पानिपत जिंकतो तर...?

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 16 February, 2020 - 17:30

पानिपत युद्धाबद्दल अधिक काय लिहावे?? महाराष्ट्राची एक भलभळती जखम.
अनेकांनी विश्वास पाटील ह्यांची पानिपत कादंबरी वाचलीच असावी. मध्यंतरी पानिपत सिनेमाही येऊन गेला. त्यानंतर नेट आणी इतर ठिकाणीवर अनेक लेख लिहिले गेले. Youtube वर अनेकानी विडिओ बनवल्या. अनेक विडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लांबलचक चर्चा झाली. युद्ध का झाले? कसे झाले? ह्यावर बराच काथ्याकूट आहे. पण हे युद्ध भारताचा इतिहास बदलणारे ठरले हे नक्की. पण पानिपत युद्ध मराठे जिंकते तर आजचा भारत कसा असता?? ह्यावर फार कमी लिखाण सापडले.

हिंदी भाषिकांच्या लेखात, चर्चेत आणी व्हिडिओत अनेक ठिकाणी ह्यावर लेखन केलंय. मराठीत ह्यावर खूप कमी लेखन मिळालं. काहीनी लिहिलंय की मुघल साम्राज्य संपल्यानंतर अब्दालीमुळे आज भारतात मुस्लिम टिकून आहेत. अब्दाली काही लोकांच्या दृष्टीने त्यांचा हिरो आहे.
मी इंटरनेटवर जितकी माहिती मिळवली त्यानूसार शावोन चौधरी ह्यांनी एक सुरेख लेख लिहिलाय त्यात त्यांनी सांगितलंय की जर मराठे पानिपतात जिंकले असते तर अब्दाली हरून पळत असता त्याची गाठ पंजाबात शिखांशी पडती आणी अब्दाली लाहोर युद्धात मारला जाता.
पानिपत विजया नंतर मराठयांनी दिल्लीत जल्लोश केला असता. त्यानंतर शहा आलम द्वितीय ह्याला दिल्लीच्या गादीवर बसवून शिंदेंना त्यांच्या रक्षणाची जबाबदारी दिली जाती.
नंतर मराठयांनी निजामशाही कायमची संपवली असती. आणी त्यांना निजाम जेवढा गरीब असल्याचं ढोंग करतोय त्यापेक्षा तो गडगंज श्रीमंत असलेला सापडला असता. शिखांचं साम्राज्य लवकर वाढतं आणी कदाचित मराठे आणी शीख दिल्लीसाठी एकमेकांशी भांडले असते. मद्रास आणी दक्षिण संपूर्णपणे मराठ्यांच्या ताब्यात असती. आणी कदाचीत टिपू सुलतानचा उदयच न होता. मराठे सरदार खुप ताकदवान होऊन एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यन्त संपूर्ण भारतावर मराठी सरदारांच वर्चस्व असतं. काहींनी लिहिलंय की भारत युरोपीय देशांसारखा छोट्या छोट्या तुकड्यात विभागला गेलेला पहायला मिळाला असता. मराठे जिथपर्यंत गेले तिथपर्यंतच आजचा भारत आहे असेही काही ठिकाणी वाचले. बंगालात मराठे जिथपर्यंत गेले तिथपर्यंतच आज बंगालची सीमा आहे.
मायबोलीच्या एका धाग्यात सांगितलंय की मराठ्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश "साफ" न करता पंजाबात जाणे. तसेच अब्दाली ने दिल्लीत शहावलीउल्ला ह्याच्या सांगण्यानुसार दिल्लीत वहाबी विचारधारेचं राज्य स्थापन केले असते तर?? पुन्हा भारताला एका काळ्या युगाला सामोरे जावे लागले असते. पानिपत युद्धाने अनेक भीषण परिणाम घडवले. खरं तर ह्याला युद्ध न म्हणता महायुद्धच म्हणायला हवे.
एकंदरीत जे झाले ते झाले. पण ते जर झाले नसते तर?? मराठ्यांचे 50 हजार सैन्य, 27 मोहरा, 2 मोती न गळते तर? मराठ्याएवजी अफगानांचे पानिपत झाले असते तर??
बक्सर च्या युद्धात मराठ्यांनी नक्कीच सर्वांबरोबर मिळुन इंग्रजाना धूळ चारली असती?
आजचा भारत कसा असता??
आज ह्या गोष्टीला महत्व नसलं तरी एकंदरीत स्वप्नरंजन म्हणून का होईना पण मराठा साम्राज्य कुठपर्यंत असतं? आजच्या भारताच्या सीमा कुठवर असत्या? सांस्कृतिक, राजनैतिक, भौगोलिक भारत कसा असता? आणी आजच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम असता??
( इतिहासात जर तर ला महत्व नसतं. अशी पिंक टाकुन धाग्याच पानिपत करायला कृपया येऊ नका.)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तर राघोबाने कुवैत वाया लाहोर भरारी मारली असती योरप पर्यंत. त्याच्या भीतीने अरबांचे खजूर भिजले असते. जाताजाता मदीनेच्या शेखांच्या जाळीच्या बनेली फाडल्या असत्या. पोप कडून पापांची कबुली घेऊन धाकट्या बांझटाईन च्या सीझर ला नामधारी करून बसवले असते. होळकर वाखान कॉरिडॉर मधून चीन ला घुसले असते. अफगाण्यांची अफू चिन्यांना आणि जपान्यांनी देऊन शिन्तो धर्माला हिंदू धर्माचे मूळ रूपाची आठवण करून दिली असती. सदाशिव नावडता असल्याने त्याला जहाजे देऊन आझटेक लोकांची तख्ते फोडायचा जिमा दिला असता. बीथोवन ने रूनस ऑफ अथेन्स मध्ये तुर्कीश मार्च काढून मराठा धुरळा वापरला असता.

