मैत्री उपक्रम माहिती आणि आवाहन - २०२०

Submitted by हर्पेन on 17 February, 2020 - 07:06

मैत्री स्वतःशी, मैत्री सर्वांशी.

'मैत्री' ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था मेळघाटातील अगदी दूरच्या गावांमधे आरोग्य , शिक्षण व शेती या करता काम करते. स्वयंसेवी माध्यमातून गेली अनेक वर्षे सरकारी मदत न घेता आपले काम सुरू आहे. प्रत्येक माणसाला समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि उर्मी असते यावर आमचा दृढ विश्वास आहे. म्हणूनच त्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे आणि संधी उपलब्ध करून देणे आम्ही आनंदाने करतो.

शक्यतो मैत्रीच्या मेळघाटातील उपक्रमांमधे लोकांनी प्रत्यक्ष सहभाग घ्यावा ह्यावर आमचा भर आणि कटाक्ष असतो. त्या करता पुण्या-मुंबईतून सामील होणार्‍या स्वयंसेवकाला (जाणे येणे धरून) साधारणपणे एक आठवडा बाजूला काढावा लागतो. अशा प्रकारे आपण मेळघाटात जावून एखाद्या कार्यक्रमामधे स्वतः सहभागी होऊ शकता. तुम्ही तज्ज्ञ व्यक्ती म्हणून शिबिरामध्ये तुमचे ज्ञान व कौशल्य शिकवू शकता.

तुम्हाला मेळघाटात जाणे शक्य नसेल तर तिथल्या उपक्रमांची पूर्वतयारी करण्यामध्ये पुण्यात मदत करू शकता. उदा. शैक्षणिक साधने बनवणे, तान्ह्या बाळांसाठी कपडे तयार वा गोळा करणे, ते पिशव्यांमध्ये भरणे, औषधे जमा करणे, धान्य/ शिधा गोळा करणे व पाठवण्याची व्यवस्था करणे इ.

गेल्या अनेक वर्षापासून 'मैत्री' आपत्कालीन व्यवस्थापन संदर्भाने देखिल सातत्यपुर्ण कामगिरी करते आहे. त्याकरता त्या त्या वेळी प्रत्यक्ष
गरजेच्या ठिकाणी जाण्याबरोबरच तिथे न जाता करण्याजोगी अनेक कामे असतात त्यातही आपण सहभागी होऊ शकता.

पुण्यामध्ये ग. रा. पालकर शाळेत आपण इंग्रजी, गणित व विज्ञान विषय शिकवण्यासाठी मदत करतो, त्यात तुम्ही सहभागी होऊ शकता.

तुमच्या सोसायटीमध्ये 'रद्दी संकलन' सुरु करू शकता.

'मैत्री' साठी निधी जमा करण्याचे काही कार्यक्रम आम्ही करतो, त्यात तुम्ही मदत करू शकता.

विविध कंपन्यामध्ये CSR ला पाठविण्यासाठी मेळघाट विषयीचे प्रस्ताव लिहिणे व त्याचा पाठपुरावा करणे या कामी आम्हाला मदत करू शकता. पुण्यातील ऑफिसमध्ये कार्यालयीन कामात काही वेळेला मदत लागते तेव्हा तुम्ही येऊ शकता.

'मैत्री' बाबत इतर लोकांना सांगून स्वयंसेवक व देणगी मिळवून देण्यासाठी आम्हाला मदत करू शकता.

अशा खूप काही कल्पना आणि मार्ग आमच्यापाशी आहेत आणि आम्हाला खात्री आहे की तुमच्याकडे यापेक्षा कितीतरी अधिक कल्पना असतील. चला तर मग, आपण एकत्र मिळून चांगले काहीतरी घडवूया.

Maitri is registered under the Bombay Public Trusts Act, 1950 on 31st July 1999 (E-2898 / Pune). PAN Number: AAATZ0344C, FCRA Registration Number: 083930473.

