आकाशसुद्धा होत जाई सावळे

Submitted by सुप्रिया जाधव. on 10 February, 2020 - 03:54

निर्भत्सना-आलोचनांचे हे खिळे
नुक्ती भरत आली जखमही भळभळे

ती भरदुपारी यायची गच्चीमधे
आकाशसुद्धा होत जाई सावळे

काढायला जावू नको गफलत तिची
वाजायचे नाही रिकामे खुळखुळे

जर बोललो तर होत नाही पाहणे
हे व्हायचे केव्हा बरे दुखणे जुळे ?

तू टाळतो आहेस आयुष्या मला
मी भेटते आहे स्वतःला त्यामुळे

तू पाहिली आहेत माझी आसवे
तू पाहिले नाहीस ना माझे सुळे ?

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>तू टाळतो आहेस आयुष्या मला
मी भेटते आहे स्वतःला त्यामुळे>>>>....................... वाह!

>>>>>काढायला जावू नको गफलत तिची
वाजायचे नाही रिकामे खुळखुळे>>>> ............... सुंदर!