त्याही पुढे जाऊन मराठयांनी अमेरिका काबीज केली असती आणि आज अब की बार ट्रम्प सरकारच्या ऐवजी अब की बार उद्धव सरकार असे नारे लागले असते.

शशी थरूर च्या एका व्हिडिओमध्ये मी ऐकलं होतं जर पानिपत युद्ध मराठी जिंकले असते तर फारच वेगळं असलं असतं . मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये शासन प्रस्थापित करून हळूहळू इंग्लंड सारखेच लोकशाही आणली असती .

मला याबद्दल फारसे काही माहीत नाही . पण , खरंच ही संकल्पना फार चांगली आहे . ज्याचा इतिहासाचा चांगला अभ्यास आहे तो या जर-तर वर भलीमोठी कादंबरी लिहू शकतो . ज्यामध्ये अल्टरनेट हिस्ट्री दाखवून मराठे पानिपतचे युद्ध जिंकले आहेत असं दाखवता येउ शकतं .
Alternate history , fantasy या प्रकारात मोडणारी चांगली कादंबरी होऊ शकेल...

तसेही अल्टरनेट हिस्ट्री असलेल्या कादंबरी मराठीत आहेतच कुठे....

चिडकू आणी dj तुम्हा लोकांसाठीच शेवटची ओळ लिहिली होती. असो.
शुभम छान प्रतिसाद. खुशवंत सिंग ह्यांनीही पानिपत युद्धाबद्दल लिहिलंय. कुठल्या पुस्तकात ते माहीत नाही. कुणाला माहीत असेल तर कृपया सांगा.
इंग्रजानी मराठे येतील म्हणून 5 km लांबीचा खंदक खंदून ठेवला होता. मराठे जिंकते तर कदाचित इंग्रज कोलकात्या बाहेर न येते. एकटा महादजी 32 वर्षे पुरून उरला पानिपता नंतर तर इतर पानिपतावर पावन झालेले सरदार संपवायला इंग्रजांना आणखी शंभर वर्षे लागली असती असे वाटते.

आदिती प्रेषित मध्ये नाही. यक्षांची देणगी मध्ये गंगाधर पंतांचे पानिपत म्हणून. पुस्तक ऑनलाइन मागवून वाचणार आहे.

