Office madhe sahakari tumachya virudhha politics karat asatil tar Kay karave?

Submitted by अस्मि_ता on 21 January, 2020 - 05:27

Mala Navin company join karun 6 months zale ahet. Join zalyavarach mazi sahkari mazya var bossing karat ahe. Mhanaje he asa Kar, he ka Kel nahi, te asach ka Kel etc. Amacha boss foreigner ahe. To ethe nasato. Tila kahi vicharal tar asa vagate ki me kahi Navin chukach keli ahe. Kahi neat sangat nahi. Chuka zalya ki oradate. Khar tar amachya doghincho post same ahe. Mazi tichyaprksha jara jastacg ahe. Mala khup tras hoto. Ti tya manager che kan bharate mazya virudhha Ani tichya maitrininna pan sangate ki hi sencerly kam karat nahi mhanun. Khup tras hotoy hya saglyacha. Kay karu kahi kalat nahiy. Kay karu please guide me.

Group content visibility: 
Use group defaults

Interesting topic. >> +१११११

माझ्याकडेही खुप सारे आहे लिहीण्यासारखे, पण सध्या वेळ नाही.

बघु जमले तर लिहीन

नवीन नोकरी असेल तेव्हा पाहिले काम सर्व सहकारी लोकांचा पूर्ण अंदाज घेणे .
त्यांची कमजोरी शोधून काढणे,त्यांचे एक मेकशी कसे संबंध आहेत त्याचा अंदाज घेणे.
बॉस च्या कमजोरी वर लक्ष ठेवणे.
ह्या सर्व बाबीला ६ महिने तरी जातील.
तो पर्यंत सर्व अपमान सहन करणे आणि सर्वांच्या नाड्या माहीत पडल्या की रण नीती ठरवून ह्यांच्या डोक्यावर बसणे.

सगळ्यात आधी, ऑफिस पॉलिटिक्स किती वाईट, सगळीकडे हेच कसं चालूये, आपण मराठी माणसं कसे पॉलिटिक्समुळे मागे पडतो हे न लिहिता या सिच्युएशनला कस हॅन्डल करता येईल हे लिहितो.
१. एकतर तुम्ही दोन्ही सारख्याच पोजीशनला आहात. तर तुमच्या दोघींच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि अथॉरिटीज सुद्धा सेम आहेत हे ध्यानात घ्या. यावेळी आयडीयली कुणीही कुणावर बॉसिंग करू शकत नाही.
२. खमकेपणा ठेवा, उद्धटपणा नको. 'तुने ये काम क्यू नही किया म्हटल्यावर', 'आय हॅव अदर इम्पॉर्टन्ट प्रायॉरिटीज' हे सुनावण्याची तयारी ठेवा, आणि ते बॉसला पटवून देण्याचीही.
३. तिला जर मॅडम म्हणून आदरार्थी संबोधत असाल तर आधी 'आप' आणि त्यानंतर 'तुमने' वर या. रिस्पेक्ट दोनो साईड से होती हे.
४. तिला काही इम्पॉर्टन्ट मेल टाकताना कायम बॉसला सीसी मध्ये ठेवा. तिच्यावाचून काही अडत असल्यास ते मेलवर टाका, पण बॉस सीसी मध्ये ठेवा.
५. कधी जमलं ना, तर मस्तपैकी झापा. कुठलंही कारण काढून. ऑफिस मध्ये तुमच्या काम करण्याच्या क्षमतेपेक्षा तुमच्या उपद्रव क्षमतेला जास्त किंमत असते.
६. तिच्या कामात चुका काढत चला. रीवर्कचा लोड वाढवा. तिने सांगितलं ना, कि 'अरे चलता है इतना,' तर हाच धागा पकडून पुढच्या वेळी तिने चुका सांगितल्यावर 'तब तो चल रहा था?' असं सुनवा.
७. तुला एवढं सुद्धा माहिती नाही म्हटल्यावर हो, मला अय कामातलं सगळं माहितीये, पण एवढंच माहिती नाही हे ऐकवा.
८. तिच्याच ग्रुपच्या एखाद्या पंटर, पंटरीशी मैत्री वाढवा. ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह होता येईल का बघा. तिला अनइजी होईल आणि हा, ही त्याला सांगेन या भीतीने गॉसिपिंग कमी होईल.
९. तिने बॉसला चुकीची माहिती दिल्यास थांबा तिला बोलावूनच बघू, असं म्हणत बॉससमोर तिला खोटारडी पाडा. याने एकतर कान भरणं बंद होईल, नाहीतर बॉस तिच्या फेवर मध्ये असला तरी तिला अनड्यू फायदा देणं थोडं कमी करेल.
१०. कमीत कमी चुका करा. कॉन्सन्ट्रेट ऑन युवर वर्क. ती आलीच तर 'आता बीजी आहे,' हे उत्तर द्याच.

