू आत-बाहेर सोडणारे पडदे, आवरण बनते स्निग्ध पदार्थाच्या रेणूंनी. स्वतंत्र आयुष्य कंठण्यासाठी जीवांना हे सगळे घटक अत्यावश्यक आहेत. अशी सारी यंत्रणा लहानुग्या विषाणूंजवळ नसते.

मग विषाणू आहेत तरी कोण आणि जगतात तरी कसे? सर्व जीवांच्या पेशीपेशींत आनुवंशिक माहितीचा साठा सांभाळणारे न्यूक्लिइक आम्लांचे डीएनए रेणू रंगसूत्रांच्या लांबलचक माळांत गुंफलेले असतात. पण सगळेच डीएनए माळेतल्या आपापल्या विवक्षित जागी घट्ट थांबत नाही. त्यातले अनेक घटक चंचलवृत्ती असतात, जागा बदलत राहतात. जेव्हा अशा चंचल न्यूक्लिइक आम्लांचे रेणू प्रोटिनांचे चिलखत चढवून मुलुखगिरीला निघतात, तेव्हा अवतरतात विषाणू. त्यांची मोहीम असते दुसऱ्या परिपूर्ण जीवांची तटबंदी भेदून आत शिरकाव करून त्यांच्या यंत्रणेला आपल्या कामास जुंपायचे- त्यांच्यामार्फत आपल्या आणखी आणखी प्रती बनवत राहायच्या. िशकेबरोबर हवेत पसरलेले सर्दीचे विषाणू असेच आपल्या शरीरात शिरतात, स्वत:च्या लक्षावधी प्रती जबरदस्तीने बनवून

स्वत:च्या लक्षावधी प्रती जबरदस्तीने बनवून घेतात आणि आपल्याला िशकायला भाग पाडून नव्या सावजाला शोधायला निघतात.

पण जेव्हा परजीवी बॅक्टेरिया किंवा विषाणू कोणत्याही पशूंवर हल्ला चढवतात तेव्हा ते पशूही काही गप्प बसत नाहीत. त्यांच्या शरीरात या परजीवींशी झुंजायच्या अनेक तऱ्हेच्या उपाययोजना सतत कार्यरत असतात. यातली सगळ्यात महत्त्वाची यंत्रणा आहे पेशींच्या-रेणूच्या पातळीवरची प्रतिरोधक इम्यून सिस्टीम. कोणाही प्राण्याच्या देहात त्याचे स्वत:चे वैशिष्टय़पूर्ण असे अनेक आनुवंशिक रेणू असतात. स्वत:च्या निरोगी पेशी, स्वत:चे रेणू कोणते आणि आपल्या शरीरात घुसलेले विषाणूंसारखे आक्रमक परके जीव, रोगग्रस्त पेशी, परके रेणू कोणते हे ओळखणे आणि त्यांचा बीमोड करणे हे इम्यून सिस्टीमचे काम आहे. पण परके कोण हे ओळखायलाही कष्ट पडतात, वेळ लागतो. विषाणूंची वीण वेगात चालू असते, त्यामुळे ते सारखे नव-नवे रंगरूप घेत सावजांच्या इम्यून सिस्टीमला आपण परके आहोत हे ओळखणे मुश्कील करून टाकतात. असे बदलत राहण्यात खास पटाईत आहेत एड्सचे विषाणू. म्हणूनच अनेकांची इम्यून सिस्टीम त्यांच्यापुढे हात टेकते आणि मग ती दुर्दैवी व्यक्ती बारीकसारीक रोगांना बळी पडते.