योग्य नियोजन असते तर आपण पानिपत नक्की जिंकले असते. मग काबूल कंदाहार अफगाणिस्तान पर्यंत मराठ्यांचे राज्य विस्तारले असते आणि नंतर भारतात इंग्रजांचे राज्य आले नसते

कनिका, बरोबर. कदाचित आजचीही परिस्थिती वेगळी असती. ह्या युद्धाने उत्तरेत मोठी पोकळी निर्माण केली. महादजी शिंदेंनी ती भरली पण त्यात फार वेळ गेला.

पानिपत जिंकतो तर...?
मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये शासन प्रस्थापित करून निर्भयासारख्या केस मध्ये चौरंगा बनवण्याची शिक्षा तत्काळ अमलात आणली गेली असती.

मराठे आणि पेशवे यांच्या ताब्यात भारत राहिला असता तर अनागोंदी शिवाय अन्य काही झालं असतं असे वाटत नाही
मराठ्यांची कर्तबगारी कितीही उच्च असली तरी राज्यकारभार आदर्श पद्धतीने चालवणे थोरल्या महाराजांनंतर कोणाला जमले असे वाटत नाही
रणांगणावर प्रचंड शौर्य गाजवणारे मराठे हे उत्तरेला लुटारू म्हणूनच कुप्रसिद्ध होते आणि म्हणूंच पानिपतावरुन जीव वाचवून पळणाऱ्या मराठ्यांना लोकांनी लुटले
भाऊबंदकी, सत्तेसाठी एकमेकांवर कुरघोड्या आणि बाकी राजकारणात इंग्रजाचीच मदत घेऊन मराठ्यांनी प्रामुख्याने पेशव्यांनी राज्य लयास नेले असते
जे नंतर झालेच त्यामुळे पानिपत विजयानंतरही सत्तेचा लंबक इंग्रजांकडे झुकला असता यात शंका नाही
पेशवे तर काय कर्जात बुडालेल्या अवस्थेत होते आणि नंतर त्यांच्यातही कुरबुरी, राजकारण

पानिपत युद्ध कोण जिंकले हा मुद्दा गौण ठरतो. कारण युद्धात दोनही पक्षांची अतोनात हानी झाली ! यातून दोघेही बाहेर पडू शकले नाहीत. त्याचाच फायदा इंग्रजाना झाला आणि पुढचा इतिहास घडला...
त्यामुळे फारसे वेगळे काही झाले असते असे वाटत नाही..

युद्धात जिंकलो असतो तर अस घडल असते असा विचार करण्यात काही अर्ध नाही.
मराठी राजसत्ता युद्ध हरली हे सत्य आहे(पेशवे असले तरी ते मराठी राजसत्तेच्या प्रतिनिधी होते त्या मुळे इथे ब्राह्मण वादाला अर्थ नाही).
इंग्रज आले म्हणूनच आताच एकत्र भारत आणि लोकशाही आली आहे हे पण कटू आहे पण सत्य आहे.
इंग्रज satte व्यतिरिक्त कोणतीही भारतीय शाही सत्तेवर आली असती तर एकसंघ भारत निर्माण झाला नसतं आणि लोकशाही सुद्धा आली नसती.
छत्रपती शिवराय हेच एकमेव जनतेचे राजे होते त्यांच्या नंतर त्या takticha राजा झाला नाही.
शंभु राजे शुर होते,जनतेच्या हिताचे काळजी करणारे होते पण त्यांना धूर्त पना जमला नाही.
आणि जवळच्या लोकांनीच त्यांचा घात केला

छत्रपतींनी आदर्श राजसत्ता कशी असावी हे दाखवून दिले आणि परमपूज्य बाबासाहेब नी आदर्श लोकशाही कशी असावी हे राज्य घटने मधून दाखवून दिले.
हे दोन्ही महापुरुष महाराष्ट्र ची शान आहेत

आशुचँप, मराठ्यांना उत्तरेत लुटारू म्हणून ओळखत होते, म्हणून आपणही त्यांना त्याच दृष्टीकोनातून बघणं अयोग्य ठरेल. सुरत लुटलेल्या शिवाजीराजांना सुद्धा मोगल लुटारूच समजत होते. आझाद हिंद सेना निर्माण करणार्या सुभाषबाबूंना देशद्रोही समजणारे बंगाली बाबू कमी नव्हते. किंबहूना, युद्धात पराभूत होऊन, परत निघालेल्या मराठ्यांना लुटणारे उत्तर भारतीय राजवटींनी मराठ्यांना लुटेरे म्हणणं हेच दांभिक आहे.

