शाळेतील ती (एका उपक्रमातील कविता)

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 17 January, 2020 - 11:22

**********
नाजूक अधरी

मिरवित लाली

ती जेव्हा आली

शाळेमध्ये ॥

बटा कपाळी

काळ्या कुरळ्या

भुवई स्पर्शल्या

होत्या काही ॥

विशाल नयनी

काजळ ल्याची

जग जिंकली

होती दृष्टी ॥

येता अशी ती

वर्ग थांबला

फळा हासला

कौतुकाने ॥

बसली बेंच तो

होय सिंहासन

नि आम्ही दीपून

दरबारी ॥

झाला वर्ग मग

सगळा नापास

तरीही खास

शाळेमध्ये ॥

म्हटला विक्रांत

झाले शिकणे

जीव टांगणे

रितेपणी ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!!

झाला वर्ग मग
सगळा नापास
तरिही खास
शाळेमध्ये ॥>>> कविता वाचतान इथे फिस्सकन हसु आले. Lol