गेल्या दशकातील उल्लेखनीय घटना

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 January, 2020 - 06:34

२०१९ सह एक दशकही संपले. बरेच कार्यक्रमात या दशकातील उल्लेखनीय घटनांचा आढावा घेतला जात आहे. आपणही का मागे राहावे.
चित्रपट-राजकारण-क्रिकेट, खेळ आणि कलाजगत, सामाजिक राजकीय वा अराजकीय घडामोडी, भारतातल्या, जगातल्या, तुमच्या गावखेड्यातल्या, आपल्या मायबोलीवरच्या वा वैयक्तिक आयुष्यातल्या ... चला लिहूया

थोडीशी सुरुवात करतो

१) राजकारण वा चालू घडामोडी भारताबद्दल बोलायचे झाल्यास मोदींचे पंतप्रधान होणे ही या दशकातील सर्वात मोठी घटना आहे. या दशकाला मोदीयुगही म्हणू शकतो. मग नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईक, काश्मीर ३७०, सध्याचे चर्चेत असलेले CAA आणि NRC या याच्याच उपघटना म्हणू शकतो.

२) क्रिकेटमधील विशेष घटना जरी भारताने २०११ चा वर्ल्डकप जिंकणे असली तरी त्यापेक्षा मोठी चटका लावणारी घटना सचिनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती होती. Sad

३) चित्रपटक्षेत्रात अशी एक घटना मला सांगता येणार नाही. पण हे दशक संपता संपता खान सुपर्रस्टारची सद्दी संपली आणि आयुष्यमान, राजकुमार राव, नवाझुद्दीन सिद्धीकी अश्या ऑफबीट कलाकारांचे ऑफबीट चित्रपट मुख्य प्रवाहात आले. दिपिका, आलिया अश्या स्टार हिरोईनी केवळ शोभेच्या बाहुल्या उरल्या नाहीत. सध्याचे क्मर्शिअल चित्रपटांचे स्टार सुपर्रस्टार रणवीर, रणबीर, शाहीद वगैरे काळाची गरज ओळखून विविध प्रयोग करत आहेत. कदाचित पुढच्या दशकात सुपर्रस्टार असे काही बिरुदच नसेल. आणि हे दशक त्याची नांदी ठरेल.

४) वैयक्तिक आयुष्यात बरेच घटना घडल्या ज्या विशेष म्हणता येतील. मग तो माझा नाच असो, वा माझा आजार असो, दक्षिण मुंबईकर मी जन्मापासून होतोच आणि राहीन पण् हे दशक संपता संपता मी नवी मुंबईकर सुद्धा झालो. जॉब बदलत बदलत अखेर एका जागी सेटल झालो. पण या दशकातली सर्वात मोठी घटना जिने माझे आयुष्य जगण्याची शैलीच बदलून टाकली ती म्हणजे माझे बाप होणे. माझ्या मुलीचा जन्म Happy

५) ... क्रमश:
... प्रतिसादांत भर टाकूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख चालू घडामोडीत टाकावा का पण त्यात खेळ चित्रपट राजकारण वैयक्तिक सारेच येऊ शकते म्हणून ललितात टाकला आहे. कृपया त्यावरून वाद नको.

Chhapak ला तानाजी एक योद्ध ह्या सिनेमा नी पाठी टाकलं.
कारणे शोधून थोडक्यात माहिती ध्या.

मानवमामा तुम्ही तो ऑर्कुटवाला धूम्रपानाचा धागा काढा ना.. मागेही म्हणालेलो. नाहीयेत का त्या पोस्ट आता? पुन्हा लिहा एकेक हळूहळू आठवेल तसे वा संदर्भ शोधून..

