जगभर संकल्पज्वराच्या साथीचे थैमान, "कोण" चा इशारा

Submitted by चामुंडराय on 1 January, 2020 - 13:53

जागतिक स्वास्थ्य संघटना (कोण) यांनी सूचित केल्याप्रमाणे सध्या जगभर संकल्पज्वराची साथ आलेली आहे.

संघटनेने पत्रक काढून असे जाहीर केले आहे की ही साथ अतिशय वेगाने पसरणारी आणि संसर्गजन्य आहे. विशेषतः आरंभशूर मंडळींना ह्या साथीच्या ज्वराची लागण लगेच होते असे निरीक्षण नोंदवले आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कित्येकदा ही लागण सामूहिक असते असे मत व्यक्त केले आहे.

या आजारासाठी कोणत्याही उपचाराची गरज नसून फक्त थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल आणि साथीची तीव्रता कमी होत जाईल. सामूहिक लागण असेल तर एक एक सदस्य ह्या आजारातून आपोआप बरे होत अंतिमतः केवळ एक किंवा दोन सदस्यांना उपचाराची गरज असेल.

जिमला जाऊन वजन कमी करणे हा त्यातील एक महत्वाचा संकल्पज्वर असेल.

साधारणतः जानेवारी अखेर पर्यंत हा संकल्पज्वर उतरेल आणि फेब्रुवारी अखेर पर्यंत ह्या साथीचा मागमूस देखील उरणार नाही.

असे असले तरी २०२१ वर्षारंभी ही संकल्पज्वराची साथ पुनश्च येईल असा सावधानीचा इशारा "कोण" ह्या संस्थेने दिला आहे परंतु ज्वराची लागण झालेल्या नागरिकांनी निष्ठेने संकल्पाचे पालन केले तर फायदा होईल असे मत व्यक्त केले आहे.

आमेन.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अवघ्या दहा दिवसात संकल्पज्वराच्या साथीचा भर ओसरत असल्याची चिन्हे जगभर दिसत आहेत असे "कोण" संस्थेने कळवले आहे.
आता हि साथ pandemic वरून epidemic झाली आहे असे कळते.