धक्का . . .

Submitted by सोहनी सोहनी on 28 December, 2019 - 05:24

धक्का . . .

खेळता खेळता गंधारने आज पुन्हा काचेची डिश तोडली. गार्गी आज भयंकर चिडली होती. किचनमध्ये साफसफाई करायची टाकून ती तरातरा हॉल मध्ये आली. आणि चार वर्षाच्या गांधारला हाताला धरून ओढत घेऊन गेली.
" थांब तुला ना आज, वरच्या खोलीत कोंडूनच ठेवते. रोज काही ना काही तोडफोड केल्याशिवाय चैन नाही पडत तुला, नीट सांगून पटत नाही ना, थांब आज तुला दिवसभर तिथेच ठेवेन."

भीतीने घामाघूम गंधार, आपल्या चिमुकल्या हातांनी गार्गीला थांबवायचा प्रयत्न करत होता.
" आई नको, नको ना आई, मला भीती वाटते तिथे, खूप अंधार आहे तिथे, मी पुन्हा नाही करणार, आई नको, प्लिज"

त्याच बोलणं पूर्ण होते ना होते तोच गार्गी त्याला त्या रूममध्ये ठेवून दार बाहेरून लावून घेऊन बाहेरच उभी राहते.

एक दोन क्षणांत लगेचच गंधार आकांताने दार वाजवायला लागतो. वाजवण्यापेक्षा असेल नसेल त्या जिवाने रडत रडत ओरडत तो दार बडवू लागतो.
" आई, आई, मला बाहेर काढ, ती . . ती माझ्याकडे येतेय, आई ती माझ्याकडे येतेय, आ. . .ई. .. "

तो इतक्या जोरात ओरडतो कि गार्गी लगेच दार उघडते, चिमुकला गंधार जीवाच्या आकांताने गार्गीला बिलगतो, ती ती माझ्याकडे येतेय, मला पुन्हा नको ठेऊ इथे, मला तिची भीती वाटतेय म्हणत थरथरू लागतो.. . .

" कोण आहे तिकडे? ये मला दाखव. सांग कुठे आहे?" गार्गी संपूर्ण रूममध्ये फिरून फिरून त्याला विचारते, अर्थातच तिथे दोन जुन्या खुर्च्या आणि एक टेबल शिवाय काहीच नसतं.

काय रे, पनिशमेंट पासून वाचण्यासाठी इतकं खोटं बोलायला शिकलास? जर पुनः खोटं बोललास आणि मस्ती केलीस तर खरोखर दिवसभर इथेच डांबून ठेवीन, कितीही रडला तरी दार उघडणार नाही.

गार्गी इतकं बोलत होती पण गांधारचं लक्ष खिळलं होतं खुर्ची मागच्या दोन डोळ्यांत. . .

गार्गी त्याला हाताला धरून पुन्हा खाली घेऊन जाते. वरच्या खोलीचं नुसतं नाव घेतलं तरी गंधार थरथरायचा, आई तिकडे डांबून ठेवेल ह्या भीतीने तो घरात खेळत नसायचा. . .

आज निषादला सुट्टी होती आणि कुठे बाहेर जायचा प्लॅन नसल्यामुळे तिघे मिळून छान मस्ती करत होते, खेळत होते. अचानक गार्गीने लपाछपी खेळायचं सुचवलं.
राज्य आलं निषाद वर, गंधार हॉल मध्ये सोफ्याच्या मागे लपला आणि गार्गी हळूहळू वर खोलीत जाऊन लपली ते गांधारने पाहिलं.
तोही हळू हळू तिच्या मागे गेला आणि बाहेरून त्याने दरवाज्याला कडी घातली आणि हळूच खाली येऊन लपला.
कडी लागल्याची गार्गीला कळली होती आणि गांधारनेच लावली तेही पाहिलं.

ती गालातल्या गालात हसत तिथेच लपून राहिली. तिला अचानक काहीतरी मागे जाणवलं, पाहिलं तर काहीच नव्हतं. ती पुन्हा दरवाज्यातून बाहेर पाहायचा प्रयत्न करून लागली तोच तिला खरखर खरखर आवाज जाणवू लागला. जणू कुणीतरी आपले कडक जाड नखं कशावर तरी ओढत आहेत.

तिने एका झटक्यात मागच्या खुर्चीकडे पाहिलं, पण काहीच नाही. आता भीती मनाचा ताबा घेऊ लागली, मनात थरथर जाणवू लागली. ती सगळी कडे पाहू लागली पण काहीच नव्हतं.
अचानक तिला स्वतःच्या मागे खूप जवळ काहीतरी जाणवलं. मी पुरती घाबरली होती. इतकी कि मागे वळून पाहण्याची देखील तिची हिम्मत होत नव्हती. तिने घाबरत घाबरत मागे वळून पाहिलं तर समोर काहीच नाही. तिने एक मोठा निश्वास सोडून खाली पाहिलं तर गार्गी जिवाच्या आकांताने किंचाळली आणि तिने आपल्या हातांनी आपला चेहरा लपवला. ती किंचाळी बाहेर दाराला कान लावलेल्या गंधारला फक्त ऐकू गेली.
तो मनोमन हसू लागला, आपण घाबरलो तशी आई देखील घाबरली म्हणून. .