इति श्री दशावतारी ऑफिसपॉलिटिक्सकोपनिवारनं सूत्र संपुर्णम!!!!!

लोकांचे ऑफिसमधले वागणे हे न समजणारे कोडे आहे.
काही काही वेळेला समोरची व्यक्ती मूर्ख आहे हे एकच लॉजिकल उत्तर असते.
ऑफिसमधला (माझ्या हाताखालचाच) स्टाफ एकमेकांवर कसं बुलिंग करतो हे मी गेली काही वर्षं पाहते आहे.
ते कंट्रोल करायचा कसोशीने प्रयत्न करूनही ते संपूर्णपणे कंट्रोल होत नाही.

यावर काय करायचे हे दुर्दैवाने तुमचा बॉस कसा/कशी आहे त्यावर अवलंबून आहे.
बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीच्या नाकी नऊ आणायला अशा टॅक्टीक्स वापरल्या जातात.
कामात चुका काढणे, नीट सूचना न देणे, जे काम करायचे आहे त्यातले अर्धेच सांगणे आणि उरलेले शेवटी किंवा बॉसला चुगली करून झाल्यावर सांगणे, या आणि अशा अनेक अतिसूक्ष्म पण एकत्र आल्यावर मोठ्या होणाऱ्या खेळ्या खेळलेल्या मी पाहिल्या आहेत. यात बॉस म्हणून हे वर्तन कमी करण्याबरोबरच हातातले काम पुरे करणे या दोन्हीमध्ये मॅनेजरची सुद्धा ओढाताण होते. पण दादागिरी आणि बुलिंग करणाऱ्या सगळ्यांनाच काढून टाकण्याची मुभा नसते. कारण कधी कधी एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून अख्खा ग्रुप बुलिंग करतो.

तसेच, बुली होत असणारी व्यक्ती पुन्हा पुन्हा तक्रार घेऊन बॉसकडे गेली तर तिच्याबद्दलसुद्धा रडूबाई/तक्रार करणारी वगैरे मत मॅनेजमेंटचे होऊ शकते (जे शहानिशा केल्यावरच ठरवले पाहिजे).
काही कंपन्यांमध्ये बॉसचे काही खास असतात. आणि हे खासपद मिळवण्यासाठी इतरांची चढाओढ असते.
तुमच्या बॉसचे असे आहे का?
तुमचा मॅनेजर तुमचे म्हणणे ऐकून घेणारा आहे का?
त्याच्याबरोबर समोरासमोर आणि कॉन्फिडेन्शियल मिटिंग तुम्ही ठरवू शकता का? आणि ती कॉन्फिडेन्शियल राहील याची तुम्हाला खात्री आहे का?

तुमच्या ऑफिसमध्ये ईमेलवर कामे सांगितली जातात की तोंडी? ईमेलवर असल्यास तुम्ही तुम्हाला दिलेल्या अर्धवट सूचनांचे काही नमुने त्यांना दाखवू शकता.
तुमच्या ऑफिसमध्ये सोशलमीडिया बुलिंग होते का?
बऱ्याच ठिकाणी एम्प्लॉयी आपले आपले ग्रुप बनवतात. आणि या ग्रुप्स मधून सर्रास बुलिंग चालते. ते कसे?
१. व्हाट्सअपवर "स्टेस्टस" मध्ये काहीतरी टोमणेवजा पॅसिव्ह अग्रेसिव्ह स्टेटस ठेवणे जे एखाद्या व्यक्तीला टार्गेटेड आहे
२. एखाद्या ग्रुपमधून व्यक्तीला काढून टाकणे किंवा तिला सोडून दुसरा ग्रुप बनवून तिथे तिच्याबद्दल बोलणे
३. व्यक्तीच्या पर्सनल आयुष्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल गॉसिप करणे (आमच्या ऑफिसमध्ये एका मुलीचा ती ऑफिस नंतर मित्राबरोबर फिरत असतानाचा फोटो ती नसलेल्या ग्रुपमध्ये फिरवला होता)
४. भांडण करून ब्लॉक करणे (किंवा ऑफिसमधली प्रेमप्रकरणे हाताबाहेर जाऊन ब्लॉक करणे)
सोशल मीडियावरच्या गोष्टी मनावर काय घ्यायच्या? असे कितीही म्हंटले तरी कर्मचारी हे सगळे ग्रुप फार सिरियसली घेतात. आणि पूर्वी ६ वाजता पॉलिटिक्स थांबून दुसऱ्या दिवशी ९ पर्यंत थोडी उसंत मिळायची. हल्ली सोशल मीडियामुळे लोक ऑफिसमधले पॉलिटिक्स घरी घेऊन जातात.

