Company secretary cha course la age 25 nantar admission gheu shakto ka

Submitted by Anny on 21 January, 2020 - 06:41

Maaz age 27 years aahe mala company secretary course krnyachi khup ichha hoti pan kahi personal problems mule mala after graduation job karava lagla. Tar mala aata parat ekada haa course la admission genyachi ichha aahe .pan aata jar mi ha course ghetla tar mala tar mala ya field madhe job milel ka .Karan mi aatach 27 years old aahe aani ha course purn Kare paryant mi kadachit 29 -30 chi asen tar mala after 30 ya field madhe job milel ka ki maaz age jast zaal tar mala job nahi milnar
Plz mala maybolikarani yawar margdarshan karawe.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कोर्सला वयाची काही अट नाही. अवश्य घ्या इच्छा असेल तर. जॉब किंवा स्वतःचे दुकान असे दोन्ही पर्याय आहेत. गेली 10 एक वर्षे निकाल पण दणकून लागत आहे. काठिण्यपातळी बरीच कमी झाली आहे. एखाद्या दुकानवाल्या सी एस कडे आर्टिकल करा ऍडमिशन घेतली की लगेच. प्रॅक्टिकल ज्ञान हवेच. कायद्याच्या मूळ संकल्पना नीट समजून घ्या, काही अवघड जाणार नाही. लॉ केले असेल तर कोर्स अजून सोप्पा जाईल. तुम्हाला खूप शुभेच्छा.

लंपन यांना अनुमोदन....वयाचा विचार डोक्यातुन काढुन टाका..जिद्द आणि आवड असेल तर यात अशक्य काहीच नाही..
पन्नाशीतही सी. ए. पास केलेल्याची उदाहरणे आहेत.

मी स्वतः सी एस आहे आणि तुम्हाला खात्रीने सांगू शकते की या वयातही सीएस करून तुम्ही यशस्वी होऊ शकता. काही माहिती / मार्गदर्शन हवे असल्यास बिनधास्त विचारा.

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!

Thank you everyone,
Piyu 2mhi mala sangu sakta ka jar mi aata CS kel tar mala cs cha job miltana as a fresher kahi problem hoil ka Karan aatach mi 27 years chi aahe aani cs complete Kare paryant mi 29-30 years chi hoil tar age mule kahi problem yeil la.
Karan mi sadhya weglya field madhe aahe

Thank you everyone,
Piyu 2mhi mala sangu sakta ka jar mi aata CS kel tar mala cs cha job miltana as a fresher kahi problem hoil ka Karan aatach mi 27 years chi aahe aani cs complete Kare paryant mi 29-30 years chi hoil tar age mule kahi problem yeil la.
Karan mi sadhya weglya field madhe aahe

हाय Anny
तुम्हाला फ्रेशर म्हणुन नोकरी मिळवण्यात वयाचा अडसर येणार नाही.
वर सगळ्यांनी सांगितल्या प्रमाने सी एसला वयाची काहीच अट नाही, आमच्यावेळी डिग्रीला ५०% असावे लागत अशी काहीतरी अट होती. आता आहे की नाही आठवत नाही.
पुण्यात असाल तर सी एस ईन्स्टि वाले अतिशय मदत करतात, नुसत्या फोनवर पण माहिती सांगतील.
अनेक शुभेच्छा !!

आजच बातमी आहे सकाळला . सी एस फाउंडेशनचा निकाल 67% लागलाय. हे कैच्याकै आहे. पुढच्या लेव्हलचा पण इतका निकाल लागत असेल हल्ली तर कठीण आहे. तुम्ही सध्याची मेम्बरशीप संख्यापण एकदा चेक करा. होप ती लाखाच्या खाली असेल. प्रोफेशनल कोर्सचा असा निकाल लागणे चिंताजनक आहे.

धीरज इकडे पिंचिमध्ये अवघड आहे. गावात/ पेठेत नक्कीच असतील. आमच्यावेळी बेहेरे / गणपुले फेमस होते. बेहेरे तर बंद झालाय. ते एक कुणीतरी सुधीर कुलकर्णी फेमस झालेत क्लासेससाठी. पुणे चाप्टरचे पण असतील नक्कीच ते पण विचारा. कोणत्या लेव्हल साठी बघत आहात? आणखी विचारून सांगेन म्हणजे.

धन्यवाद लंपन.
कोणत्या लेव्हल साठी बघत आहात? आणखी विचारून सांगेन म्हणजे.>> शेवटचे वर्ष म्हणजे एक्सिकटीव्ह (शब्द लिहिता येत नाहीये) लेव्हल साठी पाहत आहे.

अहो executive शेवटची level नाहीये. ती 2nd level आहे. Professional= 3rd= last level आहे>> सॉरी मला प्रोफेशनलच म्हणायचे होते.
बायकोने ५ वर्षा आधी execcutive कंप्लिट केले आहे त्या नंतर काही कारणामुळे प्रोफेशनल करायचे राहून गेले आता परत विचार करत आहे ती अभ्यास सुरु करून तिसरी शेवटची लेवल पूर्ण करायचा म्हणून विचारात आहे.

धीरज अजून एक ace ह्या क्लासबद्दल समजले. पेठेत आहे बहुदा. 2013 साली कम्पनी कायदा बदलला आहे. तेंव्हा कुठेतरी अर्धवेळ आर्टिकल पण करायला सांगा . जेवढं जास्त practical कराल तेवढे पेपर सोपे जातील. आणि एवढी गॅप असेल तर नक्कीच करायला सांगा आर्टिकल, नवनवीन येत असते रोज काहीतरी.. ग्रुप असेल की अभ्यासाला पण मदत होते.

ह्या कोर्सची नीट सोप्या शब्दात माही ती देणारी लिंक आहे का? इथेच कुणीतरी दीली तरी बरे होइल. मराठीत पेपर देता येतो का? कॉमर्स नसेल तर झेपेल का? इत्यादी

Commerce nasle tari kahi farak padnar nahi,pan aatach kahi diwsanpurvi new changes zaale aahe ,tyanusar cs foundation aata band zaali aahe aani jyana konala cs la admission ghyaychi asel tyanna CSEET navachi entrance exam dyavi lagnar aahe agadi graduation zalyavar dekhil hi entrance dyavi lagnar aahe.

Ho aani Marathi madhe nahi pan Hindi madhun paper deta yeto pan tycha kahi upyog honar nahi,shakya aslyas papers English medium madhunach dyave.