पशूंची इम्यून सिस्टीम इम्युनोग्लोबुलिन नावाच्या प्रोटिनांद्वारे व काही विशिष्ट पांढऱ्या रक्तपेशींद्वारे उपद्रवी बॅक्टेरिया-विषाणूंवर हल्ला चढवते. साहजिकच आक्रमकांची प्रतिहल्ल्याची यंत्रणाही सरसावते. या यंत्रणेचे प्रमुख शस्त्र म्हणजे इम्यून सिस्टीमला दबावणारे रेणू बनवणे. विषाणूंचा आणखी एक डावपेच म्हणजे सावजाच्या पेशींना एकात एक मिसळून जायला भाग पाडत आपण फैलावत राहणे. कमाल म्हणजे काही विषाणूंचे डीएनए सावजाच्या स्वत:च्या डीएनएत घुसून त्याचाच एक भाग बनते. याला म्हणतात पशूंनी आत्मीकृत केलेले विषाणूंचे डीएनए. पण उत्क्रान्ती अशी काही विलक्षण संधिसाधू प्रक्रिया आहे की पशूंनी याचाही फायदा करून घेतला आहे. या पशूंच्या जनुकसंचयात समाविष्ट झालेल्या आत्मीकृत विषाणूंच्या शस्त्रांचा वापर करीतच सस्तन पशू पृथ्वीतलावर अवतरू शकले. आईच्या दृष्टीने प्रत्येक गर्भ हा एक परकीय रेणूंचा संचयच असतो. कारण त्या गर्भात जसे आईचे स्वत:चे रेणू असतात तसेच बापाचे परकीय रेणूही. मातांच्या इम्यून सिस्टीमची नसíगक प्रवृत्ती असते या परकीय रेणूंवर हल्ला चढवण्याची, म्हणजेच गर्भधारणा होताक्षणीच गर्भपात करण्याची. पण चिचुन्द्रीपासून हत्तीपर्यंत, पाकोळ्यांपासून देवमाशांपर्यंत सगळ्या सस्तन पशूंत हा गर्भपात टाळला जातो. तो कसा? तर गर्भधारणा होताक्षणीच आईच्या देहातले तोवर निष्क्रिय असलेले आत्मीकृत विषाणू सक्रिय होतात. त्यांच्या मदतीने आईच्या इम्यून यंत्रणेची कारवाई तात्पुरती स्थगित केली जाते. मग पेशी-पेशींना एकमेकांत विलीन करण्याची त्यांची तंत्रे वापरून गर्भाभोवतीचे संरक्षक वेष्टन, वार अथवा प्लॅसेन्टा, बनवले जाते. त्याआड गर्भ सुरक्षित राहतो. हे उत्क्रान्तीच्या ओघात नक्की कसे साधले गेले हे अजून कोडे आहे, पण सस्तनांनी शत्रूचीच शस्त्रे खुबीने वापरत आपली प्रगती साधली आहे हे नक्की.

*लेखक ज्येष्ठ परिसर्ग-अभ्यासक आहेत.

विषाणूंमुळे होणारे आजार :
क्र. आजार विषाणू
1. गोवर (मिझल) गोवर विषाणू
2. इन्फ्लुएंझा (फ्ल्यू) Influenza virus (A,B,C)
3. कावीळ Antaro virus (A,B,C,D,E,G)
4. पोलिओ पोलिओ विषाणू
5. जापनीज मेंदूज्वर Arbo-virus
6. रेबिज लासा व्हायरस
7. डेंग्यू Arbo-virus
8. चिकुनगुन्या Arbo-virus
9. अतिसार Rata virus
10. एड्स H.I.V (Human, Immuno-defi-ciency Virus)
11. देवी Variola Virus
12. कांजण्या Varicella zoaster
13. सर्दी सर्दीचे विषाणू
14. गालफुगी Paramixo virus
15. जर्मन गोवर Toza virus

विषाणूजन्य रोग:

विषाणू हे नाव पॅस्टिअर (Pasteur) या शास्त्रज्ञाने दिले.
विषाणूंचा incubation period पेक्षा खूप जास्त असतो.
विषाणूंना ठराविक पेशीरचना नसल्यामुळे त्यांना अपेशीय (Non Cellular) म्हणतात.
विषाणूंमध्ये फक्त प्राथमिक आवरण असते ज्यामध्ये DNA किंवा RNA असतात.
विषाणूंमध्ये पेशीरस, पेशीभित्तिका नसतात.
सर्वच विषाणू घातक असतात.
विषाणूंचा आकार अतिशय सूक्ष्म असल्याने त्यांना इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ने बघावे लागते.
टिबायोटिक्स विषाणूंच्या रोगांवर उपयोगी ठरत नाहीत.
1) देवी (Small Pox):

हा रोग variola व्हायरस या विषाणूंमुळे होतो.

या रोगामुळे मज्जासंस्थेला प्रादुर्भाव होतो.

या रोगाचा प्रसार खोकल्यापासून उडणाऱ्या दूषित थेंबांमुळे होतो.

लक्षणे: ताप, संसर्गानंतर ३/४ दिवशी अंगावर पुळ्या, पुढील टप्प्यात आंधळेपणा

लस: देवीची लस

1975 पासून भारतात देवीची लास देण्यात येत आहे.

2) कांजण्या (Chicken Pox):

हा रोग Vericella -zoster या विषाणूमुळे होतो.

हा रोग मुख्यतः लहान मुलांचा आहे. मात्र, तो तरुणांना सुद्धा होऊ शकतो.

हा रोग धोकादायक नाही.