आता मूळ 'मधूच्या आत्याबाईंना मिशा असत्या तर' प्रश्नाकडे. जर पानिपत जिंकलं असतं तर कदाचित राज्य इतकं खिळखिळं झालं नसतं आणी अशा खिळखिळ्या राज्यात पर्यायानं होणार्या अंतर्गत कलहांपासून होणारं नुकसान सुद्धा झालं नसतं. उत्तम, भरभराट होणार्या राज्यात स्थैर्य, कला-उद्योगांची भरभराट सुद्धा झाली असती. आणी लोकशाही, सामाजिक परिवर्तन जर हळूहळू जगात झिरपलच असती, तर ते भारतापर्यंत सुद्धा पोहोचू शकलं असतं. डिसक्लेमरः हे सगळं कल्पनारंजन आहे.

फेफ - विपर्यास होतोय
मी मराठ्यांना लुटारू म्हणलं नाहीये, त्या काळी त्यांना तसे समजले जात होते हे सांगतोय
मराठ्यांनी युद्धे जिंकून चौथाई चे हक्क मिळवले पण त्याची अंमलबजावणी करण्यात कमी पडले त्यामुळे कायमच मराठी मोहिमा खर्चाचा डोंगर उभा करत, नेत्रदीपक विजयासोबत कुशल प्रशासन देखील आवश्यक असते ते मराठी साम्राज्याच्या काळात अभावानेच दिसले
सैनिकांना द्यायला पगार नसल्याने किंवा कायमची चणचण असल्याने मोहिमेवर या फौजा लुटालूट करत जात आणि त्याला धरबंध नसे. शत्रूचे नुकसान करणे युद्धनीतीत बसत असले तरी या ओरबाडून नेण्याच्या प्रकाराला उत्तर भारतीय जनता विटली होती
शिंदे होळकरांना तुमचे तुम्ही बघून घ्या असे सांगितल्याने त्यांनी आपले खजिने भरून घेतले पण मराठा सैन्य कायम कर्जात

आशुचँप, तुझं निरीक्षण अगदी योग्य आहे. वस्तुस्थिती बरोबर मांडली आहेस. पण, ह्या धाग्याच्या निमित्तानं मी थोडा वेगळा विचार केला. शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर, मराठी राज्य नेहेमीच युद्धस्थितीत राहिलं. आर्थिक अडचणींची सुरूवात राजाराम महाराजांच्या काळातच झाली. शिवाजी महाराजांनी बंद केलेली वतनदारीची पद्धत राजाराम महाराजांना ह्याच आर्थिक अडचणींपायी पुन्हा सुरू करावी लागली. त्या काळापासून ते १८१८ साली, जेव्हा पेशवाई बुडाली, तोपर्यंत चा काळ एका राज्याच्या दृष्टीनं फार मोठा नाहीये. ह्याच काळात, युद्धं, राज्याच्या सीमांचा विस्तार, अंतर्गत यादवी (भोसले घराणं आणी इतरही) ह्या सगळ्याचा फटका मराठी राज्याला बसला. शिवाजी महाराजांच्या काळात एका स्टार्ट-अप प्रमाणे असलेलं मराठी राज्य मॅच्युरिटी च्या स्टेज ला येता-येता लयाला गेलं.