हे सगळे आम्ही पाहिले आहे. पण असं बुली होणारं कुणी मला अप्रोच झालं तर मी त्याची व्यवस्थित शहानिशा करते. अर्थात माझ्या हातून किती मदत होते हे त्या व्यक्तीलाच विचारावे लागेल. पण गेल्या ३ वर्षांत अनेकवेळा सरळ किंवा आडमार्गाने मी हे असे बुलिंग थांबवायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

तुमचा मॅनेजर अप्रोचेबल असेल तर त्याच्याशी बोलून पहा. (पण त्याचा किती फायदा होणार हे तुमच्या ऑफिसमधल्या वातावरणावर अवलंबून आहे)
पॅसिव्ह अग्रेसिव्ह लोक तुम्ही कितीही सरळ मार्गाने काम करायचा प्रयत्न केलात तरी तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाहीत. काही काही लोकांची ऑफिसला येण्याची प्रेरणाच एखाद्याला त्रास द्यायची असते. आणि या वृत्तीचे झुंडशाहीत रूपांतर व्हायला वेळ लागत नाही.

तुम्हाला चार आघाड्यांवर लढायच आहे.
१. तुम्ही स्वतः. तुमच काम अचूक कस करता येइल व दिवसेंदिवस चुका कशा कमी होतील याकडे लक्ष द्या. एक नेहमी होणार्‍या चुकाम्साठी ट्रॅकर ठेवा.
२. बॉस : हा एक महत्वाचा घटक. तुमच काम अचूक आणि वेळेवर होत असल्यास कान भरून काही उपयोग होणार नाही याची खात्री बाळगा. बॉसेसना उपद्रवी नाही तर काम करणारी मानसे पाहिजे असतात याची खात्री बाळगा.
३. सहकारी : तिच वागण दुर्लक्षित करा. तुम्हाला काही फरक पडत नाही असे कळल्यावर आपोआप सुधारेल. तरी सुद्धा सुधारणा झाली नाही तर तिला काय चालणार नाही याची स्पष्ट शब्दात किंवा कृतीतून जाणीव करून द्या. तुम्ही स्वतः चुकुनही ती वागते म्हणून चुकीच वागू नका.

४. तुमची सहकारी खरच तुमच्याशी अस वागते की तुम्हाला तस वाटत याचा विचार करा. पण दोन्ही बाबतीत वरील वर्तणूक उपयोगी पडेल.

>>२. बॉस : हा एक महत्वाचा घटक. तुमच काम अचूक आणि वेळेवर होत असल्यास कान भरून काही उपयोग होणार नाही याची खात्री बाळगा. बॉसेसना उपद्रवी नाही तर काम करणारी मानसे पाहिजे असतात याची खात्री बाळगा.

बॉस आणि मॅनेजर यात फरक आहे असं मला वाटतं. अनेक ठिकाणी मिडल मॅनेजमेंट चवीने अशा बुलिंगमध्ये भाग घेताना दिसते. कारण त्यांना कंपनीच्या नफ्याशी काही घेणेदेणे नसते. त्यामुळे कधी कधी मिडल मॅनेजमेंट स्किप करून ज्या व्यक्तीला खरंच कंपनीच्या कामाची काळजी आहे अशा व्यक्तीला अप्रोच करावे.