Chhapak ला तानाजी एक योद्ध ह्या सिनेमा नी पाठी टाकलं.
कारणे शोधून थोडक्यात माहिती ध्या.
>>>
तुमचा मुद्दा असा आहे का की पठडीबाहेरच्या चित्रप्टांना आजही मार्केट नाही? तर सांगू ईच्छितो,
यातले राजकीय वाद सोडले तर छपाक हा वेगळ्या पठडीतील असूनही छान रिस्पॉन्स आहे. मी वाचले त्यानुसार पहिल्या दिव्शी तान्हाजी १५ करोड तर छपाक ५.५ करोड. .. ईथे उगाच तान्हाजीशी तुलना करण्यात अर्थ नाही. छपाकसारख्या चित्रपटाला ५.५ करोड पहिल्या दिवशी छान आहे.

नाना पाटेकर चा माजुर्डेपणा नाहिसा झाला. मनिषा कोईराला सारख्या नट्यांना बायकोसारखं वागवल्यानं एक प्रकारचा माज दाखवत होता. तो माज तनुश्री दत्ता च्या मीटू प्रकरणात मोडला आणि आता त्याची गुरगुर पुरी थांबली आहे.

तान्हाजी ला 2700 स्क्रिन्स मिळाल्या आहेत आणि चपाक ला 1200. बिसिनेस कंप्यारीझन नकोच.
तान्हाजी फॅमिली ऑडियन्स चित्रपट आहे. लोक आपल्या लहान मुला मुलींना घेऊन जातील.
चपाक चा ऑडियन्स लिमिटेड आहे. मेट्रो सिटी मध्ये मुख्यतः.

Agreements/कागदपत्रांवर तारीख लिहिताना 2020 असे पूर्ण वर्ष लिहा. नाहीतर fraud होऊ शकते म्हणे (20 पुढे दुसरे वर्ष लिहून)

या दशकाच्या सुरवातीला, फेसबूक या सोशल मीडिया संकेतस्थळाचा बोलबाला होता. नंतर इंस्टाग्राम आणि आता टिकटॉकने जागा घेतली आहे.

ईंस्टा टिकटॉक यांना फेसबूकच्याच पारड्यात टाकू शकतो का? ते फोटो विडिओ शेअरींगपुरते आहे ना? मला कल्पना नाहीये म्हणून विचारतोय

<< व्हाट्सएप, मायबोली, फेसबुक, इंस्टा, टिकटॉक असं करत बसलं तर जगायचं केव्हा? >>

----------- व्हाट्सएप, मायबोली, फेसबुक, इंस्टा, टिकटॉक यापैकी काहीच करायचे नसेल तर त्या जगण्याला काय जगणे म्हणायचे ?

नव वर्षाच्या पहिल्या दिवशी एका WA ग्रुपचे सभासदत्व रद्द केले... रोज कचरा पडायचा, आणि वाचत बसायचे जमणार नाही, आणि तेव्हढा वेळही नाही असे सांगितले... "सर्व वाचायलाच हवे असे नाही.... हळू हळू लोक शिकत आहेत काय आणि किती बातम्या शेअर करायच्या ... थोडा तग धरायचा" असा सल्ला मिळाला... , असो.

----- व्हाट्सएप, मायबोली, फेसबुक, इंस्टा, टिकटॉक यापैकी काहीच करायचे नसेल तर त्या जगण्याला काय जगणे म्हणायचे ? >>> हा प्रश्न वेगळा, मी विचारलेला वेगळा.

मागच्या दशकात मायबोलीवर हे वाईट झाले असे मला वाटते. :
१. शेकडो(?!) डूप्लिकेट आयडींचा उदय, आणि त्यांनी मांडलेला उच्छाद.
२. टुकार धागे, हाताबाहेर गेलेले ट्रोलिंग, निव्वळ राजकारणी पोस्ट्सचा भरणा
- ह्या सर्वांमुळे बरेच लोक मायबोलीपासून दुरावले. सध्याच्या लोकांना ह्या सर्वांची सवय झाली असावी, आणि त्यांना कदाचित फरक पडत नाही की काय, असे वाटते. बहुधा त्यांना असले धागे वगळून मायबोली सर्फ करण्याची विद्या अवगत झालेली असावी.