लक्षणे: ताप, डोकेदुखी, संसर्गाच्या पहिल्या दिवशीच पुरळ

लस: उपलब्ध नाही. मात्र, एकदा होऊन गेल्यावर आयुष्यभर संरक्षण

3) गोवर (Measles):

हा रोग Myxovirus या विषाणूंमुळे होतो.

हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.

लक्षणे: ताप, कोरडा घसा, तिसऱ्या दिवशी तोंडांत पांढरा ठिपका, चौथ्या दिवशी पुरळ

लस: गोवर विरोधी लस – आयुष्यभर संरक्षण

भारतात गोवर हे बालमृत्यूचे प्रमुख कारण आहे.

4) रुबेला (Rubella किंवा Gernman measles):

हा रोग Myxovirus या विषाणूमुळे होतो.

हा रोग खूप संसर्गजन्य असून मुख्यतः पाच वर्षाखालील मुलांना होतो व या रोगामध्ये दुय्यम संसर्गाची भीती खूप असते.

या रोगांमुळे मानेतील ग्रंथींना प्रादुर्भाव होतो.

लक्षणे: ताप, मानेतील ग्रंथींचा दाह, संसर्गाच्या पहिल्या दिवशी पुरळ,

गर्भारपणाच्या पहिल्या चार महिन्यात आईला झाल्यास मूल मतिमंद तसेच बहिरे होण्याची शक्यता असते.

लस: रुबेला -विरोधी लस. जीवनभर संरक्षण

5) गालफुगी (Mums):

हा रोग Paramyxo Virus या विषाणूंमुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव लाळेच्या ग्रंथींना होतो. लाळेच्या ग्रंथींना सूज आल्याने गाळ फुगल्यासारखा दिसतो.

लक्षणे: ताप, लाळेच्या ग्रंथींना सूज, अन्न-पाणी गिळण्यास त्रास.

हा मुख्यतः लहान मुलांना होतो, मात्र तरुण माणसास झाल्यास तो वांझ होऊ शकतो.

लस: गालफुगीविरोधी लस

6) पोलिओ (Poliomycetis):

हा रोग Entero virus या विषाणूमुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेला होतो.

या रोगामुळे हात – पाय लुळें होऊ शकतात व असा प्रादुर्भाव मुख्यतः लहानपणीच होत असतो.

लस: पोलिओच्या विरोधी दोन लसींचा वापर केला जातो.

१) Salf V – शरीरात इंजेकशनद्वारे दिली जाते.

२) सेबीने – तोंडाद्वारे दिली जाते.

WHO ने भारतासाठी Sebine या लसीची शिफारस केली आहे.

November 1995 पासून भारताने प्लस पोलिओ इम्युनायझेशन कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत पाच वर्षाखालील मुलांना OPV (Oral Polio Vaccine) दिले जाते.

7) इन्फ्लुएन्झा (Influenza):

हा रोग Orthomyxo Virus या विषाणूंमुळे होतो.

हा रोग हवेतून पसरणारा आहे.

या रोगाचा प्रादुर्भाव श्वसनसंस्था, मज्जा संस्था आणि यकृत आतडे संस्था यावर होतो

लस: फ्लूविरोधी लस

8) रॅबीज (Rabbis/Hydrophobia):

हा रोग Rhabdo Virus या विषाणूमुळे होतो. हा विषाणू ओल्या जखमेतून प्रवेश करतो.

या रोगाचा प्रादुर्भाव पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे होतो.

या रोगाचा प्रादुर्भाव मध्यवर्ती मज्जासंस्थेला होतो.

लक्षणे: ताप, दातखिळी, डिहायड्रेशन इत्यादी. लक्षणे दिसायला सुरु झाल्यापासून पाच दिवसांनी मनुष्य मरतो.

लस: रॅबीज विरोधी लस. मात्र त्यामुळे पॅरालिसिस सारखा सहदुष्परिणाम होऊ शकतो.

9) हेपॅटिटिस (Hepatitis):

हेपॅटिटिस हि यकृताची रोगग्रस्त स्थिती आहे.

लक्षणे: हा रोग चार प्रकारच्या विषाणूंमुळे होतो.