जी माणसं वर्षानुवर्षे एकाच जागेवर काम करत असतात ते त्या पोझिशनला सेट झालेले असतात. कोणी नवखा माणूस त्यांच्यासोबत काम करायला लागला की ते त्या माणसाला त्रास कसा होईल हेच बघतात याला अनेक कारणं आहेत. नवीन माणूस आपल्यापेक्षा सुपिरिअर निघाला तर आपले सुखात जात असलेले दिवस धोक्यात येतील. पुढे जाऊन आपल्याला त्याच्या हाताखाली काम करायला लागून इगो दुखावले. बॉसची मर्जी त्याच्यावर गेली तर आपली इन्क्रीमेंट कमी होईल. वेळ आली तर जॉब जाईल. जॉब गेला तर दुसरी कंपनी कशी मिळेल तिथे कधी सेटल होऊ अशी कितीतरी कारणं देता येतील. तर तुम्ही जर का त्या बाईंच्या विरोधात गेलात तर सध्यातरी असं दिसतंय की तुम्हीच गोत्यात याल. कारण बॉस त्या बाईंचीच जास्त बाजू घेईल. बॉसला शेवटी काम झाल्याशी मतलब आहे. कोण बरोबर आहे कोण चूक आहे याचा निवडा करायला तो गावचा सरपंच नाही हे लक्षात घ्या. तर सध्या तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. चुका करू नका. जे काम करताय ते वेगळ्या पद्धतीने करून त्यात सुधारणा/नाविन्य आणा. तुम्ही केल्यास डेव्हलपमेंटबाबत बॉससोबत बोला. आपली उपयुक्तता दाखवून द्या. हळूहळू वट वाढली की होईल सगळं व्यवस्थित. गेल्या गेल्या सगळं मनासारखं होत नाही थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो.

Kamat khup chuka hot ahet. Laksh kas kendrit karata yeil
Submitted by अस्मि_ता on 20 December, 2019 - 12:17 >> हा तुमचाच लेख आहे ना?

तुम्ही कंपनीत नव्याच आहात आणि ज्या प्रकारचा अनुभव मिळतोय ते वाचून त्यावरून सध्या माझ्या हाताखाली काम करणाऱ्या एका मुलीची आठवण झाली. अर्थात तुमची केस तिच्यासारखीच आहे असे म्हणत नाहीय हे लक्षात घ्या, नाहीतर रागवाल. Happy Happy

ही मुलगी ओळखीने कंपनीत चिकटली व आमच्या टीममध्ये आली. सुरवातीला दुसऱ्या लीड्ससोबत काम करत होती, त्यांच्यासोबत फाटले म्हणून बॉसने हिला माझ्या गळ्यात टाकले. हिने मला अमुक तमुक वर्षे इतका अनुभव आहे म्हणून जाहीर केले होते. (इंटरव्यू घेणाऱ्यांनी काय चेक केले त्यांनाच ठाऊक, मी तर फेल केले असते). त्या अनुषंगाने मी काम देत गेले. ते कसे करायचे हे ती अजिबात विचारायची नाही. तिचा अनुभव पाहता विचारायची फारशी गरजही नव्हती. पण तरी ती सगळे प्रचंड वाईट बिघडवून ठेवायची. शेवटी मी वैतागून sap तला स तरी माहीत आहे का म्हणून विचारल्यावर तिने तिचा अपमान झाला असे घोषित करून तक्रार केली. त्यानंतर तुम्ही जे काही लिहिले आहे अगदी तशाच प्रकारच्या तक्रारी तिच्या माझ्याबद्दल करून झाल्या, सगळ्यांना मी किती वाईट आहे हे सांगून झाले.

