मराठी भाषा दिवस २०२० - डॉ. अनिल अवचटांचे मला आवडलेले पुस्तक

Submitted by मभा दिन संयोजक on 17 February, 2020 - 12:57

मराठी साहित्यात डॉ. अनिल अवचट यांच्या लेखनाला एक वेगळं आणि महत्त्वाचं स्थान आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी स्वत:ला विविध सामाजिक कार्यांमध्ये झोकून दिलं आणि हे कार्य करत असताना आलेले अनुभव ते सातत्याने शब्दबद्ध करत राहिले. प्रांजळपणा, तळमळ, सतत नवनवीन लेखनविषयांचा शोध घेण्याचा आणि त्या विषयांच्या मुळाशी जाण्याचा त्यांचा उत्साह, क्लिष्ट विषयावर लिहितानाही त्यात आणलेली रोचकता अशी त्यांच्या लेखनाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या नावांच्या यादीकडे नजर टाकली तरी त्यातलं वैविध्य डोळ्यात भरेल. फोटोग्राफीपासून स्वयंपाकापर्यंत आणि ओरिगामीपासून बासरीवादनापर्यंत असंख्य छंद जोपासणार्‍या या अवलिया लेखकाने अलीकडेच वयाची पंच्याहत्तरी पार केली. या निमित्ताने त्यांना आपल्याकडून एक छोटीशी मानवंदना म्हणून आपण ' डॉ. अनिल अवचटांचे मला आवडलेले पुस्तक ' हा उपक्रम मराठी भाषा दिवस २०२० मध्ये समाविष्ट केला आहे.

Avachat 2.jpg

या उपक्रमात भाग घेण्यासाठी तुम्ही तुम्हाला आवडलेल्या डॉ. अवचटांच्या कुठल्याही पुस्तकावर लेख लिहू शकता. शब्दमर्यादेची अट नाही.

या उपक्रमांतर्गत लेख लिहिण्यासाठी धागा कसा उघडावा याबद्दल काही सूचना :

१. या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मराठी भाषा दिवस २०२० ' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर "सामील व्हा" या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मराठी भाषा दिवस २०२०' या ग्रूपचे सभासद झाला आहात.

२. याच ग्रूपमध्ये उजवीकडे "नवीन लेखनाचा धागा" या शब्दांवर टिचकी मारा.

३. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शीर्षक या बॉक्समध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :
' डॉ. अनिल अवचटांचे मला आवडलेले पुस्तक -- पुस्तकाचे नाव '

४. विषय या बॉक्समध्ये ड्रॉपडाऊन मेन्यूमधून 'मायबोली - उपक्रम' हा पर्याय निवडा.

६. शब्दखुणा या बॉक्समध्ये 'मराठी भाषा दिवस २०२०' हे शब्द लिहा.

७. मजकुरात आपला लेख लिहा / कॉपी-पेस्ट करा.

८. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या बटणाच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा.
सार्वजनिक ( public - accessible to all site users) या शब्दाच्या आधी असलेला बॉक्स क्लिक करा. म्हणजे तुमचा लेख सर्वांना दिसू शकेल.

९. Save चे बटण दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थांबा. तुमचा लेख प्रकाशित होऊन सगळ्यांना
दिसू लागेल.

१०. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल / बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय
वापरून मजकुरात बदल करू शकता.

उपक्रम सुरु झाले आहेत. तुम्ही प्रवेशिका पाठवू शकता. त्या त्या धाग्यावर जाऊन माहीती पहावी.

'मराठी भाषा दिवस २०२०' हा '२७ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी २०२०' हया काळात साजरा केला जाईल ह्याची सर्व मायबोलीकरांनी नोंद घ्यावी.

२९ फेब्रुवारी २०२० च्या रात्रौ १२ वाजेपर्यंत (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) प्रवेशिका स्विकारल्या जातील.

सर्वजण ह्या उपक्रमांना भरभरुन प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे. __/\__

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अधिकाधिक मायबोलीकरांना उपक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळावी यासाठी सर्व उपक्रमांमध्ये प्रवेशिका पाठवण्याची मुदत २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत वाढवत आहोत याची कृपया नोंद घ्यावी. Happy