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सुलभतेने संपर्क साधता येऊ लागल्याने, केवळ मायबोलीवरच भेटतील असे असणारे लोक मायबोलीपासून दुरावले.

ह्या दशकात, पुर्वी सुचवले गेल्याप्रमाणे नवे धागे काढण्यासाठी मेंबरशीप/ किमान कालावधी/ पोस्ट्सना अपव्होट इ. मार्ग अवलंबले जावेत असे वाटते.

गेल्या दशकातील च नव्हे पूर्ण शतकातील एक मेव घटना घडून गेली आणि कोणाला त्याची आठवण पण नाही.
सकाळी वृत पत्राने जाहीर केलेला मुख्य मंत्री दुपारी मुख्य मंत्री
पदावर नव्हता

सोशल मेडिया (खासकरून व्हाट्सएप) खूप जोरात फोफावले.व्हाट्सएपचा जन्म जरी २००९ मध्ये झाला तरी २०१०, २०११ नंतर ते जोरात फोफावले. २०१४ लोकसभा निवडणुकीत याचा मोठा प्रभाव पडला. भारतात अबालवृद्धांपर्यंत हे अँप पोहचले.

धागा यशस्वी(?)पणे राजकारणाकडे वळवल्या बद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन.

ह्नमम
पण या दशकात सामान्यजनाचा राजकारणातला ईण्टरेस्ट फार वाढला आहे. याला सोशलसाईट आणि त्याद्वारे केला गेलेला प्रचार जबाबदार आहेत. राजकारणाबद्दल सामान्य माणसांनी जागरूक असणे खरे तर चांगलेच आहे पण लोकं अर्ध्वट माहितीवर बिड्या फुकू लागले आहेत. विचारांच्या कट्टरतेकडे झुकू लागले आहेत. मग ते कोणाचे भक्त असो वा द्वेष्टे.. जे लोक यात मोडत नाहीत त्यांना एकूणच वीट येऊ लागलाय.

गेल्या दशकात (वर्षी), मायबोलीकर झाले, तसेच मनातले विचार कागदावर मांडता येऊ लागले. आणि लिहीती झाले! ते स्वतःपुरता मर्यादित प्रकाशित करु लागले. ह्या दशकाने वैयक्तीक आयुष्यात खुपकाही गमावल असलं. तरी खुप काही दिलंय. याचा आनंद आहे. Happy

आयपॅड वापरणं, जायफळ घातलेली कॉफी पिणं, सुकामेवा खिशात भरुन खात खात हिंडणं, उच्च प्रतीचे बासमती तांदूळ वापरून तयार केलेली बिर्याणी खाणं हे स्टेटस सिम्बॉल बनलं.

वैयक्तिक -
२०१७ - गोंदवलेकर महाराजांवरती श्रद्धा दॄढ झाली.
२०१८- अध्यात्मिक व मला आवडलेल्या पोस्टसचा ब्लॉग सुरु केला. कॉपीराईट कायद्याचा भंग नको म्हणुन प्रायव्हेट ठेवलेला आहे. वाचायला अतोनात मजा येते. नामस्मरणाची आठवण रहाते, वाचल्यानंतर ताजेतवाने वाटते.
२०१८ - गोंदवले वारी घडली.

मी देखील साधारण या दशकाच्या सुरुवातीलाच नास्तिकत्व स्विकारले. त्या आधी भक्तीभावाने अंगारकीच्या दिवशी सिद्धीविनायकाच्या दर्शनाला जायच्या आठवणी आहेत.

हो...
आणि त्या नास्तिकत्वातही अप्रगल्भ नास्तिक ते प्र्गल्भ नास्तिक असा प्रवास झाला आहे.
शक्य झाल्यास लिहेन Happy

Pages