गिर्यारोही अरुण सावंत यांस श्रद्धांजली

Submitted by सुमित बागडी on 21 January, 2020 - 09:21

खरं म्हणजे हि पोस्ट लिहू कि नको लिहू हेच कळत नव्हतं पण शेवटी राहवलं नाही आणि म्हटलं लिहावं. नुकतीच अरुण सावंत यांच्या बद्दल बातमी ऐकली आणि काळजाचा ठोका चुकला. त्यांच्या मृत्यू ने अवघा गिर्यारोही परिवार हळहळला आहे. माझी आणि अरुण सरांची ओळख तशी नाहीच पण एकदा जुन्नर जवळील देवदांडा परिसर फिरताना भेट झाली होती ती पण फक्त अर्ध्या तास साठी. नंतर मात्र त्यांची बातमी कळावी ती पण अशी.
खरंच मन सुन्न आहे, काय करावे काय लिहावे ते सुद्धा सुचत नाही आहे. या सर्व प्रकरणातून गिर्यारोहणासारख्या धाडसी प्रकार बद्दल समाजात काय संदेश गेला असेल असा विचार करून करून वाईट वाटतेय. त्यापेक्षा वाईट आणि जास्त सहानुभूती अरुण सावंत यांच्या कुटुंबियांसाठी वाटत आहे.
जास्त न बोलता सावंत यांच्या आत्म्याला ईश्वर चरणी शांती लाभो हीच इच्छा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मीच या विषयावर धागा काढणार होतो. तज्ञ माबोकर गिर्यारोहक मित्रांनी हा अपघात का घडला असावा यावर मतं मांडावी ही अपेक्षा.

कोणी काय छंद करावा यावर काय मत देणार?
-----
रॉक क्लाइमिंग करणाऱ्या लोकांना नवीन भाग कमीतकमी/अजिबात खिळे न ठोकता चढण्याची इच्छा असते. त्यात धोकादायकपणा वाढतो.

सह्याद्रीची घोरपड असे त्यांना म्हटलं जात होतं. अतिआत्मविश्वास म्हणावा की काय पण फार दुर्दैवी गोष्ट घडली आहे. मला प्रश्न पडला की दरीत कोसळण्याऐवजी दोराला का लटकले नाहीत? सुरक्षा दोर बांधलेलाच नव्हता की काय जाणे?

खिळा( pitton ) बरोबर बसला नसेल तर निघू शकतो. समजा दहा फुट वर चढून खिळा (?) मारला व तो सैल आहे, आणखी वर दोन फुट गेल्यावर हात निसटला तर बारा फुट खाली कोसळणार आणि ? खिळा सुटल्याने २४ फुट खाली येणार. चढणाऱ्याचे वजन ७० किलो धरले तर २४ फुटांच्या एवढ्या हिसक्याने आणखी खालचा खिळाही उचकटला जाऊ शकतो.

अपघाती मरण हे वाईटच
पण मला स्वतःला, आपली अत्यंत आवडती गोष्ट करत असताना आलेले मरण भाग्याचे वाटते.
त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.

माझ्या मते या घटने ची सखोल चौकशी व्हावी. जेणेकरून भावी पिढीला योग्य ती माहिती मिळेल आणि सुरक्षेच्या दृष्टीने जागरूकता वाढेल.

सर्वसाधारण लोकांमधे सुरक्षेच्या बाबतीतली जागरूकता वाढवणे गरजेचे आहे याबाबत दुमत नाहीच पण काही वेळा व्यवस्थित काळजी घेऊनही अपघात होतात.

धोक्याचं म्हणाल तर मुंबईमधला दरवाज्यापाशी उभा राहून करावा लागणारा / केला जाणारा लोकल प्रवास किंवा महाबळेश्वरसारख्या उंचीवरच्या ठिकाणी असलेल्या पॉईंट्सवर मोटारीतून जाऊन डोंगरदर्‍यांत टोकाशी जाऊन सेल्फी काढणे जास्त धोकादायक आहे गिर्यारोहणापेक्षा.

पट्टीचे पोहणारे
बुडून मरतात.
अनुभवी चालक
अपघात मध्येच मरतात.
अनुभवी गिर्यारोहक तेच.
माणसाला अती आत्म् विश्वास विनाश कडे घेवून जातो.