कॅरिकेचर असा विभाग नाहिये म्हणुन इकडेच पोस्टतो..
महाराष्ट्रात जनाधार असलेले दोनच साहेब. येक बाळासाहेब आणि दुसरे नुसतेच साहेब. साहेबांचा आज वाढदिवस. कॉन्ग्रेस, प्रजा समाजवादी , कोन्ग्रेस (s), पुन्हा कॉन्ग्रेस आणि नंतर NCP . अशी किती घर मांडली याचा हिशेब ठेवायचा तरी एखाद e-page कमी पडायच. त्यात वसंतदादांच्या पाठित खंजीर खुपसण्यापासुन (कि आधि यशवंतरावांच्या -माझ राजकिय ज्ञान तसे तोकडेच) ते एन्र्रॉन, तेलगी ते अगदी आजचा लाल गहु कित्येक प्रकरण मागे लागली. त्या प्रत्येक आरोपातुन साहेब बाहेरर्ही आले. एन्रॉनचे पुनर्जीवन झाले, तेल्गिची नार्कोटेस्टच क्वेच्चन झाली, ज्या बाळासाहेबानी त्यांच्यावर फैरी झाड्ल्या त्यानाही कधीकाळि त्यांची जवळिक करावीशी वाटली.त्यांचा जनाधार कधीच कमी नाही झाला. आज खरोखर दुसरी फळि असेल महाराष्ट्रात राजकिय नेत्यांची तर ती साहेबांनी उभी केलीय्.(यावर वाद व्हावा अशी माझि इच्छा नाहिये कारण हे माझे वैय्यक्तीक मत आहे) . मी आत्तापर्यंत त्यांची तीनच भाषणं ऐकल्यात पण grassroot problems ची चांगलीच जाण आहे या माणसाला.
आज BCCI च्या अध्यक्षपदी बसल्यावर लोकांच्या डोळ्यात खुपते पण त्या आधी त्यानी खोखो, कबड्डी, कुस्ती अशा संघटनांची पद सांभाळली हे सोईस्कर विसरले जाते. पंतप्रधानपदी बसायची त्यांची इच्छा पुर्ण होइल के नाही हे काळच सांगेल पण व्यक्तीशः मला येक मराठी माणुस त्या पदावर बघायला आवडेल. (१९९१ च्या निवड्णुकित ३८ जागा जिंकल्यावर चांगली संधी होती पण महाराष्ट्रातील नेत्यांची संकुचीत वृत्ती आडवी आली)
साहेब
Submitted by पाटील on 12 December, 2007 - 02:52
गुलमोहर:
शेअर करा
चांगल जमलय.
स्केचेस मधली प्रगती चांगली आहे. काही minor गोष्टी जस कि strech कराव तस चेहरा तिरपा strech झालाय. पण खुप proportionate आले आहे.
आभार
थँक्स.. ते कॅरिकेचर च्या अंगाने काढलय आणि तो चेहर्यातला दोष आणखी जास्त हायलाईट करायचा प्रयत्न होता
तिरपा चेहरा
आजकाल काही आजाराने त्यांचा ओठ एका बाजुला झुकलेला दिसतो. मला वाटते हे कॅरिकेचर त्यांच्या आजच्या प्रतिमेचे आहे.
हो
शंतनु - बरोबर- तो चष्माही आजचाच आहे.