मराठा साम्राज्याचा र्‍हास पानिपतच्या ३ र्‍या युद्धानंतर सुरु झाला असं उघड दिसत असलं तरीहि त्याची बीजं शाहु महाराजांच्या कारकिर्दित पेरली गेली. शिवाजी महाराजांनी पाहिलेलं, आणि अंमलात आणलेलं स्वराज्याचं (रयतेचं राज्य) स्वप्न आणि संकल्पना शाहुमहाराजांनंतर डायलुट होत गेली. स्ट्रटिजिक विजन (हिंदूपदपातशाहि) डोळ्यासमोर ठेउन महाराजांनी एकेक करुन टॅक्टिकल लढाया जिंकल्या. संभाजी महाराजांनी त्यांचाच कित्ता गिरवला. परंतु पुढे, शाहुमहाराज आणि त्यानंतर आलेले छत्रपती निव्वळ नामधारी होते. औरंगजेबाच्या मृत्युनंतर झालेल्या पोकळीचा उपयोग (टॅक्टिकल) मराठ्यांना झाला पण मिळवलेला मुलुख, त्याचं व्यवस्थापन करण्याचं कौशल्य/मुत्सद्धीपणा (स्ट्र्टिजिक विजन) त्यांना दाखवता आला नाहि. त्या राजांना मांडलिकत्व स्विकारण्यास भाग पाडावं हि दूरदृष्टि अजिबात राबवली गेली नाहि, चौथवर समाधान मानुन बसले. शिवाय चौथ देणार्‍यांवरहि वचक असा बसवला नाहि. पुढे त्यांनी चौथ देण्यात टाळाटाळ/विलंब केलाच वर गरज होती तेंव्हा मराठ्यांच्या मोहिमांमध्ये सामिल झाले नाहित. या चूकिचा कॅस्केडिंग इफेक्ट भविष्यात्ल्या मोहिमा अपयशी होण्यात, मराठ्यांची एकि दुभंगण्यात, आणि सत्तेचं विकेंद्रिकरण होण्यात झाला. जो पुढे कधिच सांधता आला नाहि, आणि त्याचा फायदा इंग्रजांनी घेतला...

शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या प्रत्येक गडाची/किल्ल्याची चोख व्यवस्था कायम ठेवली होती. तीच शिस्त आणि सूत्र मराठ्यांनी जिंकलेल्या मुलुखाच्या बाबतीत अंमलात आणली असती तर वेगळा ईतिहास घडला असता...

आशुचॅम्प, फेरफटका, राज छान प्रतिसाद.
राज, मला वाटतं मराठे जसजसे प्रदेश जिंकत गेले तसतसे व्यवस्था लावत गेले, ग्वाल्हेर , इंदूर, बडोदा, ह्या मुलुखात व्यवस्था आणली गेली. मराठे हळूहळू पुढे सरकतच होते. शिंदे ब्रदर्स ह्यात आघाडीवर होते. प्रदेश जिंकल्याबरोबर व्यवस्था लावणे शक्य नसावं. नाहीतर बाजीराव दिल्लीत पोहोचले तेव्हाच दिल्लीची व्यवस्था लावली असती.

>>ग्वाल्हेर , इंदूर, बडोदा, ह्या मुलुखात व्यवस्था आणली गेली<<
हि शहरं शिंदे, होळकर, गायकवाड या सरदारांनी जवळजवळ नव्याने बसवली. माझा प्रश्न हरयाणा, पंजाब, राजस्थान भागातल्या छोट्या-मोठ्या राजांकरता होता. अलेक्झँडरने भारतावर आक्रमण करताना वाटेवरचे प्रदेश पादाक्रांत केले होते. पुढे त्याचं काय झालं याचा धडा मराठ्यांनी घेतला नाहि, हे सांगायचं आहे...

धन्यवाद स्वाती, आसा
फेरफटका - बरोबर आहे, पण तत्कालीन परिस्थीतीमुळेच तसे निर्णय घ्यावे लागले. संभाजी आणि नंतर राजाराज महाराजांच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी सुत्रे हाती घेतली आणि त्या कर्तबगार बाईने ओरंगजेब आणि त्याच्या अवाढव्य सैन्याला महाराष्ट्रात तोंड देणे शक्य नाही हे लक्षात येताच मराठी फौजा बाहेर पाठवायला सुरुवात केली. माळवा, गुजरात, बंगाल प्रांतात मराठी फौजा धुडगुस घालू लागल्यावर त्यांना आवरता येणे अशक्य असल्याचे औरंगजेबाच्या ध्यानी आले. त्याच्यामृत्यूनंतर मुघल साम्राज्याचे वर्चस्व संपत आले आणि दुर्दैवाने शाहू आणि ताराबाईंमध्ये गादीवरून दुफळी माजली.