पण हळूहळू तिचे पितळ उघडे पडत गेले. यथावकाश तिचे (अ)ज्ञान किती आहे हे सगळ्यांना कळून चुकले. तिनेही शेवटी तिला किती विषयज्ञान आहे हे मान्य केले. बॉसबरोबर खटके उडल्यावर मी लवकरच सोडून जाणार आहे हेही जाहीर करून झाले. हल्लीच आमची एचआर मला भेटली तेव्हा तिने हसत हसत 'ती कशी आहे, कधी सोडून जातेय' म्हणून चौकशी केली. तिला जमेल इतपत सोपे सोपे काम मी देते. ती स्वतःहून आजही काही विचारत नाही, काम एकदाचे नीट पार पडावे म्हणून मलाच झक मारत तिला चारचारदा समजावून सांगावे लागते. मी वैतागले की ती परत इतरांना माझ्याबद्दल सांगत सुटते. मी मनावर घेत नाही.
काम जमत नाही याचा अपरेजलवर परिणाम होणार असे तिला बॉसने म्हटल्यावर तिने तुम्ही चांगले अपरेझल देणार नाहीच हे मला माहित आहे असे त्याला सांगितले. नंतर एकदा दोघांचे काहीतरी वाजल्यावर ती मला विक्तिमाईझ करताय, हरासमेंट करताय वगैरे बोलली त्यानंतर त्याने घाबरून तिच्याशी बोलणेच बंद केले.. एचआरपण सांगून ठेवले ही असे बोलते म्हणून Happy Happy

तुम्ही अशा आहात असे अजिबात सुचवायचे नाही. पण अशी दुसरी बाजूही असू शकते. तुम्ही तुमच्या बाजूने बेस्ट आहात पण जी त्रास देतेय तिचीही काहीतरी बाजू असणार. तिचा इतरांना अनुभव कसा आहे यावरून तुम्हाला अंदाज करता येईल.

सर्वांचेच छान प्रतिसाद आले आहेत,
मी काही यातला तज्ञ नाही पण स्वानुभावाने माझे ऑफिसात वावरण्याचे फंडे सांगू शकतो.

१) नवीन ठिकाणी जॉईन होताना तिथे जे काम मला जमते ते मी उत्साहात करतो. पण त्याचवेळी जे जमत नाही ते प्रामाणिकपणे कबूल करतो. सुरुवातीला सारे माफ असते.

२) ऑफिसमध्ये मी कोणाला माझा शत्रू समजत नाही. भले कोणी मला आपला का समजत असेना. त्यामुळे एक फायदा होतो की मन:शांती कायम राहते.

३) फार कमी लोकं असतात ज्यांच्या रक्तातच राजकारण भिनलेले असते. बहुतांश लोकं एवढ्यासाठीच पॉलिटीक्स करतात की आपण नाही केले तर समोरचा ते करून आपल्याला मागे टाकेन. जेव्हा त्या लोकांना विश्वास येतो की मी कोणाच्या अध्यात मध्यात नसणारा आहे तर ते माझ्याशी पॉलिटीक्स खेळत नाहीत.

४) ऑफिसमध्ये मी माझे काम मन लाऊन करतो. काम टाळून कामाची जबाबदारी झटकून कधी पळत नाही. पण त्याचवेळी ऑफिसवेळेनंतर रोज उशीरापर्यंत थांबून वा शनिवारी सुट्टीच्या दिवशी येऊन काम करत नाही. आमच्याकडे हे कल्चर फार आहे. मी मात्र पहिल्यापसूनच माझा स्टॅण्ड कायम ठेवला आहे. या सर्वात माझा ॲटीट्यूड असा असतो की मला कामाची जितकी गरज आहे तितकीच ऑफिसला माझी गरज आहे. कंपनी सुद्धा ओके असते अश्या ॲटीट्यूडशी.

५) जे मला येते जमते ते मी सर्वांना आनंदाने शिकवतो. आपले नॉलेज शेअर करतो. समोरचा सुद्धा हेच करतो की नाही याने मला काही फरक पडत नाही.

६) ऑफिसमध्ये कोण कोणाचा लाडका आहे वा कोणाचा चमचा आहे, कोणाचा पगार किती आहे व तो त्या लायकीचा आहे की नाही वगैरे बाबींचा मी विचार करत नाही. त्याने ॲक्चुअली आपल्या आयुष्यावर काही फरक पडत नाही.

