भाजपने मोठी संधी हातची घालवली का?

Submitted by राजदीप on 16 January, 2020 - 06:37

अजित पवार, शरद पवार इडीची नोटीस मिळताच चांगलेच शॉक मध्ये गेले होते. इडीची भिती दाखवून भाजपा काका पुतण्यावर अंकुश ठेवू शकली असती.
परंतु शिवसेनेला शह देण्याच्या नादात अजित पवारांना पावन करुन घेतले.
अजित पवारांनी पलटी मारल्यानं हातची सत्ताही गेली. आता इडीचा वापर करणं बरं दिसणार नाही. किंवा भाजपला अजित पवार परत भुकंप घडवतील ही ( वांझोटी) आशा असावी.
अगोदरच अजित पवारांशी हात मिळवणी केली नसती तर इडीसारख्या यंत्रणा वापरुन भाजप काकांवर अंकुश ठेवू शकली असती. भुजबळ, अशोक चव्हाण यांच्या सारख्यांना सत्तेपासून दूर ठेवता आले असते.
पण भाजपची गोची झाली आहे असे मला वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गोची तर खरी सामान्य जनतेची झाली आहे, पुढच्या निवडणुकीमध्ये कोणाला मत द्यावे याची. कारण निवडणूकपूर्व युती निकालानंतर पण असेल याची आता कोणालाच खात्री नाही.

आता फक्त भाजप आणि काँग्रेस ने एकत्र येऊन सरकार स्थापन करू नये ; का तर त्यांना सेना आणि राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे. Happy

मला तर भाजपची संधी दिसतेय यात....

पुढच्यावेळी भाजपाने ईव्हीएमची सेटींग अशी करावी की नोटाचे बटण दाबल्यास कमळाला मत जावे. बहुमताने जिंकतील. आणि बाकीचे पक्षही आपले बटण सुरक्षित बघून गाफील राहतील .

चोर चोर मौसेरे भाई

ही प्रतिमा सर्वच पक्षांना लागु होते हे सिद्ध करण्यास सर्वच पक्ष एकवटले असे लक्षात आले.

त्यामुळे कोणी संधी उचलली/घालवली सांगणे अवघड आहे.

अजुन पण वाटत आहे हे सरकार 5 वर्ष टिकणार नाही.
तिन्ही पक्षांचे मतदार वेगळे आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये जास्त फरक नाही पण सेनेची गोची होवू शकते.
हिंदुत्व आणि भूमिपुत्र हा सेनेचा आत्मा आहे.
आणि दोन्ही पक्ष ह्याच्या विरूद्ध आहेत.
त्या मुळे पुढच्या निवडणुकीत सेना प्रचार कोणत्या मुद्ध्या वर करणार.

>>> हिंदुत्व आणि भूमिपुत्र हा सेनेचा आत्मा आहे. >>>

आत्मा बित्मा काही नाही. हे दोन्ही मुद्दे सेनेने फक्त सोयीसाठी उचलले होते. सध्या हे दोन्ही मुद्दे गैरसोयीचे असल्याने सेनेने ते बाजूला ठेवले आहेत. भविष्यात जेव्हा सोयीचे वाटतील तेव्हा पुन्हा हे मुद्दे उचलले जातील.