शाहूंनी त्यामुळे सर्वाधिकार पेशव्यांना दिले आणि तिथून मराठ्यांचे राजकारण बदलायला सुरुवात झाली. सत्ताकेंद्र बदलले, धोरणे बदलली आणि कुठल्याही व्यापक ध्येयाशिवाय मराठा साम्राज्य वेगाने वाढत गेले. जोवर जनतेला हे आपले राज्य आहे असे वाटत नाही तोवर कितीही प्रदेश अंकित केला तरी त्याला अर्थ नसतो, त्यामुळे मराठ्यांच्या सीमा बंगाल आणि अफगाणीस्तानला जाऊन भिडल्या तरी जनतेला विश्वास बादशहा आणि त्यांच्या सही शिक्क्यावरच होता. अन्यथा १८५७ च्या बंडात नामधारी का होईना बादशहाला राजा म्हणून नेमण्याचा काही संबधंच नव्हता.

मराठा सैन्याबद्दल आपुलकी, विश्वास आणि खात्री उत्तर भारतात कधीच नव्हती आणि आजही नाहीये. अशा परिस्थितीत अब्दालीला सामोरे जाऊन अपरिचित ठिकाणी अंगावर घेण्याचा निर्णय हा सर्वस्वी अनाकलनीय होता. दिल्लीची मोर्चेबांधणी करून, रसदीचे मार्ग सुरक्षित ठेऊन अब्दालीची सोयिस्कर ठिकाणी वाट पाहणे हेच योग्य ठरले असते. पण अतिआत्मविश्वास आणि शत्रुला कमी लेखण्याची चूक भोवली.

पानिपत जिंकलो असतो हा मुद्दा वेगळाच आहे मुळात पानीपत होऊच न देणे ही खरी मुसद्देगिरी ठरली असती आणि त्यात जर मराठे जिंकले असते तर चित्र वेगळे झाले असते.

आशूचॅम्प खूप अभ्यासपुर्ण प्रतिसाद. खरं आहे. अब्दाली उत्तर भारताला लुटत होता. आणि तिथले राजे नवाब तटस्थ नाहीतर अब्दालीकडून होते. नको ती लढाई अंगावर घेतली. मल्हारराव होळकर अब्दालीला परत पाठवत होतेच.

Submitted by आशुचँप on 23 February, 2020 - 23:50

>>>>> खूपच अभ्यासपुर्ण प्रतिसाद आशुचँप !!

जर मराठे युद्ध जिंकले असते तरी भारत हा युरोप किंवा middle east प्रमाणे अनेक छोट्या देशांचा प्रांत बनला असता. कारण शाहू महाराजांच्या काळानंतर मराठा साम्राज्य शक्तिशाली जरी असले तरी त्यांना दिल्लीपती होण्याची इच्छा नसावी.
दिल्लीचा कारभार पुणे किंवा सातारा येथून करण्याचा हट्टामुळे मराठे हे फक्त दिल्लीचे सरदार राहिले जर मराठे दिल्लीचे राज्यकर्ते झाले असते किंवा देशाची राजधानी पुणे अथवा सातारा केली असती तर अनेक छोटे मोठे सरदार हे मराठा साम्राज्याचे एकनिष्ठ राहिले असते. तर कदाचित एक मोठे साम्राज्याचा पाया रचला गेला असता

अमित. बरोबर. दिल्ली वर ताबा मिळवून आडवा येईल त्याला मुळासकट आडवा करायला हवा होता. तह तह खेळण्यामुळे शत्रू बळावले.

