सनकी भाग १२

Submitted by Swamini Chougule on 8 February, 2020 - 22:03

फॅशन इव्हेंटसाठी आता दोन दिवस राहिले होते व फॅशन इव्हेंटची तयारी ही जोरात सुरू होती. फॅशन इव्हेंटसाठी मुंबईतील एक नामांकित ऑडिटोरीअम बुक केले होते. ब्रँड लाँच करण्यासाठी Mr माने,Mr स्मिथ त्यांच्या टीम सह भारतात आले होते. ते फॅशन इव्हेंटची तयारी पाहायला येणार होते. फॅशन इव्हेंटची तयारी अंतिम टप्प्यात होती. शिवीन सगळ्या तांत्रिक बाबी पाहत होता. लाईट्स, म्युझिक,डेकोरेशन अरेंजमेंट तसेच बैठक व्यवस्था या सर्व बाबी पाहण्यात तो गुंतला होता. तर सुधीरकडे निमंत्रण पत्रिका वाटण्याचे काम होते. रिचाकडे ब्युटीशीअन व हेअरस्टाइलिस्टची व डिजाईन केलेल्या कपड्यांची व्यवस्था पाहण्याचे काम होते. त्यामुळे ती ऑडिटोरीअम मध्ये हजर नव्हती. तर कायाकडे मॉडेल्सची व्यवस्था व त्यांची प्रॅक्टिस घेण्याचे काम होते. शोसाठी नामांकित मॉडेल्स निवडण्यात आले होते. त्यामुळे काया ऑडिटोरीअममध्ये हजर होती तिच लक्ष रॅम वॉक करणाऱ्या मॉडेल्सपेक्षा शिवीनकडेच होते असे ही मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी तेथे प्रशिक्षक होताच. शिवीनचा फोन वाजला म्हणून तो बॅक स्टेज गेला. काया त्याला पाहतच होती . तिने त्याला बॅक स्टेज गेलेले पाहीले व ती हळूच जाऊन शिवीनचे बोलणे ऐकू येईल व त्याला ती दिसणार नाही असे सुरक्षित अंतर ठेवून आडबाजूला उभी राहिली.
शिवीन फोनवर बोलत होता.
शिवीन,“मी सांगीतली तशी सर्व तयारी केली ना? रिचाला रेड रोज आवडतात त्याचीच सजावट हवी मला टेंट मध्ये आणि हो इंडियन फूड जे मी सांगीतले आहे तेच आणि डिनर झाल्यावर स्टोबेरी आईस्क्रीम इज मस्ट.” तो पुढे बोलणार तोवर समोरच्या फोनवरील माणसाने त्याला मध्येच थांबवले व तो बोलू लागला.
फोनवरील व्यक्ती,“ रिल्याक्स सर! तुम्ही सांगीतलेली सर्व तयारी तुमच्या मनाप्रमाणे होईल.मी हे विचारायला फोन केला होता की त्या दिवशी वाईनची व्यवस्था करायची की शँम्पेनची ”ती व्यक्ती बोलली.ती व्यक्ती म्हणजे हॉटेल मॅनेजर होती.
शिवीन,“ शँम्पेन हवी. बरं त्या फायर वर्कचे काय झाले? मी सांगीतलं होतं की मी इशारा केल्यावर पहिल्यांदा I love you richa आणि त्या नंतर please marry me.आणि त्या बरोबर हार्ट असं फायर वर्क आकाशात दिसायला हवं.आणि हो पूल साईड मी 20मार्चसाठी पूर्ण बुक केलीय तुमच्या हॉटेलची; मला डिस्टर्बन्स नको आहे.”तो एक एक सूचना देत होता.
फोनवरील व्यक्ती, “ yes sir, you don’t worry. सगळे अरेंजमेंट तुमच्या मना सारखे होईल.” असं म्हणून त्याने फोन ठेवला.
शिवीनने ही फोन ठेवला व तो परत त्याच्या कामाला निघला. काया त्याला निघताना पाहून तिथून लगेच बाजूला झाली.
हे सर्व एकूण कायाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. शिवीन रिचाला प्रपोज करणार आणि तिला लग्नाची मागणी घालणार ते ही इतक्या रोमँटिकली हे मात्र कायाला सहन होत नव्हते. ती हातातली कामे तशीच सोडून घरी गेली.शिवीन मात्र या सगळ्या पासून अनभिज्ञ होता.तो त्याच्या कामात पुन्हा गर्क झाला. मनातून तो खूपच रोमांचित होता कारण रिचासाठी ते सरप्राईज होते व रिचाच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला पाहायचा होता.तो फॅशन इव्हेंट झाल्यावर तिला हॉटेलमध्ये घेऊन जाणार होता. त्याने खूप मनापासून रिचासाठी सरप्राईज प्लॅन केले होते.