Office Address
Flat No. 9, Mahadev Smruti,
Near Bal Shikshan Mandir,
Mayur Colony,
Kothrud, Pune 411038

Telephone Numbers
Office: 9309930010

Website : http://www.maitripune.net
E-mail: maitri1997@gmail.com

मैत्रीच्या मेळघाट व इतर कामांसाठी तुम्ही यथाशक्ती आर्थिक मदत करू शकता.
ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149

ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB

ह्या धाग्याद्वारे मैत्रीच्या ह्या वर्षातील (२०२०) उपक्रमांविषयक माहिती आणि आवाहन एकाच ठिकाणी संकलित करण्याचा मानस आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनापासून धन्यवाद.
ऑफिस मधे विचारून तुम्हाला लवकरच कळवतो.

ही देणगी एखाद्या विशिष्ट कामाकरता वापरली जावी असे मनात असेल तर जरूर कळवा. उदा. शेती, शिक्षण, वैद्यकीय किंवा करोना पश्चात लघूव्यवसाय परत सुरु करण्यास मदत म्हणून वगैरे.

मैत्रीला पावती पाठवता यावी म्हणून तुमचे नाव पत्ता ई. तपशील पुरवाल का ?
फोन नंबर - 9309930010
E-mail पत्ता: maitri1997@gmail.com

आधीच्या पोस्ट मधे नमूद केल्यानुसार पुण्यातील ताडीवाला रस्ता परिसरातील अजून पाच लघु व्यावसायिकांना आपापले व्यवसाय पुन्हा सुरू करता यावेत ह्याकरता म्हणून बीज भांडवल म्हणून काही आर्थिक मदत देऊ करण्यात आली.

ही मदत देखील 'बिनव्याजी कर्ज' स्वरुपात असून कामाच्या गरजेनुसार प्रत्येकी पाच पासून ते पंधरा हजार पर्यंतची रक्कम देऊ करण्यात आली.

पाच जणांना मिळून देऊ केलेली एकूण रक्कम ८५०००/- इतकी आहे.

ज्यांना ही मदत देऊ करण्यात आली त्यांच्या व्यवसायाचे स्वरुप,
बेकरी
चहाची हातगाडी
अंडे विक्री केंद्र
ईलेक्ट्रिशियन म्हणून काम आणि ईलेक्ट्रिक सामानाचे दुकान,
फोटो स्टुडियो
अशा प्रकारचे असून ह्या व्यावसायिकांची वार्षीक उलाढाल अंदाजे एक लाख वीस हजार ते साडेतीन लाख रुपये इतकी आहे.

हे ही सगळेजण जास्तीत जास्त वर्षभरात ही रक्कम परत करतील आणि त्यानंतरही ही रक्कम अशाच प्रकारे अजून इतर व्यावसायिकांना दिली जाईल.

ह्या लोकांपर्यंत पोचण्याकरता तसेच योग्य व्यक्तींची निवड करण्याकरता श्री. आनंद जाधव यांची मोठीच मदत झाली.

माझ्याकडे एक चांगला डेस्कटॉप आहे...एल सीडी नव्हे... तो मोठा असतो तो.... फक्त मॉनिटर!
देऊ शकते का?
>>>

मी विचारून सांगतो.
पण डेस्कटॉपचा फक्त मॉनिटर पाहिजे असण्याची शक्यता कमीच वाटते.

ताडीवाला रस्ता परिसरातील अजूनही अशा काही लोकांना अशी मदत हवी आहे परंतु त्याकरता सध्या जमवलेले पैसे अपुरे पडत आहेत.
तरी आपल्याला लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरता अशी आर्थिक मदत करायची असेल तर तुम्ही यथाशक्ती मदत करू शकता.

मदतीची गरज आहे.

हवामान बदलाचे फटके आपल्या सगळ्यानाचं पडत आहेत. सोलापूर जिल्ह्याचे नाव पुरासंदर्भातल्या बातम्यांमध्ये क्वचितच ऐकायला मिळाले असेल. पण ह्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सोलापूर पूरग्रस्त झालेला दिसून येत आहे.

अवकाळी पावसामुळे आणि उजनी धरणातून सोडाव्या लागलेल्या विसर्गामुळे पंढरपूर येथील कुष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये पाणी शिरले आहे आणि त्यामुळे ते सध्या बेघर झाले आहेत.

पुरामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती आपल्याला फोटो बघितले असता लक्षात येईलच. नगरपालिकेने बेघर झालेल्या कुष्ठरोग्यांची तात्पुरती सोय जुन्या बस स्थानकात केली आहे.