मल्हारराव होळकर अब्दालीला परत पाठवत होतेच.
नवीन Submitted by अमरेंद्र बाहुबली on 26 February, 2020 - 16:06
>><<

कदाचित म्हणूनच मल्हारराव होळकर,
विठ्ठल विंचूरकर सारखे सरदार, ऐन युद्धाच्या प्रसंगी पाठीला पाय लावून पळून गेले पानिपतातून. मुळात याच मल्हाराव होळकरांमुळे नजिब खान कितीतरी वेळा वाचला होता मराठ्यांच्या तडाख्यापासून. का तर तो मल्हाराव होळकरांचा मानसपुत्र होता.

मराठे शुर पने लढले हे महत्वाचे.
परकीय क्षत्रू शी दोन हात करायची हिम्मत दाखवली हेच मोठे काम आहे

कदाचित म्हणूनच मल्हारराव होळकर,
विठ्ठल विंचूरकर सारखे सरदार, ऐन युद्धाच्या प्रसंगी पाठीला पाय लावून पळून गेले पानिपतातून. >>>
मल्हारराव उत्तर भारताला चांगल्या प्रकारे ओळखून होते. भाऊसाहेबांबरोबर असलेले यात्रेकरू आणी त्यांचा स्पीड ह्यावरून कदाचित मल्हाररावना युद्धाचा आधीच अंदाज आला असावा.

पानिपत युध्दाआधीची परिस्थिती, युद्ध आणी युद्धानंतर चे परिणाम ह्यावर ह्या चॅनल ने छान विडिओ बनवलाय.एकदा पहाच.
https://youtu.be/qv1AtOsQ4NE

मराठे शुर पने लढले हे महत्वाचे.
परकीय क्षत्रू शी दोन हात करायची हिम्मत दाखवली हेच मोठे काम आहे >>> हे तितकेच खरे.

>>नको ती लढाई अंगावर घेतली.<<
दिल्लीचं रक्षण करणं हि मराठ्यांची नैतिक जबाबदारी होती, बादशहाशी झालेल्या १७५२(?) च्या करारानुसार. अब्दालीचा सामना करायला मराठ्यांनी जायलाच हवं होतं पण संपुर्ण मोहिमेचं नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणीत प्रचंड प्रमाणात ढिसाळ्पणा झाल्यानेच मराठ्यांवर नामुष्कि आणि कायमचा बट्टा लागला. आत्ताच्या मिलिटरी टर्म मध्ये सांगायचं झालं तर - इट वाज ए टोटल क्लस्टरफक...

बरोबर आहे करारानुसार दिल्लीचे रक्षण करणे हीच होती
म्हणूनच मी वरच्या प्रतिसादात लिहलं आहे की पानिपत, कुंजपुरा प्रातांत केवळ पैसे आणि लुटीसाठी जावं लागलं
इतकी अवाढव्य सेना आणि त्याची आर्थिक तरतूद काहीच नाही
शेवटी दिल्लीत रुपेरी पत्रा उचकटून त्याची नाणी पाडावी लागली

बरे ही जर अब्दाली ला रोखण्याची मोहीम होती तर त्यात कुटुंबकबिला, साधू, ब्राह्मणवृंद कशासाठी होता तर तिथल्या तीर्थक्षेत्र बघायला

बजारबुणगे म्हणून हिणवले जातात ते खरे तर सैन्याचा कणा असतात, भोई, सुतार,लोहार, बलुतेदार सगळे सैन्याचा एक भागच असतात त्यामुळे ते आवश्यक होते पण बाकी जनाना, आणि भिक्षुक, भट केवळ भरणा

पेशव्यांची ही मोहीम मराठा मोहिमेपेक्षा मोगली पद्धतीची मोहीम जास्त होती

>>म्हणूनच मी वरच्या प्रतिसादात लिहलं आहे की पानिपत, कुंजपुरा प्रातांत केवळ पैसे आणि लुटीसाठी जावं लागलं<<
कुंजपुरावर स्वारी आणि ते उध्वस्त करण्यात अजुन एक महत्वाचा उद्देश होता. दत्ताजी शिंद्यांच्या हत्येचा बदला. दत्ताजींची हत्या करणारा कुतुबशहा कुंजपुरात लपुन बसला होता. सदाशिव भाऊंनी त्याचा वध करुन दत्ताजींच्या हत्येचा सूड घेतला...