1) हेपॅटिटिस A विषाणू (HAV)

2) हेपॅटिटिस B विषाणू (HAB)

3) नॉन A विषाणू आणि

4) नॉन B विषाणू

10) एड्स (AIDS):

एड्स म्हणजे Acquired Immuno Deficiency Syndrome होय.
प्रतिकारशक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोगलाक्षणांच्या एकत्रित समूह म्हणजेच ‘एड्स’ होय.
एड्स हा H.I.V. विषाणूमुळे होणारा आजार आहे. (Human Immuno dfficiency Virus)
हा मानवाची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू होय.
एड्सच्या H.I.V. विषणूचा शोध
एड्सच्या H.I.V. विषणूचा शोध 1983 साली डॉ. ल्यूक मोण्टिग्रेयर (फ्रेंच) व डॉ. रॉबर्ट गॅलो (अमेरिकन) या शास्त्रज्ञांनी लावला.
जगामध्ये 1981 साली अमेरिकेत एड्सचा पहिला रुग्ण आढळला.
भारतामध्ये 1986 साली मद्रासमध्ये पहिला H.I.V. पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.
भारतामध्ये मे 1986 साली मुंबई शहरात पहिला एड्सचा रुग्ण आढळला.
जगात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – भारत देशात.
भारतात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – महाराष्ट्र राज्यात.
महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुंग – सांगली जिल्ह्यात.
महाराष्ट्रात शहरांपैकी सर्वात जास्त H.I.V. ग्रस्त रुग्ण – मुंबई शहरात.
जागतिक एड्स दिन – 1 डिसेंबर
NARI (नारी) National AIDS Research Institute (भोसरी) पुणे.
NACO (नौको) National AIDS Control Organization दिल्ली.
MSACS – Maharashtra state AIDS Control Society (वडाळा) मुंबई.
HIV हा एक वैशिष्टयपूर्ण विषाणू असून त्याच्या जनुकीय घटक DNA च्या ऐवजी RNA असतो.
प्रत्येक विषाणूचा कण हा १०० नॅनोमीटर व्यासाचा असतो.
हा विषाणू पांढऱ्या रक्तपेशींपैकी T-4 Lymphocytes प्रकारच्या रक्तपेशींवर हल्ला करत असतात.
त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्याने इतर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो.
रोगाचे प्रमुख मार्ग:

H.I.V. बाधित व्यक्तीशी असुरक्षित लैंगिक संबंध.
H.I.V. बाधित व्यक्तीचे रक्त किंवा रक्तघटक निरोगी व्यक्तीस दिल्यास. (रक्त संक्रमण).
H.I.V. बाधित रुग्णास वापरलेल्या सुया/सिरिंजेस निर्जतुक न करता परत वापरल्यास.
H.I.V. बाधित गरोदर मातेपासून तिच्या होणार्‍या बाळाला (नाळेमार्फत) (H.I.V. बाधित व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने, चुंबन घेतल्याने, एकत्र बसण्याने, एकत्र जेवल्याने, एकत्र राहण्याने एड्स या रोगाचा प्रसार होत नाही).
लक्षणे:

सर्वसामान्य लक्षणे :

अकारण वजनात 10% पेक्षा जास्त घट होणे.
सतत बारीक ताप, रात्रीचा घाम येणे. (1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी)
सतत जुलाब होणे व कोणत्याही औषधाने ते बरे न होणे.
तोंडात, अन्ननलिकेत चट्टे उठणे.
3 महिन्यापेक्षा जास्त काळ राहणारी ‘लसिका ग्रंथाची’ (लिम्फ ग्लॅंड) सूज, गंभीर
इतर लक्षणे :

नुमोनिया
मेंदूज्वर
हरपीस
विविध प्रकारचे कर्करोग
क्षयरोग
आधिशयन काळ – 5 ते 8 वर्षे/सर्वसाधारण: (कधी-कधी 8 ते 10 वर्षे)

एड्स निदानाच्या चाचण्या :

1) ELISA – Enzyme Linked Immuno Sorbent Assay

2) Western Blot Technique

3) HIV Dipstick Test

4) EIA Test: Enzymo Immuno Assay : वरील तीन चाचण्यांपैकी कोणत्याही चाचणीचा निष्कर्ष धन निघाला तर HIV चे अस्तित्व शोधण्यासाठी हि प्रत्यक्ष चाचणी केली जाते.

उपचार:

एड्सच्या विरुद्ध केमोथेरपीचाच वापर केला जातो. यामध्ये ATZ – Azido Thymidine आणि DDC Dideoxycytidine वापरले जातात.

लस:

एड्स प्रतिबंधाकत्मक लस अध्याप उपलब्ध नाही.

