राधा आणि मीरा कृष्ण भक्तीची दोन रुपे. अनंत काला पासुन प्रेमाची ही दोन रुपे सगळ्यांना भावतात. दरवेळी नव्याने उलगडतात, कित्येकदा तर दोघी मध्ये साम्य जाणवते, अर्थात साम्य तर आहेच कृष्णप्रेमाचे कृष्णभक्तीचे..एकीला देहाच्या पातळीवर प्रत्यक्षात त्याचा सहवास लाभला अणि एकीला आत्म्याच्या पातळीवर...
आज प्राजु आणि उमेश च्या कविता वाचल्या मीरेवरच्या..अतिशय सुंदर आहेत.
मीरेचा विचार करता करत न कळत राधाही डोकावली मनात, आणि लिहिले गेले राधामीरा
राधापण आणि मीरापण.... (जाड टाईपातले आहे राधापण)
राधामीरा..
अनंग रास गोकुळ वाटेची
रंगात रंगली राधा कृष्णाची
कृष्ण मीरेचा सखा सोबती
विसरली जगा रंगली स्मरणी
रागावणे, रुसणे हलकेच हसणे
कान्हाच्या प्रेमात तैसेच धुंदावणे
देह कण कण झाला श्यामदंग
क्षणांत व्यापुन उरला मुकुंद
मुरलीच्या सुरांत मुरलीधरा शरण
उरले न काहीच केवळ कृष्णपण
मनी मानसी हरीचे भजन
चिंतनात उरले तुझे सखापण
प्रत्यक्ष भेटीची आस रोजची
नेत्रकमळे हरीदर्शने सुखावती
पापण्यांआडचे रोजचे भेटणे
डोळ्यामध्ये मेघश्याम उतरणे
गेला तशीच आर्त सोडुनी
अजुन वाटेवरी उभी गोकुळी
जन्मभरीची आस एकची
लीन तुझ्यात मी झाले कन्हाई
कृष्ण सख्य, कृष्ण देह
सकाम भक्तीचे..... राधापण
कृष्णमय, कृष्णार्पण
निष्काम भक्तीचे..... मीरापण
आवडले.
आवडले.
मायबोलीचा
मायबोलीचा कविता विभाग अगदी कृष्णमय झालाय !
कृष्ण ! कृष्ण !! कृष्ण !!!
मस्त !
सुंदर.
सुंदर. राधा आणि मीरा दोन्हीही मनात उतरल्या.'एक सुरत दिवानी,एक मूरत दिवानी,एक प्रेम दिवानी,एक दरस दिवानी' हेच खरे.
व्वा !
व्वा ! सुरेख !!!
---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !
नाही
नाही आवडली,
मिरेची कडवी यमकाला सोडुन का आहेत? राधेची काही कडवी मात्र छान आहेत.
सुरेख.. अति
सुरेख..
अतिशय तरल कविता.
सावरे की बन्सी पुकारे राधा नाम
लोग करे मीरा को यूही बदनाम..
प्राजु
http://praaju.blogpot.com
धन्यवाद
धन्यवाद जागु, प्रकाश, उमेश , वैशाली, प्राजु, सत्यजित...:)
सत्यजित ... कुठलच कडव यमकाला धरुन लिहिलेल नाही..:) जशी सुचली तशी उतरली कागदावर..अणि माझी प्रोसेस तीच आहे..बरेच जण म्हणतात संस्कार करावेत नंतर मग पण मी नाही करत नंतर त्यात फेरबदल..कारण बर्याचदा आशयाला धक्का पोहोचतो अस माझे स्वःताच प्रामाणिक मत आहे..छंदात सुचली कविता तर अगदी दुग्धशर्करा योगच!..पण हे प्रामणिक कथन असते आपल्या अंतर्मनाचे् कदाचित हा माझ्या कवितांतला दोषही असु शकेल इतरांच्या नजरेतुन..पण माझी मते वेगळी आहेत आणि लिखाणही..:)