मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अजेंडा बदललेला दिसत आहे. मराठी भाषा, परप्रांतीय हटाव हे मुद्दे सोडून बांगलादेशी हटाव, हिंदुत्व हे नवीन मुद्दे घेऊन शिवसेनेला शह देण्यासाठी तयारी चालविली आहे असं दिसतंय.
आपला सतरंजी सारखा झेंडा ( लोक बोलतात हं) गुंडाळून भगवा झेंडा हाती घेणार असं ऐकलं आहे.
काका शरद पवार यांच्या पक्षाचा प्रचार करुन सुध्दा मनसेचं बस्तान बसत नाही हे पाहून देशातील बहुमताने पाठिंबा असणाऱ्या सिएए व एन आर सी या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा विचार मला वाटतोय.
शिवसेनेच्या नेतृत्वानं जी तडजोड केली आणि खऱ्या कार्यकर्त्यांना डावललं ही संधी मानून मनसे पक्ष वाढवायचा प्रयत्न असणार असे दिसते.
राज ठाकरे हे शरद पवारांच्या बरोबर गेले होते, त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर कोणीही शंका घेईल. भाजपनं त्यांना चुकूनही जवळ करु नये असे मला वाटते. कारण राज ठाकरे हा अतिमहत्वाकांक्षी माणूस असून फटकळ भाषणं करुन समाजातील घटकांना दुखावत असतो, खळ खट्याक सारखी कायदा हातात घेणारी वृत्ती भारतीय जनतेच्या पचनी पडू शकत नाही.
मनसे पक्ष किती घोडदौड करतो हे येणाऱ्या काळात कळेलच.
मनसेचा प्रवास
Submitted by राजदीप on 25 January, 2020 - 03:20
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मनसेला परराज्यातील लोक चालत
मनसेला परराज्यातील लोक चालत नाहीत. आता तर caa समर्थन म्हणजे डायरेक्ट परक्या देशातील नागरीक इथे नागरीक म्हणुन मिरवणार हे ते कसे चालवुन घेतात हे बघणे मनोरंजक राहील.
CAA ला तिकडे आसाम विरोध करत
CAA ला तिकडे आसाम विरोध करत आहे आणि इकडे राठा समर्थन करीत आहे याहून मोठा विरोधाभास नाही.
मंद्भक्त जिलबीवाले इकडे फार दिवे लावीत आहेत तेही राज नावाने. हाही एक विरोधाभास म्हणायचं काय?
मटा अग्रलेख - दुकानदार जसं
मटा अग्रलेख - दुकानदार जसं खपतील त्या वस्तू विकायला ठेवतो, बदलतो तसं झालं आहे मनसेचं.
हे वाली सुग्रीव एकत्र राहिले
हे वाली सुग्रीव एकत्र राहिले असते तर जास्त प्रबळ राहिले असते
मटा अग्रलेख - दुकानदार जसं
मटा अग्रलेख - दुकानदार जसं खपतील त्या वस्तू विकायला ठेवतो, बदलतो तसं झालं आहे मनसेचं.
Submitted by Srd on 25 January, 2020 - 05:01
>> हिंदू जनतेच्या भावना एन्कॅश करायचा, तापल्या तव्यावर पोळी भाजून घेण्याचा डाव दिसतोय.
देशातील राजकारण बघता मनसे नी
देशातील राजकारण बघता मनसे नी राजकारण करताना नित्ती मत्ता ,मूल्य पाळावीत ही अपेक्षा व्यक्त करणे म्हणजे रांड बाजारात उभ राहून एक पती वृता पाळण्याची अपेक्षा ठेवण्यासारखे आहे.
इथे कोणताच राजकीय पक्ष प्रामाणिक आणि सौज्वाळ नाही.
महाराष्ट्र टाइम्स ला हे नक्की माहीत असेल इथे सर्वच राजकीय पक्ष बाजार प्रमाणे माल बदलतात.त्याला मनसे अपवाद राहवी असे सांगणे मूर्ख पणाचे लक्षण आहे.
फक्त मला असे वाटत सत्ता नाही मिळाली तरी चालेल पण स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व मनसे नी गमावू नये.
राजेश काय बोलताय तुमचे
राजेश काय बोलताय तुमचे तुम्हाला कळते का? वेश्यांना पाहून सर्व स्त्रियांनी तो कमी श्रमाचा मार्ग निवडायचा का?
इडी मुळे मारली का उडी?
इडी मुळे मारली का उडी?
तुमचे तुम्हाला कळते का?
तुमचे तुम्हाला कळते का? वेश्यांना पाहून सर्व स्त्रियांनी तो कमी श्रमाचा मार्ग निवडायचा का?
ते उदाहरण एक प्रतीक म्हणून घ्या.
भारतातील इतर राजकीय पक्ष सत्तेसाठी रोज भूमिका बदलत आहेत तिथे मनसे नी स्वतः मध्ये थोडा बदल केला म्हणून टीका करायचे कारण नाही.
अस मत मला व्यक्त करायचे आहे.
मोर्चासाठी खास टोपी तयार केली
मोर्चासाठी खास टोपी तयार केली आहे म्हणे. शिवरायांच्या राजमुद्रेचा वापर करून घेतला जातो आहे. राजमुद्रा लोगो म्हणून वापरायचा डाव दिसतोय.
मला असे वाटते की, मनसे ची
मला असे वाटते की, मनसे ची भूमिका भाजप च्या पथ्यावर पडेल. कारण मनसे कडे जिंकून येण्याची ताकद नसली तरी, दुसर्याच्या (भाजपच्या) मदतीने तिसर्याला ( शिवसेना किंवा राष्ट्रवादी) हरवण्याची ताकद नक्कीच आहे!
राज ठाकरे म्हणजे ताटातलं वांग
राज ठाकरे म्हणजे ताटातलं वांग आहेत. कधी गडगडत इकडे तर कधी गडगडत तिकडे.
पैसा मिळाल्याशी मतलब. राज ठाकरेंना सत्ता मिळणे म्हणजे शरद पवार पंतप्रधान (भारताचे) होणे इतकं सोपे आहे