काया घरी गेली व पाय आपटत सरळ त्या अडगळीसाठी असलेल्या रूमध्ये गेली. हे पाहून शांताबाईने सुधीरला फोन केला. कारण कायाच्या एकूणच अवतारावरून ती आता खूप धिंगाणा करणार म्हणून तिने कायाला सावरण्यासाठी त्याला अगोदरच बोलावून घेतले. पण कायाने काही धिंगाणा केला नाही. ती त्या अडगळीसाठीच्या रूम मधून डोळे पुसत बाहेर आली. तो पर्यंत बेल वाजली सुधीर हजर होता.काया शांत होती. तिने काही तरी निश्चय केलाय; काही तरी ठरवलंय. हे तिच्या चेहर्‍यावरून साफ दिसत होते. सुधीरला पाहून काया समजून गेली की त्याला शांताबाईने बोलावले असेल. तिने सुधीरला बस असा इशारा करून ती फ्रेश व्हायला तिच्या रूममध्ये गेली.
शांताबाई तो पर्यंत सुधीरला कॉफी घेऊन आली.
सुधीर, “ काय शांताबाई! उगीच बोलावले मला; काया दिचा मूड तर चांगला आहे.”
शांताबाई,“ अहो दादा खरच कायाताई आल्या तेंव्हा लय चिडलेल्या होत्या पण कसं काय शांत झाल्या काय माहीत?”ती आश्चर्याने बोलत होती.
सुधीर,“ ठीक आहे.” असं म्हणून तो विचारात पडला.कारण शांताबाईचा अंदाज इतक्या वर्षात कधी चुकला नव्हता.
खरं तर त्याला ही कायाच असं वागणं नवीन होत. त्याला आता कायाच्या शांत राहण्याची भीती वाटत होती कारण काया अशी शांत राहनाऱ्यातली नव्हती.त्याला ही वादळा पूर्वीची शांतता वाटत होती. सुधीरचा अंदाज खरा ठरणार होता कारण काया खूप घातक पाऊल उचलणार होती. तो पर्यंत काया फ्रेश होऊन आली . खूपच शांतपणे बोलू लागली.
काया,“ बरं झालं सुधीर तू आलास मी तुला फोन करणारच होते. माझं खूप महत्त्वाच काम आहे व त्यात मला तुझी साथ हवी आहे .”
सुधीर,“बोल दि काय काम आहे?” तो तत्परतेने म्हणाला.
काया,“थांब कोणी तरी येणार आहे मग सगळं सांगेन.” असं ती म्हणाली.
तो पर्यंत बेल वाजली सुधीरने दार उघडले तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. समोर पक्या दात काढत उभा होता. सुधीर त्याला पाहून त्याच्यावर खेकसला.
सुधीर, “तुला हे घर कसे माहिती; चल निघ इथून.”
तो पर्यंत काया दारात आली व सुधीरला म्हणाली.
काया,“येऊ दे त्याला मीच बोलावले आहे.”असे म्हणून तिने पक्याला घरात घेतले.
सुधीर ना खुशीनेच येऊन सोप्यावर बसला. पक्या सगळे घर अधाश्या सारखे पाहत होता. सोप्याच्या खुर्चीवर बसला.आणि बोलू लागला.
पक्या,“ मॅडम तुमचं काम लय रिस्की हाय तर पैसे बी जास्त लागणार तुमी म्हणाल तसा प्लॅन करू पण कमीत कमी दहा बारा मानस लागल्याल आणि त्याचे बी पैसे वेगळे द्यायचे बगा. परत झिक-झिक नको मला” तो मोठ- मोठयाने हात वारे करून बोलत होता.
काया,“पैशाची काळजी तू नको करुस तुला पाहिजे तेवढे पैसे मिळतील.”ती शांतपणे बोलली
सुधीर,“ कसले काम?कसला प्लॅन ?मला कळेल का काही?तुम्हीं कशा बद्दल बोलताय?”तो वैतागून बोलला.
काया,“फॅशन इव्हेंट दिवशी म्हणजेच वीस मार्चला रिचा सरनाईकला किडण्याप करायचे आहे.” ती एखादी सूचना द्यावी अशा शांतपणे म्हणाली.
सुधीर,“काय किडण्याप?रिचाचे” सुधीर हे ऐकून ओरडला.