सल्ला एकच - ऑफिसमध्ये आपण दिवसातले आठ तास घालवतो म्हणून त्याला आपली लाईफ समजू नये. ते लाईफ सुखाने जगायचे साधन असते. ते आपण कधीही संधी मिळताच बदलू शकतो.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑफिसमध्ये आपल्याला पगार जबाबदारी घ्यायचा मिळतो. स्ट्रेस घ्यायचा नाही. तो फार विचार करून आपला आपणच घेतो. सो जस्ट चिल Happy

कंपनीत नवीन आहात जर निदान सुरुवातीला तरी थोडेफार जुळवून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सहकाऱ्याचा त्रास कमी होईल. शक्य असेल तर जसे जमेल तसे तुमच्या सहकाऱ्याशी थोडी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करा. तिला २-३ वेळा दुपारच्या कॉफी साठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक साठी विचारा. फारश्या संवेदनशील नसलेल्या पर्सनल गोष्टी तिच्याबरोबर शेअर करा आणि तिचा सल्ला मागा (अगदी गरज नसली तरीही) आणि तिच्याबद्दल पण थोडं विचारा. जमल्यास बॉस समोर तिच्या उपस्थितीत तिच्या थोड्याफार सहकार्याबद्दल (फारशी करत नसली तरी जेवढे करते तेवढे) धन्यवाद बोला. मध्ये मध्ये तिला कॉम्प्लिमेंट्स द्या जसे की सहजपणे ड्रेस छान आहे, आज छान दिसत आहेस, कानातले, गळ्यातले, सँडल्स, किंवा इतर नवीन काही घेतलेली वस्तू तुला शोभून दिसत आहे वगैरे(नसली तरी). तिच्या ग्रुप मध्ये जाण्याचा प्रयत्न करा, लंच एकत्र करा. ऑफिसमध्ये बऱ्याचदा लंच च्या वेळेला सुद्धा ऑफिस, प्रोजेक्ट याच्याच चर्चा जास्त असतात अशा वेळी विषयानुरूप तिच्या एखाद्या छोट्या मदतीचा उल्लेख देखील करा. बाकीच्या सर्व गोष्टी सांभाळून अगदीच शक्य असेल तर एखादा दिवस डिनर साठी विचारा, किंवा तुमच्या आवडीनिवडी जुळत असतील (उदा ट्रेक, सायकलिंग, मुव्ही, शॉपिंग) तर तसा एखादा प्लॅन करा.
थोडक्यात तिच्याबरोबर थोडेफार कम्फर्टेबल व्हायचा आणि तुमच्यातली दरी मिटवण्याचा प्रयत्न करा. अर्थात स्वतः पुढाकार घेऊन जे कराल ते तुमची स्वतःची डिग्निटी सांभाळूनच करा म्हणजे तिने तुम्हाला मदत करावी यासाठी हे सर्व करत आहोत असे वाटू न देता नैसर्गिकरित्या होऊ द्या. अनेकदा नवीन कंपनीत आपण स्वतःच्या कोशात असलो की सहकार्यांना आपण कसे आहोत याचा अंदाज येत नाही मग ते बुली होतात. नवीन एम्प्लॉयीमुळे जुन्या लोकांना असुरक्षित वाटणं साहजिक आहे पण स्वतःहून मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केल्यास फरक पडतो. तुम्ही मैत्रीपूर्ण स्वभावाचे आहात आणि पॉलिटिक्स मध्ये तुम्हाला रस नाही हे दाखवा (असला तरी सध्या तरी व्यवस्थित सेटल होईपर्यंत तो प्लॅन बाजूला ठेवा). नवीन कंपनी, नवीन काम, बाकी सहकाऱ्यांचे एकमेकांशी, बॉस शी संबंध याचा सुरुवातीला अंदाज येईलच असे नाही तेंव्हा सुरुवातीपासून वाकड्यात जाण्याऐवजी मैत्रीण होण्याचा प्रयत्न करून पहा.
हे सर्व करूनही जर तिच्यात काहीच बदल झाला नाही तर मग काट्याने काटा काढण्याचा विचार करा. परंतु युद्ध हा नेहमी अंतिम पर्याय ठेवावा कारण त्यात नुकसान दोन्ही बाजूचे होते (खास करून ऑफिसमधल्या युद्धात मानसिक).

त्यांना काय पॉलिटिक्स करायचे असेल ते खुशाल करु द्यावे. तिकडे आजिबात लक्ष देऊ नये. तुमच्यावर केलेल्या पॉलिटिक्सचा तुमच्या मनस्थितिवर आजिबात परिणाम होत नाहे हे पाहिल्यावर त्यांची खुमखुमी जिरेल आणि ते तुम्हाला सोडुन नवीन बकरा मिळतो का ते बघण्यासाठी फोकस चेंज करतील.

