माझी अर्धांगिनी

Submitted by डॉ.अमित गुंजाळ on 17 January, 2020 - 06:00

प्रिये,
तूच सखी,तूच राधा,तूच माझी मनमोहिनी,
मी तुझा राजा अन तूच माझी राणी  
आहेस माझा श्वास तू ,तूच माझी स्वामींनी
तूजविना जीवन होईल अधूरे,तूच माझी अर्धांगिनी...

स्वर्गसुख आज मागतो , अश्रू न यावे कधी तुज नयनी  
सोबत तुझी अशीच घडावी ,अखंड माझ्या ह्या जीवनी  
अन तुझीच साथ लाभो मज जन्मोजन्मी  
तूजविना जीवन होईल अधूरे,तूच माझी अर्धांगिनी...

स्वप्न तुझेच पडते ,नेहमीच माझ्या या नयनी  
रहावे तूच सातोजन्मी सावित्री बनून , हीच आस माझ्या मनी
पूर्णत्वच आहे तुझ्यामुळे, नाही कसलीही हानी
तूजविना जीवन होईल अधूरे , तूच माझी अर्धांगिनी...

Group content visibility: 
Use group defaults