कुंजपुरावर स्वारी आणि ते उध्वस्त करण्यात अजुन एक महत्वाचा उद्देश होता>> मुख्य उद्देश- रसदेची तरतूद. त्यामुळे उत्तरेकडे ओढले गेले. कुंजपुरा मोहिमेनंतर दिल्लीकडे लगेच येणे अपेक्षित होते पण कुरुक्षेत्रावर तीर्थयात्रा झाली.

रच्याकने हिस्ट्री पाक ह्या पाकिस्तानी website वर ह्या युद्धाबद्दल वाचले तीथे सांगितलंय की अब्दाली ने इतका मोठा विजय मिळवून देऊनही भारतातील मुस्लिम शासकाना त्याचा फायदा उचलता आला नाही.

पानीपत हरतो तर? असा धागा काढला असता.

जोक्स अपार्ट, आशुचॅम्प आणि राज यांच्या माहितीपूर्ण पोस्ट्स आहेत.

विकेंडला नेफिवर "टोक्यो ट्रायल्स" हि दुसर्‍या महायुद्धा नंतर मित्र राष्ट्रांनी जपानच्या नेत्यांवर वॉर क्राइम्स, ह्युमॅनिटी इ. आरोपांवर चालवलेल्या खटल्यांची डॉक्युमेंटरी पाहिली. सुंदर बनवलेली आहे.

या खटल्यात अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी जपानच्या सम्राटाला त्याची जपानच्या अग्रेशनला, अत्याचाराला संमती असुनहि आरोपी म्हणुन उभं केलंच किंवा करु दिलंच नाहि. शिवाय त्याचं सम्राटपद अढळ ठेवलं, अर्थात अधिकार कमी केले. असं करण्यामागे त्याचा सोश्यो-पोलिटिकल परिणाम संपुर्ण एपॅक मध्ये काय होईल हा होता. शिवाय जपानच्या पुनर्बांधणीची जबाबदारी अमेरिकेने घेतली होती आणि त्या प्रक्रियेतले संभावित अडथळे टाळण्याकडे झुकणारा त्यांचा कल साहजिकच होता. जपानचा सम्राट तर केवळ जनरल डग्लस मकार्थरच्या हातचं बाहुलं होता. (बाय्दवे, मकार्थरवर बायोपिक गणले जातील असे दोन चित्रपट मस्ट सी आहेत. एक ग्रेगरी पेक चा मकार्थर आणि दुसरा टामी लि जोन्सचा एंपरर"

असो, तर सांगायचा उद्देश हा कि साधारण तसाच काहिसा प्रकार या घटनेच्या जवळजवळ १५० वर्षांपुर्वि मराठ्यांनी दिल्लीत केला होता. दिल्लीच्या बादशहाचा वध करुन मराठे गादिवर बसले नाहित यामागचं कारण परत एकदा त्यावेळेची सोश्यो-पोलिटिकल परिस्थिती. उत्तरेत मराठ्यांची प्रतिमा लुटारुंपासुन सुनियोजीत राज्यकर्ते होइपर्यंत केलेली ती एक तडजोड होती, असं मानायला हरकत नाहि. दुर्दैवाने पानिपत घडलं आणि ती वेळ आली नाहि. पुढे महादजी शिंद्यांचा वचक एक फाइव स्टार्स जनरल म्हणुन बादशहावर होताच - जसा मकार्थरचा एंपरर हिरोहिटो आणि संपुर्ण जपानवर होता...

मराठे पानिपतात जिंकले असते तर पुढे काय झालं असतं, याची ढोबळ कल्पना जपानच्या उदाहरणावरुन साकारता येईल का, हा किडा इच्छुकांच्या डोक्यात सोडावा - म्हणुन हा पोस्टप्रपंच... Wink