मराठी भाषा दिवस २०२० - अक्षरचित्रे

Submitted by मभा दिन संयोजक on 17 February, 2020 - 13:11

अ? ...अननसाचा!
आ?... आईचा!
इ? .. इमारतीचा!
अर्रर्र...चुकलं चुकलं चुकलं.
अ माशाचा
आ सिंहाचा
आणि इ कोंबडीचा!
आँ ? आता हे काय नवीनच?
हीच तर मजा आहे अक्षरचित्रांची!
अक्षरचित्रं म्हणजे अक्षरांपासून बनलेली चित्रं. अ या अक्षरापासून मासा तयार करता येतो आणि 'आ'.पासून चक्क सिंह!

collage.jpg

आहे की नाही गंमत?

आता खाली दिलेली चित्रंच पहा. मा, य, बो या प्रत्येक अक्षरापासून तयार केलेलं एकेक चित्र आहे त्यात.

maa.jpg

ya.jpg

bo.jpg

काय म्हणता? चित्रात अक्षरं सापडत नाहीयेत? शोधा, म्हणजे नक्की सापडतील. पण आधी आई किंवा बाबाला सांगून या चित्रांचे प्रिंटआऊट्स घ्या. चित्रं छानपैकी रंगवा आणि चित्रातलं अक्षर सापडलं की ते अक्षर ठळक करा.

अरे हो! मा, य, बो तर आले, मग ' ली ' कुठे गे'ली' ?? Wink

'ली' आम्ही खास तुमच्यासाठी राखून ठेव'ली' आहे.
ली या अक्षरापासून तुम्हीच डोकं लढवून एक मस्त चित्र तयार करा आणि आम्हाला पाठवा. पाठवाल ना ? आम्ही वाट पाहतोय!

या उपक्रमात भाग घेण्यासाठी काही सूचना
१) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
२) उपक्रमात आपल्या पालकांच्या आयडीनेच भाग घ्यायचा आहे.
४) वयोगट - ३ ते १२ वर्षं
५) वरीलपैकी एक किंवा कितीही चित्रांची प्रिंट काढून रंगवणं अपेक्षित आहे. आपल्या पाल्यानं रंगवलेलं चित्र/ चित्रे स्कॅन करा किंवा त्याचं प्रकाशचित्र काढा व इथे अपलोड करा.
६) चित्रं आजपासून ते २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) कधीही पाठवता येतील.
७) चित्रं पाठवण्यासाठी ' मराठी भाषा दिवस २०२०' या ग्रुपचं सदस्यत्व घेणं आवश्यक आहे. या ग्रुपचं सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मराठी भाषा दिवस २०२०' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
९) याच ग्रुपामध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा.
१०) नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा -
अक्षरचित्रे - पाल्याचे नाव आणि वय
११) ’विषय’ या चौकटीमध्ये ड्रॉपडाऊन मेन्यूमधून मायबोली, उपक्रम हा पर्याय निवडा.
१२) शब्दखुणा या चौकटीमध्ये ’मराठी भाषा दिवस २०२०’ हे शब्द लिहा.
१३) आता या नवीन धाग्यावर आपल्या मायबोली आयडीने मजकुरात प्रकाशचित्र टाका. यासाठी इमेज फाईलचे आकारमान २ Mb पेक्षा जास्त असणार नाही याची काळजी घ्या.
(एकाच धाग्यात सर्व चित्रे टाकलीत तरी चालेल.)
मजकुराच्या चौकटीखाली 'मजकुरात image किंवा link द्या’, यातील image या शब्दावर टिचकी मारा. एक नवीन विंडो उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी upload हा पर्याय निवडा. मग 'browse' या पर्यायावर टिचकी मारून तुमच्या संगणकावरून/ फोनवरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की खालच्या चौकटीत तशी पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वांत वर दिलेल्या पर्यायांपैकी 'insert file' हा पर्याय वापरून तुमच्या मजकुरात समाविष्ट करा.
१४ ) नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर ’ग्रूप’ असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. ’सार्वजनिक ( public- accessible to all site users)’ हा पर्याय निवडा म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
१७) Save चे बटण दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थांबा. तुमचा लेख प्रकाशित होऊन सगळ्यांना दिसू लागेल.
१८) धाग्यात नवीन चित्र टाकायचे असेल किंवा इतर काही बदल करायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.

उपक्रम सुरु झाले आहेत. तुम्ही प्रवेशिका पाठवू शकता. त्या त्या धाग्यावर जाऊन माहीती पहावी.

'मराठी भाषा दिवस २०२०' हा '२७ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी २०२०' हया काळात साजरा केला जाईल ह्याची सर्व मायबोलीकरांनी नोंद घ्यावी.

२९ फेब्रुवारी २०२० च्या रात्रौ १२ वाजेपर्यंत (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) प्रवेशिका स्विकारल्या जातील.

सर्वजण ह्या उपक्रमांना भरभरुन प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे. __/\__

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अधिकाधिक मायबोलीकरांना उपक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळावी यासाठी सर्व उपक्रमांमध्ये प्रवेशिका पाठवण्याची मुदत २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत वाढवत आहोत याची कृपया नोंद घ्यावी. Happy