विषाणु का अंग्रेज़ी शब्द वाइरस का शाब्दिक अर्थ विष होता है। सर्वप्रथम सन् 1796 में एडवर्ड जेनर ने पता लगाया कि चेचक, विषाणु के कारण होता है। उन्होंने चेचक के टीके का आविष्कार भी किया। इसके बाद सन् 1886 में एडोल्फ मेयर ने बताया कि तम्बाकू में मोजेक रोग एक विशेष प्रकार के वाइरस के द्वारा होता है। रूसी वनस्पति शास्त्री इवानोवस्की ने भी 1892 में तम्बाकू में होने वाले मोजेक रोग का अध्ययन करते समय विषाणु के अस्तित्व का पता लगाया। बेजेर्निक और बोर ने भी तम्बाकू के पत्ते पर इसका प्रभाव देखा और उसका नाम टोबेको मोजेक रखा। मोजेक शब्द रखने का कारण इनका मोजेक के समान तम्बाकू के पत्ते पर चिह्न पाया जाना था। इस चिह्न को देखकर इस विशेष विषाणु का नाम उन्होंने टोबेको मोजेक वाइरस रखा।[2]
विषाणु लाभप्रद एवं हानिकारक दोनों प्रकार के होते हैं। जीवाणुभोजी विषाणु एक लाभप्रद विषाणु है, यह हैजा, पेचिश, टायफायड आदि रोग उत्पन्न करने वाले जीवाणुओं को नष्ट कर मानव की रोगों से रक्षा करता है। कुछ विषाणु पौधे या जन्तुओं में रोग उत्पन्न करते हैं एवं हानिप्रद होते हैं। एचआईवी, इन्फ्लूएन्जा वाइरस, पोलियो वाइरस रोग उत्पन्न करने वाले प्रमुख विषाणु हैं। सम्पर्क द्वारा, वायु द्वारा, भोजन एवं जल द्वारा तथा कीटों द्वारा विषाणुओं का संचरण होता है परन्तु विशिष्ट प्रकार के विषाणु विशिष्ट विधियों द्वारा संचरण करते हैं।

शेतीमध्ये विषाणूंचा उपयोग :- विषाणूंमध्ये प्रामुख्याने एच .एन .पी .व्हि . व एस .एल .पी .व्ही .यांचा समावेश होतो हे विषाणू अळीच्या पोटात जावून पेशीवर हल्ला करून किडीला नष्ट करतात. हरभरा पिकावरील घाटे अळी ही अतिशय खादाड अळी जी हरभरा पिकाचे अतोनात नुकसान करते व रासायनिक औषधांनी नियंत्रण होत नाही. तिचा या विषांणुपासून बनवलेल्या औषधानं चांगला बंदोबस्त होतो.

छान माहिती!

विषानु साठी एक गाने समर्पित :

विषानु है विषानुओंको ना घर चाइये
ना नजर चाइये
पेशियोंभरा इक शरीर चाइये, शरीर चाइये.

क्या है कोरोना वायरस?
कोरोना वायरस (सीओवी) का संबंध वायरस के ऐसे परिवार से है, जिसके संक्रमण से जुकाम से लेकर सांस लेने में तकलीफ जैसी समस्या हो सकती है. इस वायरस को पहले कभी नहीं देखा गया है. इस वायरस का संक्रमण दिसंबर में चीन के वुहान में शुरू हुआ था. डब्लूएचओ के मुताबिक, बुखार, खांसी, सांस लेने में तकलीफ इसके लक्षण हैं. अब तक इस वायरस को फैलने से रोकने वाला कोई टीका नहीं बना है.
क्या हैं इस बीमारी के लक्षण?
इसके संक्रमण के फलस्वरूप बुखार, जुकाम, सांस लेने में तकलीफ, नाक बहना और गले में खराश जैसी समस्या उत्पन्न होती हैं. यह वायरस एक व्यक्ति से दूसरे व्यक्ति में फैलता है. इसलिए इसे लेकर बहुत सावधानी बरती जा रही है. यह वायरस दिसंबर में सबसे पहले चीन में पकड़ में आया था. इसके दूसरे देशों में पहुंच जाने की आशंका जताई जा रही है.
क्या हैं इससे बचाव के उपाय?
स्‍वास्‍थ्‍य मंत्रालय ने कोरोना वायरस से बचने के लिए दिशानिर्देश जारी किए हैं. इनके मुताबिक, हाथों को साबुन से धोना चाहिए. अल्‍कोहल आधारित हैंड रब का इस्‍तेमाल भी किया जा सकता है. खांसते और छीकते समय नाक और मुंह रूमाल या टिश्‍यू पेपर से ढककर रखें. जिन व्‍यक्तियों में कोल्‍ड और फ्लू के लक्षण हों उनसे दूरी बनाकर रखें. अंडे और मांस के सेवन से बचें. जंगली जानवरों के संपर्क में आने से बचें.