दुसऱ्या लोकांनी मारलेले टोमणे ऐकून जे व्यथित होतात व जाब विचारायला, भांडायला जातात त्यांना पाहून टोमणे मारणारांना अजून चेव येतो. दुर्लक्ष करणं हाच उपाय. आपल्या मनस्थितीवर, आनंदावर बिलकुल परिणाम न होऊ देणे जमलं पाहिजे.

सई आणि ऋन्मेषच्या पोस्ट मस्त.
मी पण ऋ सारखाच अ‍ॅटीट्युड ठेवते ऑफिसात.
<<<< ऑफिसमध्ये आपण दिवसातले आठ तास घालवतो म्हणून त्याला आपली लाईफ समजू नये. ते लाईफ सुखाने जगायचे साधन असते. ते आपण कधीही संधी मिळताच बदलू शकतो.>>>>> +१००

Kamat khup chuka hot ahet. Laksh kas kendrit karata yeil
Submitted by अस्मि_ता on 20 December, 2019 - 12:17 >> हा तुमचाच लेख आहे ना? >> Ho. Ha mazach lekh ahe. Mazya kamat chuka hot ahet he kharay. Hya asha environment madhe me concentrate karu shakat nahiy kama var.. ti muddam mazya chuka highlight karatey. Ani he sagal boss la sangtey hyacha khup tras hotoy. Mala kadhi kadhi bhiti vatate ki mazi nokri jail.

चुकांमधूनच तर आपण शिकतो आणि नंतर त्या चुका परत होणार नाही अशी काळजी घेतो. चुकांना सकारात्मक घ्या. तुमच्या सहाकारीची तक्रार करू नका. गोडी गुलाबीने सर्व काम शिकून घ्या. तुमचे कामच तुमच्याबद्दल बोलेल. तुमच्याकडे अशा काही स्किल्स असतील त्या तुमच्या सहकारीकडे नसतील. योग्य संधीची वाट बघा. जर ती तुमच्या चुका हायलाईट करत असेल तर तुम्हीही तुमच्या कामातून तुमच्याकडे असलेले स्पेशल स्किल्स तुमच्या बॉसला दाखवून द्या. तुमच्या टीमशी संलग्न असलेल्या टीमबरोबर रॅपो वाढवा. एकदा दुसऱ्या टीमकडून अप्रेसिएशन सुरु झाले कि तुम्हाला तुमच्या बॉसला काहीही सांगावे लागणार नाही आणि बॉस स्वतःच तुमच्या सहकारीकडे दुर्लक्ष करेल.

यावरून मला माझ्या पी.एचडी मधला एक प्रसंग आठवला.
माझी स्कॉलरशिप संपली होती आणि ती एक्सटेन्ड होत नव्हती. त्यामुळे मला थिसीस लिहिता लिहिता घराचे भाडे आणि राहण्याचा खर्च वगैरे करण्यासाठी नोकरी हवी होती. तेव्हा माझ्या गाईडच्या मदतीनं मला एका लॅबमध्ये लॅब असिस्टंटची नोकरी मिळाली. पण युनिव्हर्सिटीमध्ये ३ वर्षं वेगळे वेगळे पार्टटाइम जॉब्स केल्यामुळे माझा डेली वेजेसचा दर वाढला होता. ते माझ्या मॅनेजरच्या लक्षात आले (म्हणजे त्याने ते भोचकपणे शोधून काढले). त्यानंतर साधारण १ आठवडा तो मला रोज फक्त लॅबमधले ग्लासवेअर धुवायला लावायचा. सकाळी गेल्या गेल्या एक मोठा टब आणि पुन्हा २ वाजता तेवढाच. पण मला दुसरे काही ऑप्शन नव्हते आणि अगदी सर्व्हायव्हलचा प्रश्न होता म्हणून मी काही न बोलता ते करायचे (त्यातही तो प्रत्येक टेस्ट्युब उन्हात वगैरे धरून बघायचा).