गार्गीने चेहऱ्यावरचा हात हटवून पुन्हा खाली पाहिलं तर तिथे काहीच नाही, ती भीतीने चक्रावून गेली.
तिने सगळीकडे पाहिलं, आपल्याला भास झाला असावा ह्यावर जवळजवळ विश्वास बसलाच होता तिचा तोवर खुर्चीमागे काहीतरी हललं .
तिने वाकून पाहिलं तर गार्गीच्या विरुद्ध दिशेला पाहत एक चार पाच वर्षाची लहान मुलगी गुढगे छातीशी घेऊन दोन्ही हातांनी घट्ट पकडून लयीत बसल्याबसल्या झुलत होती.

तिला पाहून गार्गीचा थरकाप उडाला, चेहरा भीतीने कोरडा पडला, तिने एक आवंढा गिळला आणि त्या मुलीने हळूहळू करत आपली मान गार्गी कडे वळवली.
पांढरा फट्ट चेहरा, हातभर लांब केसांच्या जटा, क्षणांत गार्गी आणि तिची नजरानजर झाली. गार्गी नखशिखान्त शहारली भीतीने, अंगावरचा रोम रोम भीतीने थरारला, त्या हिडीस, भयानक, अमानवी नजरेला नजर देऊन गार्गी जागेवरून सरकत भीतीने दरवाज्याला जाऊन खेटली.

ती हळूहळू गुढग्यांवर रांगत रांगत तिच्या जवळ येऊ लागली. ती थेट गार्गीच्या डोळ्यात क्रूरपणे पाहत होती जणू आता गार्गीच्या गळ्याचा घोट घेईल.

आता गार्गीला जाणवलं आपण स्वतः गंधारला कितीतरी वेळा हिच्याकडे सोपवलं होत नकळत, ती पुढे पुढे येत होती, गार्गीने भीतीने दार वाजवायला सुरुवात केली, गंधार जोरात हसू लागला आई घाबरली, आई घाबरली.

" बाळा दार उघड ती मारेल मला, प्लिज दार उघड"

ती हिंस्र हसत, गार्गीच्या अगदीच तोंडाजवळ पोहोचली. गार्गी पूर्ण अंग आकसून भीतीने डोळे बंद दरवाज्याला धरून बसली.

चार पाच क्षण काहीच आवाज नाही, स्मशान शांतता. तिने हिम्मत करून हळूच डोळे उघडले ती समोर नव्हतीच.
गार्गी सगळीकडे शोधू लागली, ती कुठेच नव्हती, गार्गी पुन्हा दार वाजवू लागली, गंधार, निषाद वाचव मला, ती मारेल मला.
एव्हाना तिला शोधत निषाद वरच्या जिन्यावर पोहोचला, गंधारला एकटाच हसताना आणि वाजणाऱ्या दरवाजाच्या आवाज ऐकून तो घाईघाईने वर आला.

गार्गी दार वाजवत असताना तिने अचानक वर पाहिलं ती वर भिंतीला चिकटली होती, गार्गीकडे पाहत हसत होती, तिने गार्गीवर झेप घेतली,

दाराचा जोरात आवाज ऐकून निषादने त्वरित कडी उघडली, गार्गी निषादच्या पायांवर कोसळली.

.
.
.
.
.
.
काहीच दिवसांनी गंधार रात्री काही बाही बडबड करायचा, ती येतेय, मला खेळायला बोलावते, वैगेरे वैगेरे.

ह्या घरात आपल्या मुलाचं मानसिक संतुलन बिघडत चाललं आहे ह्या समजावरून
हृदय विकाराने मेलेल्या गार्गीच्या मृत्यूचं गूढ वरच्या खोलीत तसंच सोडून गंधार आणि निषाद घर सोडून निघून गेले.

__ समाप्त

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगल्या थीमचा पार बट्टयाबोळ केलाय Uhoh
अनपेक्षित ट्विस्टच्या नादात शेवट थोड़ा गंडलाय किंवा घाईमध्ये गुंडाळला गेलाय किंवा दोन्हीही घडलंय ...

> गार्गी निषादच्या पायांवर कोसळली. > इथेच समाप्त झाली असती तर चाललं असतं किंवा

> ती वर भिंतीला चिकटली होती, गार्गीकडे पाहत हसत होती > इथे....

अजुन एक -

ती वर भिंतीला चिकटली होती, गार्गीकडे पाहत हसत होती ... आणि तीचंच प्रतिरूप असणारी गार्गीही तिच्याकडे पाहुन सहेतुक हसली !!

कथा चांगली जमलीय.
शेवट च्या 2 पॅरा मध्ये जरा घोळ वाटतो.भूत वाचकाला पूर्ण स्पष्ट न दाखवणे/अगदी शेवटी दाखवणे ही हॉरर कथांची की असते.
नारायण धारप यांची अनोळखी दिशा 1(किंवा3) मध्ये बागुलबुवा नावाची एक कथा आहे.थोड्या अश्याच थीम वर.(तुम्ही त्यावरून घेतलीय असं म्हणत नाहीये.)
लहान मुलांना वाटणारी भीती काढायला खूप टोकाच्या स्टेप घेऊ नयेत असं काहीतरी अश्या कथा वाचून ठरवते.

सगळ्यांचे मनापासून आभार

मलाही कथा वाढवावीशी वाटत होती पण थांबवली, पण बघुयात पुढे हीच कथा कंटिन्यू करून नवीन भाग लिहेन.

मस्त होता हा धक्का.
नवीन भाग नका लिहु. पुर्ण कथाच नविन करा , ट्वीस्ट पण वेगळाथ्ठेवा.