मला लाभलेल्या सोयींनो माफ करा

Submitted by बेफ़िकीर on 9 January, 2020 - 05:00

*मला लाभलेल्या सोयींनो माफ करा*
=====

माझ्या तिरडीच्या भोईंनो माफ करा
मला लाभलेल्या सोयींनो माफ करा

जगत राहिलो, तुमच्या स्वीकारून चुका
बस निर्दोष ठरत दोषींनो माफ करा

न्याय तुम्हाला देऊ शकलो नाही मी
नशेत सुचलेल्या ओळींनो माफ करा

चुकून आधी जन्माला आलो आम्ही
नव्या जमान्याच्या पोरींनो, माफ करा

फार लावली सवय तुम्हाला मी माझी
मला लागलेल्या सवयींनो माफ करा

हेतुपुरस्सर झाल्या त्यांनी मुजरा घ्या
उगाच झालेल्या भेटींनो माफ करा

राजा ठरलो असतो या लाचारांचा
मी न चाललेल्या चालींनो, माफ करा

एक देवपण हाक मला मारत आहे
सवंग, लसलसत्या उर्मींनो माफ करा

बरा व्हायचे होते मला स्वभावाने
मी न काढलेल्या खोडींनो माफ करा

-'बेफिकीर'!

(०९.०१.२०)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्याय तुम्हाला देऊ शकलो नाही मी
नशेत सुचलेल्या ओळींनो माफ करा>>>> छान आहे गझल.

चुकून आधी जन्माला आलो आम्ही
नव्या जमान्याच्या पोरींनो, माफ करा>>>>>> Happy

जबरदस्त!!
'बेफिकीर' व्हायचे होते स्वभावाने
पण संवेदनांनो माफ करा.
नवीन Submitted by योग on 9 January, 2020 - 08:14>> हे पण भारी..

छान!
सनम केव्हा पुर्ण करणार.

अर्ध्या लिहिल्या गोष्टी मी कितितरी
अर्ध्य सोडुन त्यावर , माफ करा

असे काही म्हणु नका आता!

>>>>एक देवपण हाक मला मारत आहे
सवंग, लसलसत्या उर्मींनो माफ करा>>> सह्ही!!!

>>>>>>>चुकून आधी जन्माला आलो आम्ही
नव्या जमान्याच्या पोरींनो, माफ करा>>>> Happy

न्याय तुम्हाला देऊ शकलो नाही मी
नशेत सुचलेल्या ओळींना माफ करा

माफ केलं.
वाटलंच, काही तरी अंमलाखाली सुचतात या ओळी.
चांगलं, काही तरी भन्नाट सुचण्यासाठी शुभेच्छा आहेतच. Wink

-दिलीप बिरुटे
( शुद्धीत असलेला वाचक) Happy

भोई तिरडी उचलत नाहीत. पालखी उचलतात.
नवीन Submitted by नौटंकी on 19 January, 2020 - 09:33
>> हेच मलाही वाटलेले. पण लयीसाठी भोई शब्द वापरला असेल असं मत झालं. तिरडी उचलणारे खांदेकरी असतात.

भोई'चं सामान्यरूप भोया होईल ना? >> भोईच राहणार. भोई हा पालखी उचलणारा समाज आहे. माळी जसं माळीच राहतं, कोळी जसं कोळीच राहतं तसंच.

माझ्या तिरडीच्या भोईंनो माफ करा
मला लाभलेल्या सोयींनो माफ करा

=)) च्यायला, या ओळी विसरुलो होतो.
अरे बाबा. भोई लोक पालखी उचलतात तिरडी नाही.

अरे उचला रे, सॉरी आवरा रे या गझलकाराला कोणी.

-दिलीप बिरुटे
(खांदेकरी) Wink

=)) च्यायला, या ओळी विसरुलो होतो.
अरे बाबा. भोई लोक पालखी उचलतात तिरडी नाही.
अरे उचला रे, सॉरी आवरा रे या गझलकाराला कोणी.
-दिलीप बिरुटे
(खांदेकरी)
नवीन Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on 1 February, 2020 - 23:00 >>> आवो, राजाची तिरडी भोईच उचलत असतील! ती तिरडी बी पालखीसारखी असू शकते.