ट्वेंटी-२० वर्षाचे संकल्प

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 January, 2020 - 02:07

ट्वेंटी-२० वर्षाचे संकल्प

कुठे दिसला नाही हा धागा तर मीच काढला.
साधेसोपेसेच संकल्प आहेत. ईथे मांडले तर फॉलोअप घ्यायला बरे पडेल.

१) झोपायचा टाईम रात्री तीनचा झालाय. त्याला बारापर्यंत खेचायचेय.

२) ऑफिस नऊचे असते. मी दिवसा आड न चुकता ११ ला जातो. त्याला रेग्युलर करायचेय.

३) ९० टक्के बाहेर खातो. १० टक्के घरचे खातो. हे प्रमाण शक्य तितके उलटे करायचेय.

४) व्यायाम असा कधी आयुष्यात केला नव्हता. पण आता क्रिकेट किंवा ईतर खेळही खेळणे होत नाही. कधी नव्हे ते आयुष्यात थोडे पोट पुढे येऊ लागलेय. तर आता काहीतरी सुर्यनम्स्कार, जोरबैठका गेला बाजार जॉगिंग वगैरे सिरीअसली चालू करायला हवे. व्यायामाला वय आणि मुहुर्त नसतो. तर उगाच अभी तो मै जवान हू, पस्तिशी आल्यावर बघू म्हणण्यात अर्थ नाही.

५) २०१८ साली ऑफिसच्या वार्षिक स्नेहसंमेलनात रणवीर सिंगच्या गाण्यावर नाचलेलो. २०१९ साली रणबीर कपूरच्या गाण्यावर नाचलो. आता आईला ऋत्विक रोशनचा नाच बघायची ईच्छा आहे. पण यंदा नाचाची प्रॅक्टीस करताना जाणवले की त्यासाठी फिटनेस वाढवणे गरजेचे. तर क्रमांक ४ या दृष्टीनेही सिरीअसली घेणार आणि ऋत्विकचा नाच नाचणार.

६) गेल्या वर्षात माबोपासून लांबच राहिलो. काही ज्वलंत धागे काढले अध्येमध्ये. पण लेख लिखाण थांबलेच. येत्या वर्षात या छंदासाठीही वेळ काढायचे ठरवले आहे. त्यासाठी क्रमांक १-२ मध्ये म्हटल्याप्रमाणे शेड्यूल रेग्युलर करायचेय.

७) हल्ली बरेच लोकांत ट्रेकिंगचे फॅड आलेय. मला एक तर वेळ मिळत नाही वा सुटेबल कंपनी कोणी नाही किंवा मी मला जमेल का विचार करून घाबरतो. यंदाच्या वर्षात मात्र हे फॅड करून बघायचे ठरवले आहे.

८) Cohn's disease म्हणून एक पोटाचा की आतड्याचा आजार आहे. त्यालाही खूप लाईटली घेतलेय गेली वर्ष दोन वर्षे. याचे शरीराकडून सिग्नलही मिळू लागलेत. औषधांचे डोस सातत्याने मिस करणे, रेग्युलर फॉलोअपला जाणे टाळणे वगैरे सवयच झालीय. तर वर फिटनेसबाबत जे जागरूक होणार आहे ते या आजाराचेही औषधपाणी नियमित करणार आहे.

९) सायकल चालवायला शिकायचेय. लोकं फिटनेससाठी सायकल चालवतात. मला दुर्दैवाने ती चालवताच येत नाही. शिकल्यावर ऑफिसला सायकलने जायचाही विचार आहे. नवीन घरापासून फार त्रास होऊ नये तसे जायला.

१०) गेल्या सहासात वर्षात मोजून १४-१५ चित्रपट पाहिले असतील. यंदाच्या एका वर्षात किमान १४-१५ चित्रपट बघायचा संकल्प आहे. थिएटर, टीव्ही, मोबाईल जिथे शक्य तिथे.

११) आईशी संवाद वाढवायचा आहे. तसे मी एकुलता एक आणि नो सख्खे भाऊबहीण असल्याने आईच लहानपणापासूनची सख्खी मैत्रीण. त्यात आमची केमिस्ट्रीही अफाट जुळते. मी त म्हटले की आईला ताकभात लगेच कळते. शाळाकॉलेजच्या सगळ्या गप्पा मी आईला सांगायचो तर आईच्या कहाण्या शाळाकॉलेजमध्ये. त्यामुळे मित्रांमध्ये माझे आईप्रेम आणि मम्माज बॉय असणे पहिल्यापासून फेमस. पण गेले काही काळ हे गृहीत धरल्यासारखे वाटतेय. ते टाळायचे आहे. आणि हे ठरवून नाही तर सहज घडवायचे आहे.