काया,“हळू बोल सुधीर,ओरडू नकोस.”ती त्याला दटावत म्हणाली.
पक्या,“ तर प्लॅन काय हाय? म्याडम.”पक्या दाढी खाजवत म्हणाला.
सुधीर काही बोलणार तोच सुधीरकडे दुर्लक्ष करत काया बोलू लागली.
काया,“तर ऐका, आज पासून दोन दिवसा नंतर फॅशन इव्हेंट आहे. तर त्या दिवशी आपल्याला त्या रिचाला किडण्याप करायचे आहे. तर इव्हेंट आठ वाजता सुरू होणार आहे. सुरवात ब्रँडच्या लॉंजिंगने होणार त्याला कमीत कमी एक तास लागणार तेंव्हा सगळे म्हणजे रिचा ही तिथेच असणार पण त्या वेळी आपल्याला काही करता येणार नाही. त्या नंतर रॅम्प वॉक सुरू होणार तेंव्हा रिचा बॅक स्टेज असणार आहे. सुधीर तू तिच्यावर लक्ष ठेवायचे.पक्या तुला आणि तुझ्या माणसांना इव्हेंट मध्ये एन्ट्री देण्याचे काम माझे; तुम्हीं वेटर बनून कार्यक्रमात शिरकाव करणार आहात. सुधीर तू रिचा एकटी असली की पक्याला एक मिस्स कॉल द्यायचा .पक्या तुझ्यासाठी तो ग्रीन सिग्नल असेल की रस्ता साफ आहे. पक्या तुम्ही बॅक स्टेजच्या आसपासच राहायचे. सिग्नल मिळाले की तिला क्लोरोफ़र्मचा रूमाल लावून एका गादीत गुंडाळून ऑडिटोरीअमच्या मागच्या गेट कडे घेऊन यायचे तिथे ठरल्याप्रमाणे आपली गाडी उभी असेल त्यातून तिला घेऊन आपल्या ठरलेल्या ठिकाणावर पोहचायचे.काही झाले तरी हा प्लॅन चेंज होणार नाही. सुधीर तू सगळीकडे लक्ष ठेवून ते नीट बाहेर पडतील याची काळजी घ्यायची.तो पर्यंत शिवीन आणि रिचाच्या घराचे तिच्या पर्यंत पोहचणार नाहीत याची काळजी मी घेईन. खूप गर्दी असल्याने रिचा गायब झाल्याचे लवकर लक्षात येणार नाही.त्यामुळे आपलं काम होईल.”ती शांतपणे प्लॅन समजावून सांगत होती.
पक्या,“प्लॅन भारी आहे मॅडम.असच करू.” अस म्हणून तो हसायला लागला.कायाने एक नोटांचा बंडल त्याला दिला.तो निघून गेला.
हे सगळं सुधीर पाहत होता. त्याला कायाने न विचारताच गृहीत धरून प्लॅन केला होता. याच त्याला वाईट वाटत होतं पण त्याच्या मना विरुद्ध जाऊन का असेना त्याला या सगळ्यात कायाची मदत करावीच लागणार होती.पण त्याला काही प्रश्न पडले होते त्याची उत्तरे ही त्याला कायाकडून हवी होती व कायाचे मन वळवण्याचा शेवटचा प्रयत्न करावा म्हणून तो बोलू लागला.
सुधीर,“काया दि किडण्यापिंग वगैरे अजिबात पटलेले नाही मला आणि त्या रिचाला किडण्याप करून साध्य काय होणार आहे?तेच मला कळत नाही. तुझे टार्गेट शिवीन आहे तर रिचाचे किडण्यापिंग करवून काय होणार?बरं तिला पोलीस शोधणार नाहीत का ? पण तिचं पुढे काय करायचे? तिला किडण्याप करून आपला फायदा काय?” तो अजून प्रश्न विचारणार तोच कायाने त्याला थांबवले.
काया,“ अरे हो हो किती प्रश्न विचारशील शांत हो! जरा श्वास घे. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.”अस म्हणून ती बेडरूम मध्ये गेली.
कायाने योजलेला प्लॅन पूर्ण होणार का? पण ती रिचाला किडण्याप करून काय मिळवणार होती?शिवीन त्याच्या प्रेमाची कबुली रिचा पुढे देऊ शकेल?
क्रमशः
(सदरचे लेखन कॉपी राईट या कायद्या अंतर्गत येत असून लेखकाच्या नावा शिवाय कोठेही पोस्ट करू नये . साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Good