मग अचानक एक दिवस त्याच्या बॉसने (म्हणजेच माझ्या पीएचडी गाईडने) मला बोलावले. आणि मला एक प्रयोग दिला. उद्यापासून तुला मॅनेजर जे काम देतोय ते न करता ३ दिवस हे कर असं सांगितलं. त्याने दिलेल्या मेथड प्रमाणे मी सगळे काम केले. आणि त्याच्या पुढच्या सोमवारी अचानक माझा मॅनेजर एकदम खाली आला होता. आणि मला व्यवस्थित इंस्ट्रुमेंटेशन वगैरे देऊ लागला.
नंतर लक्षात आले की त्याने माझा तो तासाचा दर आणि मी फक्त भांडीच घासते आहे असं सांगून मला काढून टाकायचे सजेशन माझ्या गाईडला दिले होते. त्यामुळे त्याने मला मॅनेजरनी आधी केलेले काम परत करायला लावले होते आणि ते सगळे बरोबर आले होते. त्यामुळे मला मिळणारा पगार कमी करण्यापेक्षा किंवा काढून टाकण्यापेक्षा, मला त्या पगाराच्या लायकीचे काम द्यायला त्याने सांगितले होते.

असा बॉस आणि गाईड मला मिळाला याबद्दल आजही फार आनंद होतो. त्यावेळी माझी नोकरी गेली असती तर खूप त्रास झाला असता मला.

सही पोस्ट ऋन्मेष.
राजकारण करणारे शेवटी स्वतः जळफळून गप्प बसतात. ऑफिसमध्ये कुठल्याही गॉसिपमध्ये सामील व्हायचं नाही, वेगवेगळ्या टोळ्या असतील तर आपल्याला कुठल्याही टोळीचे न होता केव्हाही कुठल्याही टोळीशी हवा तेव्हा संवाद साधता आला पाहिजे.

वरती चांगले सल्ले दिलेच आहेत अनेकांनी. माझ्याकडून दोन-तीनच मुद्दे जे मला महत्वाचे वाटतात ते मांडतो आहे:

१. कंपनीतले सुरवातीचे काही दिवस कठीण असतात प्रत्येकासाठी. काही झाले तरी सजग व कार्यक्षम राहा. स्वत:ला सिद्ध करून दाखवायचा कालावधी असतो.

२. बॉसशी संबंध चांगले ठेवा. बाकी कोणी काही करो. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. वेळेचे व्यवस्थापन आणि कामाची इफिशीयंसी महत्वाची. तुमच्यामुळे कंपनीला कसा फायदा होईल (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष) इतकेच पहा. आणि मुख्य म्हणजे तुम्ही करत असलेल्या कामाची ट्रान्स्परंसी बॉसला कशी असेल हे पहा. इमेल द्वारे डेली अपडेट्स वगैरे सुरु करा. इतर कोणाचा / कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल व कामावर परिणाम होत असेल तर ते योग्य वेळी बॉसला कळवा. (बहुतेक एमेनसी कंपनीमध्ये नवीन जॉईन झालेल्या कर्मचाऱ्याचा फीडबॅक जॉईन झाल्यानंतर एक-दोन महिन्याच्या आत घेतला जातो. अडचणी समजून घेण्यासाठी)

३. सिनियर पोजिशन असेल तर कंपनीत सर्वांशी संवाद साधून आपला प्रेझेन्स कसा वाढेल हे बघणे महत्वाचे असते. नवीन कंपनीत स्वत:ची इमेज तयार करणे अवघड असते. सातत्य, प्रयत्नशील आणि सजग राहावे लागते.

हे दोन तीनच मुद्दे महत्वाचे. बाकी ऑफिसमधले कोण काय बोंबलते त्याला फार किंमत देऊ नका. पण त्यांना उलट उत्तरे सुद्धा देत बसू नका. You don't need to take it on your nerves. Just handle it diplomatically. It's your skill that's it. एकदा बॉसचा विश्वास संपादन झाला कि त्रास देणाऱ्या व्यक्तीबाबत बॉसला सांगू शकता. कार्यक्षम कर्मचाऱ्याच्या कामावर विपरीत परिणाम होत असेल तर बॉसला त्याची गंभीर दाखल घ्यावीच लागेल.

आणि सर्वात शेवटी, जॉब मार्केट मधली तुमची किंमत नेहमी टिकवून ठेवा. कंपनी कधीही "घरी जा" म्हणून सांगू शकते. त्रास अगदीच असह्य झाला आणि सांगूनही दखल घेतली गेली नाही तर शेवटचा उपाय म्हणून जॉब मार्केट मधली तुमची किंमतच तुम्हाला तारेल.