तुर्तास ईतकेच.....
काहीतरी भरीव आठवल्यास भर टाकतो. उगाच १ जानेवारीलाच जास्त लोड घेण्यात अर्थ नाही Happy

सर्वांना नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा !
सर्वांचे संकल्प वाचण्यास उत्सुक Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक ड्रेस घातला रीपीट न करता तरी दोन महिने जातील. >>> बाप रे! __/\__ माझे असे जेमतेम १०-१२ दिवस जातील; ते सुद्धा मिक्स-एन-मॅच करून... आणि कायम असंच स्टेटस असतं.

मी यंदा दर महिन्याला एक तरी पुस्तक वाचायचंच असं ठरवलं आहे. जानेवारीत दोन वाचून झाली, तिसरं सुरू आहे. Happy

Sad
आता ह्याचंच प्रायश्चित्त घ्यायचंय ना मला Happy

बरं पियु आहे का?
सो फार नो खरेदी. एकही नाही. महिना संपलाच ना आता Happy
अगदी सेलमधे जाऊनही, मैत्रिणींनी/नेहमीच्या विक्रेतीने आग्रह करुनही, खरंतर कुर्ते आवडुनही काहीच घेतलं नाही.
स्वतःला शाबासकी पण दिली. Happy

बरं ह्या महत्वाच्या संकल्पासोबत अजुन दोन आहेत.
टू व्हीलर शिकायची आहे आणि कराओके गाणं शिकायचं आहे. सुरुवात करायला मुहुर्त लागेना पण.

मला इतरांना ख़ंडीभर गिफ्ट देण्याचं अ‍ॅडिक्शन आहे असं म्हणालात तरी चालेल.

रीया.....माज्या शी मय्तरी कर्नार कं ?

>>>>गिफ्ट देण्याचं अ‍ॅडिक्शन आहे असं म्हणालात तरी चालेल.>>>> रीया सेम हियर. पण ते चांगले व्यसन आहे. त्याला मुरड घालू नका.

मग तुम्हीसुद्धा सामो....माज्या शी मय्तरी कर्नार कं ?

माझे दोन्ही संकल्प पार पडले. प्रवासात असल्याने त्याच दिवशी न लिहीता दोन दिवसांनी लिहली....
मेडिटेशन सुरु आहे .... सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी करतेय...

<< ते चांगले व्यसन आहे. त्याला मुरड घालू नका. >>
गिफ्ट देण्याचं अ‍ॅडिक्शन हे चांगले व्यसन कसं काय? उगीचच गिफ्ट देण्यात पैसे वाया जात नाहीत का?

मन्या अभिनंदन. स्वतःचीच पाठ थोपट!!!
__________
मंजूताई ध्यान म्हणजे काय करता? आपली हरकत नसेल तर सांगा. व तुम्हीही स्वतःची पाठ थोपटा.
____________
>>>>उगीचच गिफ्ट देण्यात पैसे वाया जात नाहीत का?>>>> पण आपल्याला आनंद खूप मिळतो. व गिफ्टस आपल्यालाही मिळतात की.

काही असेल ओकेजन तर ठीके. आणि पैसे जातातच की.
>>>
जाऊ दे की... लोकं दारू पिताना ती चांगली की वाईट ही चर्चा करतात. पण त्याचवेळी दारूच्या नावावर कित्येक पैसे पाण्यासारखे उधळतात ते देखील जीवाला अपाय पोहोचवायला.. तर आनंदासाठी कोणी पैसे उधळत असेल तर ठिकेय.. त्यातही गिफ्ट म्हटले की नेहमी शोपीसच येत नाही, उपयुक्त वस्तू गिफ्ट दिल्या की वापरल्याही जातातच
मला तर आवडेल बाबा अश्या गिफ्ट देणारया लोकांशी मैत्री करायला Happy

मी स्वत:च एक सुंदर गिफ्ट आहे जे देवाने जगाला दिले आहे.
मला कोणाला द्यायचे की आपल्याजवळच ठेवायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.
असा माझा स्वत:बद्दल समज आहे.

Thanks सामो,
आता नवा दिवस नवी सुरवात हा दृष्टीकोन ठेवुन प्रयत्न करतेय. फेब्रुवारी रिझल्ट वेगळा आणि जानेवारीपेक्षा नक्कीच बेटर असेल. Happy

मी स्वत:च एक सुंदर गिफ्ट आहे जे देवाने जगाला दिले आहे.>>>>

हे विश्व एक सुंदर गिफ्ट आहे जे देवाने मला दिले आहे असे मला वाटते.

माझी लाईफस्टाईलही जैसे थे आहे तुर्तास.
पण नवीन घर घेतले आहे. महिन्या दोन महिन्यात शिफ्ट झालो की रुटीन बदलेल तेव्हा च नवी सुरुवात करूया असे ठरवले आहे.. हा धागा आहे बरे आहे.. ईथे काही अभिमानाने लिहायला तरी काहीतरी करेनच

Pages