सध्या त्यातल्या अनेक जणांचे उत्पन्नाचे स्रोत / मंदिर बंद असल्याने भिक्षा मागून जगण्याची सोयही सध्या बंद झाली आहे. तरी त्यांना मदत म्हणून कुटुंबाप्रती किमान रुपये पाचशे किमतीचे अन्नधान्य / किराणामाल देण्याचे योजत आहोत. ह्याकरता आपले मित्र प्रमोद झिंजाडे ह्यांची मदत होणार आहे.

तरी कृपया तुम्हाला शक्य असेल तेवढा निधी द्यावा असं या कुटूंबांच्या वतीने आवाहन करत आहोत.
१.
WhatsApp Image 2020-10-20 at 9.17.55 PM (1).jpeg

२.
WhatsApp Image 2020-10-20 at 9.17.57 PM (1).jpeg

३.
WhatsApp Image 2020-10-20 at 9.17.56 PM.jpeg

४.
WhatsApp Image 2020-10-20 at 9.17.55 PM.jpeg

आपण पाठवलेल्या मदतीची पोच मैत्रीला देता यावी म्हणून तुमचे नाव पत्ता ई. तपशील पुरवा. कृपया. धन्यवाद.
मैत्रीचा फोन नंबर - 9309930010 आणि /E-mail पत्ता: maitri1997@gmail.com

चला परत शाळेला ..

नुकताच येऊन गेलेला विजयादशमी हा सण म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस.
पण आपल्या आसपास अ से विद्यार्थी आहेत ज्यांना शाळेत जाण्यासाठी रोजच सीमोल्लंघन करावं लागतं तेही पायी.

भोर तालुक्यातील रोहिडेश्वर माध्यमिक विद्यालय, नाटंबी ह्या शाळेतील ५१ मुला-मुलींना सायकल हवी आहे. आज ही मुलं रोज साधारण तीन ते चार किलोमीटर चालून शाळेत जातात. त्यांना सायकल मिळाली तर सोय होईलच पण ह्या कोरोना काळानंतर “उत्साहानं परत शाळेत जा” असं म्हणण्यानं त्यांचा उत्साह वाढेल. कोरोनानंतर पुन्हा सगळं सुरळीत करणं महत्वाचं. आणि, सगळं सुरळीत करायला मित्रच उपयोगी ठरतात.

“मैत्री” चं काम मोठ्या देणग्यांवर अवलंबून नाही, किंबहुना “थोड्या लोकांकडून खूप काही घेण्यापेक्षा, खूप काही लोकांकडून थोडं योगदान घ्यावं” अशी आमची धारणा आहे. ह्याच भावनेतून गेल्या २३ वर्षात मेळघाटसारख्या दुर्गम भागातील कुपोषण हटवण्याचं मोठं काम अक्षरश: शेकडो मित्रांनी करून दाखवलं. मग ते तिथल्या गावात राहून प्रत्यक्ष काम करण्यापासून इथे आपल्या घरातील रद्दी देऊन आर्थिक मदत करण्यापर्यंत.

आत्ताही तसंच करायचं आहे.

तुमच्याकडे एखादी जुनी सायकल असेल तरी चालेल. ती आम्ही दुरूस्त करू. सुधारू. साफसूफ करू. नव्यासारखी करून त्यांना देऊ. किंवा जमेल तशा नव्या देऊ.. आपल्याला ५१ सायकलींची गरज आहे. तुमची मदत झाली तर त्या जमवणं काहीच अवघड नाही.

तुमच्याकडे अशी सायकल असेल तर : ९३०९९ ३००१० वर फक्त व्हॅाट्सअप किंवा एसएमएस करा. त्यात तुमचा पत्ता द्या. आम्ही सायकल घेऊन जाण्याची व्यवस्था करू.

ह्या सायकली दुरूस्त करणे, नव्यासारख्या करणे ह्यासाठीही साधारण सरासरी १००० रूपयांच्या आसपास खर्च येईल. नव्या घेण्यासाठीही तुम्ही आर्थिक मदत करू शकता.

आपण पाठवलेल्या मदतीची पोच मैत्रीला देता यावी म्हणून तुमचे नाव पत्ता ई. तपशील पुरवा. कृपया. धन्यवाद.
मैत्रीचा फोन नंबर - 9309930010 आणि /E-mail पत्ता: maitri1997@gmail.com

Pages